(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

बृहद्देशी (Bhruhddeshi)

बृहद्देशी

संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, ...
भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षापीठ (Academy of Indian Classical Music and Dance)

भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षापीठ

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि इतर कलांचे शिक्षण देणारी ख्यातनाम संस्था. भारतीय विद्या भवन (भारतीय शैक्षणिक ट्रस्ट) या शिक्षण संस्थेच्या या ...
भास्करबुवा बखले (Bhaskarbua Bakhale)

भास्करबुवा बखले

बखले, भास्करबुवा रघुनाथ : ( १७ ऑक्टोबर १८६९ – ८ एप्रिल १९२२ ). एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; ...
भीमसेन जोशी (Bhimsen Joshi)

भीमसेन जोशी

जोशी, भीमसेन : (४ फेब्रुवारी १९२२ – २५ जानेवारी २०११). महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव ...
भूर्जीखाँ (Bhurji Khan)

भूर्जीखाँ

भूर्जीखाँ : (ॽ १८९० – ५ मे १९५०). जयपूर-अत्रौली घराण्याची गायन परंपरा संक्रमित करणारे एक थोर गायक. त्यांचे पूर्ण नाव ...
भैरव थाटातील राग (Bhairav Thaat)

भैरव थाटातील राग

हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील एक प्राचीन व महत्त्वपूर्ण थाट. या थाटातील ‘रे’ आणि ‘ध’ हे केवळ दोन स्वर कोमल आहेत. या रागाचे ...
भैरवी थाटातील राग (Bhairavi Thaat)

भैरवी थाटातील राग

हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील या थाटाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सातही स्वर कोमल असतात. भैरवी ही आश्रय ‘रागिणी’ मानण्यात येते व हिंदुस्थानी ...
मतंग (मतंगमुनी) Maatang

मतंग

मतंग (मतंगमुनी) : एक मध्ययुगीन संगीतरचनाकार आणि आधुनिक रागमालेचे जनक. त्यांच्या जन्म, मृत्यू व जीवनाच्या काळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; ...
मदुराई मणी अय्यर (Madurai Mani Iyer)

मदुराई मणी अय्यर

अय्यर, मदुराई मणी : (२५ ऑक्टोबर १९१२ – ८ जून १९६८). भारतीय अभिजात कर्नाटक संगीत परंपरेतील सुप्रसिद्ध गायक. त्यांचे मूळ ...
मद्रास संगीत अकादमी (Madras Music Academy)

मद्रास संगीत अकादमी

म्युझिक अकादमी या नावानेही प्रसिद्ध. ललितकलेच्या इतिहासातील प्रामुख्याने दक्षिण भारतातील आणि देशातील एक नामवंत संगीत संस्था. ही संस्था तमिळनाडू राज्यातील ...
मराठी नाट्यसंगीत : सौंदर्यशास्त्र (Marathi Natyasangeet : Saundaryashastra)

मराठी नाट्यसंगीत : सौंदर्यशास्त्र

नाट्यसंगीताच्या ऐतिहासिक स्थित्यंतरामागे बारकाईने पाहिल्यास एक प्रकारची वैचारिक भूमिका आकार घेत असलेली दिसते. या भूमिकेस सौंदर्यशास्त्रीय भूमिका असे म्हणता येईल ...
मराठी नाट्यसंगीत (Marathi Natyasangeet )

मराठी नाट्यसंगीत

मराठी नाट्यसंगीतातील विविध स्थित्यंतरांचा ऐतिहासिक दृष्ट्या परामर्श घ्यावयाचा झाल्यास विष्णुदास भावे यांच्या सीतास्वयंवर या आख्यानवजा संगीत पौराणिक नाटकापासून सुरुवात करावी ...
मल्लिकार्जुन मन्सूर (Mallikarjun Mansur)

मल्लिकार्जुन मन्सूर

मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) ...
माणिक वर्मा (Manik Varma)

माणिक वर्मा

वर्मा, माणिक : (१६ मे १९२६ – १० नोव्हेंबर १९९६). सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका. त्यांचा जन्म पुणे ...
मानकुतूहल आणि राग दर्पण (Maankutuhal and Raag Darpan)

मानकुतूहल आणि राग दर्पण

फकीरुल्ला कृत ‘रागदर्पण’ या संगीतविषयक ग्रंथाचा विचार सुटेपणाने न करता ‘मानकुतुहल’ या ग्रंथासह एकत्रितपणे त्याचा परामर्श घेणे उचित ठरते, कारण ...
मायकल जॅक्सन (Michael Jackson)

मायकल जॅक्सन

जॅक्सन, मायकल : (२९ ऑगस्ट १९५८ – २५ जून २००९). जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतकार आणि नर्तक. ‘‘किंग ऑफ पॉप’’ ...
मारवा थाटातील राग ( Marwa Thaat )

मारवा थाटातील राग

हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, ...
मास्तर कृष्णराव  (Master Krishnarao)

मास्तर कृष्णराव 

फुलंब्रीकर, कृष्णराव गणेशपंत : (२० जानेवारी १८९८–२० ऑक्टोबर १९७४). एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक. त्यांचे आडनाव पाठक असे होते; ...
मुकेश (Mukesh)

मुकेश

मुकेश : (२६ जुलै १९२३–२८ ऑगस्ट १९७६). भारतीय चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक. त्यांचे पूर्ण नाव मुकेशचंद माथूर. त्यांचे वडील जोरावरचंद हे ...
मुश्ताक हुसेन खाँ (Mushtaq Hussain Khan)

मुश्ताक हुसेन खाँ

खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर – सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा ...