(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
रने देकार्तला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानले जाते. सतराव्या शतकापासून यूरोपमध्ये देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स यांनी बुध्दिप्रामाण्यवाद मांडला; तर लॉक, बर्क्ली, डेव्हिड ह्यूम यांनी अनुभववादाची मांडणी केली. कांटच्या ज्ञानमीमांसेत दोहोंचा समन्वय आढळतो. कांटला म्हणूनच युगप्रवर्तक मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे आधुनिक तत्त्वज्ञान विविध दिशांनी विस्तारलेले दिसते. हेगेल, ह्यूसेर्ल, मार्क्स, हायडेगर यांनी घेतलेला जाणिवेचा वेध कांटहून निराळा व लक्षणीय आहे. तो येथे दिला आहे. तसेच हायडेगरसह किर्केगॉर, सार्त्र, सीमॉन द बोव्हार आदिंच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची रूपरेषा येथे दिली आहे. मूर, रसेल, व्हिट्गेन्श्टाइन यांचे विश्लेषक तत्त्वज्ञान; श्लिक, कारनॅप, एयर यांचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद; पर्स, जेम्स, ड्यूई यांचा फल:प्रामाण्यवाद येथे संक्षेपाने येतो व उपयोजित तसेच तौलनिक तत्त्वज्ञानाचाही समावेश आढळतो. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय जीवनात स्थित्यंतरे होऊ लागली, ती वैज्ञानिक प्रगतीमुळे व त्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे. रेल्वे, टपाल आदी दळणवळणाची तसेच संपर्काची साधने उपलब्ध झाली. शिक्षणासाठी वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये व विश्वविद्यालये आदी संस्थांची स्थापना झाली. पाश्चात्त्य उदारमतवादाचा प्रभाव सुशिक्षितांमध्ये दिसू लागला. परिणामी विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म-अध्यात्म, ऐहिक-पारलौकिक, नवता-परंपरा, विवेक-श्रध्दा अशा अनेक द्वंद्वांची सांगड आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानात आढळते. किंबहुना, ‘समन्वय’ हे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण होय.

एकविसाव्या शतकात प्रसारमाध्यमांनी क्रांती घडवून आणली. कृषी, उद्योग, कायदा, संगीत, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे काही विशिष्ट प्रश्न निर्माण झाले. अशा मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांचा मागोवा आधुनिक तत्त्वज्ञानात घेतला जातो. एकंदरीत, आधुनिक तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचा व विविध तत्त्वविचारांचा परिचय करून देणे, हे या ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे. तत्त्वज्ञान हा विषय क्लिष्ट मानला जातो. तो शक्य तितक्या सोप्या शब्दांत सर्वसामान्य वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत व संशोधकांपर्यंत पोहोचावा, असे वाटते. पूर्वसूरींचे मार्गदर्शन आहेच. त्याच आधारे हे संचित तात्त्विक प्रसारार्थ खुले करत आहे.

व्यक्तीच्या तदेवतेची समस्या (Problem of Personal Identity)

व्यक्तीच्या तदेवतेची समस्या

आपले मित्र, नातेवाईक, परिचित व्यक्ती यांना आपण मनोमन ओळखतो आणि म्हणतो की, ही तीच व्यक्ती आहे, जी माझ्याबरोबर शिकत होती; ...
व्यवहारवाद (Commonsense Philosophy)

व्यवहारवाद

अठराव्या शतकात टॉमस रीड (१७१०–९६) आणि अन्य काही स्कॉटिश तत्त्वज्ञांनी उदयास आणलेला एक तत्त्वज्ञानीय पंथ. जग आणि माणूस ह्यांच्या स्वरूपासंबंधीचे ...
व्हिल्हेल्म डिल्टाय (Wilhelm Dilthey)

व्हिल्हेल्म डिल्टाय

डिल्टाय, व्हिल्हेल्म : (१९ नोव्हेंबर १८३३—१ ऑक्टोबर १९११). जर्मन तत्त्वज्ञ. व्हीस्बाडेनजवळील बीब्रिख येथे जन्म. त्याचे वडील कॅल्व्हिन पंथाचे उपदेशक (Priest) ...
शंकर दत्तात्रेय जावडेकर (S. D. Javadekar)

शंकर दत्तात्रेय जावडेकर

जावडेकर, शंकर दत्तात्रेय : (२६ सप्टेंबर १८९४—१० डिसेंबर १९५५). प्रज्ञावंत गांधीवादी भाष्यकार व एक तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर ...
शंकर रामचंद्र राजवाडे (Shankar Ramachandra Rajwade)

शंकर रामचंद्र राजवाडे

राजवाडे, शंकर रामचंद्र : (२३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२). प्राचीन‒संस्कृत‒विद्येचे संशोधन करणारे, तत्त्वज्ञानाच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे विचार करून ग्रंथलेखन करणारे प्रसिद्ध ...
शिवराम सदाशिव अंतरकर (Shivram Sadashiv Antarkar)

शिवराम सदाशिव अंतरकर

अंतरकर, शिवराम सदाशिव : (२१ जून १९३१—१८ डिसेंबर २०१८). आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डुगवे ह्या गावी त्यांचा ...
शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale)

शिवाजीराव भोसले

भोसले, शिवाजीराव अनंतराव : (१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०). महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते. त्यांचा जन्म ...
श्रीनिवास हरी दीक्षित (Shriniwas Hari Dixit)

श्रीनिवास हरी दीक्षित

दीक्षित, श्रीनिवास हरी : ( १३ डिसेंबर १९२० — ३ ऑक्टोबर २०१३ ). भारतीय तत्त्वज्ञ. निपाणीजवळील बुदलमुख ह्या गावी तीन ...
श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य (Shrimadbhagwatgeetarahasya)

श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी लिहिलेले गीतेवरील भाष्य. श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या ग्रंथाचे संपूर्ण नाव आहे; तथापि गीतारहस्य ह्या ...
संख्यापक (Quantifier)

संख्यापक

विधेय तर्कशास्त्रात संख्यापनाला महत्त्वाचे स्थान आहे. परिगणक, संख्यिकारक/संख्यापक यांना इंग्रजीमध्ये ‘क्वान्टिफायर’ असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या बागेत जातो. तिथे झाडांना ...

संख्यापकीय निगमनाचे नियम

विधान तर्कशास्त्रामध्ये (Propositional logic) अनुमानाचे नियम व रूपांतरणाचे नियम यांचा वापर युक्तिवादाची वैधता सिद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र विधेय तर्कशास्त्रामध्ये ...
सत्यता कोष्टक पद्धती (Truth Table Method)

सत्यता कोष्टक पद्धती

एकोणिसाव्या शतकानंतर विकसित झालेले तर्कशास्त्र हे १९ व्या शतकाच्या अगोदर गोटलोप फ्रेग, जूझेप्पे पेआनो व गेऑर्ग कॉन्टोर यांचे महत्त्वाचे कार्य ...
सर आयझेया बर्लिन (Sir Isaiah Berlin)

सर आयझेया बर्लिन

बर्लिन, सर आयझेया : ( ६ जून १९०९ – ५ नोव्हेंबर १९९७ ). ब्रिटिश विचारवंत व तत्त्वज्ञ. जन्म रशियातील रीगा, ...
सरेन किर्केगॉर (Soren Kierkegaard)

सरेन किर्केगॉर

किर्केगॉर, सरेन : (५ मे १८१३—११ नोव्हेंबर १८५५). हा डॅनिश धर्मविषयक तत्त्वचिंतक, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे एका सधन कुटुंबात जन्मला ...
सर्वपल्ली राधाकृष्णन् (Sarvepalli Radhakrishnan)

सर्वपल्ली राधाकृष्णन्

राधाकृष्णन्, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८‒१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२–६७) व पाश्चात्त्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर ...
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)

सावित्रीबाई फुले

फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही ...
सिद्धतापद्धती : सोपाधिक व अप्रत्यक्ष (CP and IP)

सिद्धतापद्धती : सोपाधिक व अप्रत्यक्ष

युक्तिवाद वैध वा अवैध आहे, हे ठरविण्यासाठी अथवा त्याची वैधता/युक्तता सिद्ध करण्यासाठी तर्कशास्त्रज्ञांकडून दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात.
  • निर्णयपद्धती ...
सी. इ. एम. जोड (C. E. M. Joad)

सी. इ. एम. जोड

जोड, सिरिल एडविन मिटि्‌चन्सन : ( १२ ऑगस्ट १८९१ — ९ एप्रिल १९५३ ). ब्रिटिश तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म एडविन व ...
सीमॉन द बोव्हार (Simone de Beauvoir)

सीमॉन द बोव्हार

बोव्हार, सीमॉन द : ( ९ जानेवारी १९०८ – १४ एप्रिल १९८६ ). फ्रेंच लेखिका, तत्त्वज्ञ, राजकीय कार्यकर्ती, स्त्रीवादी चळवळीची ...
सुखवाद (Hedonism)

सुखवाद

नीतिशास्त्रातील एक उपपत्ती. नीतिशास्त्र ज्यांची सोडवणूक करू पाहाते, अशा समस्या प्रामुख्याने चार आहेत. (१) मानवी जीवनाचे परमप्राप्तव्य कोणते? (२) स्वयंनिष्ठ ...