(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

मेहबूब खाँ मिरजकर (Mehboob Khan Mirajkar)

मेहबूब खाँ मिरजकर

मिरजकर, मेहबूब खॉं : (१८६८ – २८ ऑगस्ट १९६५) भारतातील फरूखाबाद घराण्याचे ख्यातकीर्त तबलावादक. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. लहानपणापासून ...
मोगूबाई कुर्डीकर (Mogubai Kurdikar)

मोगूबाई कुर्डीकर

कुर्डीकर, मोगूबाई : ( १५ जुलै १९०४– १० फेब्रुवारी २००१ ). हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका. त्यांचा जन्म कुर्डी ...
मोहिनीआट्टम् (Mohiniyattam)

मोहिनीआट्टम्

मोहिनीआट्टम् नृत्यातील एक भावमुद्रा केरळमधील एक पारंपरिक प्राचीन शास्त्रीय नृत्यप्रकार. कथकळी नृत्यदेखील केरळमधीलच आहे; पण हा प्रकार प्रामुख्याने पुरुषांनी नाचायचा, ...
येहूदी मेन्युइन (Yehudi Menuhin)

येहूदी मेन्युइन

मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची ...
रजब अली खाँ (Rajab Ali Khan)

रजब अली खाँ

खाँ, रजब अली : (१८७५—८ जानेवारी १९५९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रभावशाली गायनामुळे प्रसिद्ध झालेले गायक. त्यांचे गाणे जयपूर घराणे आणि ...
रत्नाकर शांताराम पै (Ratnakar Shantaram Pai)

रत्नाकर शांताराम पै

पै, रत्नाकर शांताराम : (१७ ऑगस्ट १९२८—९ ऑगस्ट २००९). हिंदुस्थानी रागदारी संगीतामधील, विशेषतः जयपूर घराण्याच्या संदर्भातील, एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी असलेले कलाकार ...
राग लक्षण (Raag Lakshana)

राग लक्षण

वैशिष्ट्यपूर्ण अशी भारतीय रागसंकल्पना, रागतत्त्वाचा जो पद्धतशीर विकास झाला त्यांतून निरनिराळ्या अवस्थांमधून परिवर्तित झाली आणि तिचे लक्ष्यस्वरूप निर्माण झाले. आजमितीला ...
रागतत्त्वविबोध (Ragatattvavibodha)

रागतत्त्वविबोध

भारतीय संगीतविषयक माहितीपर संस्कृत भाषेतील दुर्मीळ ग्रंथ. रागतत्त्वविबोध या ग्रंथाचे लेखन पंडित श्रीनिवास यांनी केलेले असून या ग्रंथाचा निश्चित कालावधी ...
रागनिर्मिती (Raagnirmiti)

रागनिर्मिती

एखाद्या विशिष्ट स्वरसमूहाला बीजरूप मानून स्वरांच्या विविध वर्णक्रियांनी त्या बीजाला फुलवायचे ही रागनिर्मितीची एक प्रक्रिया; तर विविध थाट-रचनांमधून रागाला आवश्यक ...
रागवर्गीकरण (Raag Distribution)

रागवर्गीकरण

संगीतात रागतत्त्व निर्माण झाल्यावर त्या रागांचे पद्धतशीर वर्गीकरण करण्याचे प्रयत्न फार प्राचीन काळापासून झाल्याचे दिसून येतात. त्या रागांच्या वर्गीकरणाबाबत जे ...
रागविचार : इतिहास व स्वरूप (Raag Vichar : History and Structure)

रागविचार : इतिहास व स्वरूप

भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते. रागसंकल्पना व्यापक अर्थाने रागविचारात ...
रागविचार : राग अभिव्यक्ती  (Raag Vichar : Raag Presentation)

रागविचार : राग अभिव्यक्ती  

रागरचना व रागसंकल्पना हे भारतीय संगीताचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असल्यामुळे हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीतपद्धतींत रागरचना महत्त्वाची आहे. परंतु रागाच्या ...
रागविचार : रागसंकल्पना (Raag Vichar : Raag Sankalpana)

रागविचार : रागसंकल्पना

भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते आणि म्हणूनच रागतत्त्व भारतीय ...
रागांग वर्गीकरण (Ragang Vargikaran)

रागांग वर्गीकरण

संगीतरत्नाकर  या शार्ङ्गदेवलिखित ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या प्रकरणात रागांग निर्णय हा विषय विस्ताराने सांगितला आहे. त्यात रागाची छाया घेऊन गायन ...
राम मराठे (Ram Marathe)

राम मराठे

मराठे, राम पुरुषोत्तम : (२३ ऑक्टोबर १९२४ – ४ ऑक्टोबर १९८९). प्रसिद्ध मराठी ख्यालगायक, गायकनट व संगीतदिग्दर्शक. त्यांचा जन्म पुणे ...
रुक्मिणीदेवी ॲरंडेल (Rukminidevi Arundale)

रुक्मिणीदेवी ॲरंडेल

ॲरंडेल, रुक्मिणीदेवी : (२९ फेब्रुवारी १९०४ — २४ फेब्रुवारी १९८६). भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका. त्यांचा जन्म मदुराई ...
लक्ष्मीबाई जाधव (Laxmibai Jadhav)

लक्ष्मीबाई जाधव

जाधव, लक्ष्मीबाई : ( ? १९०१ – ५ मार्च १९६५) हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका. तसेच प्रख्यात बडोदा ...
लालगुडी जयराम ( Lalgudi Jayaraman)

लालगुडी जयराम

लालगुडी जयराम : ( १७ सप्टेंबर १९३० – २२ एप्रिल २०१३ ). कर्नाटक शैलीच्या व्हायोलिनवादनास आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त करून ...
वर्णम् (Varnam)

वर्णम्

वर्ण किंवा वर्णम् हा एकमेवाद्वितीय आणि फक्त कर्नाटक संगीतामध्ये प्रचलित असणारा एक गानप्रकार आहे. हिंदुस्थानी संगीतामध्ये वर्णम् सदृश कोणताही प्रकार ...
वसंत देसाई (Vasant Desai)

वसंत देसाई

देसाई, वसंत कृष्णाजी : (? जून १९१२ – २२ डिसेंबर १९७५). भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक. त्यांचा जन्म सोनवडे, सावंतवाडी, ...