(प्रस्तावना) पालकसंस्था : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड | समन्वयक : वसंत वाघ | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
सध्या ‘अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी)’ ही तंत्रज्ञानाची एक महत्त्वाची स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा पारंपरिक विषयांच्या तुलनेत अब्जांश तंत्रज्ञानाचा उदय तसेच विकास हा गेल्या काही दशकांतील असला तरी त्याचा विकास मात्र झपाट्याने होत आहे. या विषयाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी, त्याचा पायाबद्ध विकास आणि त्याद्वारे समाजाला उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची निर्मिती यासाठी मानवाला विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत वाट पहावी लागली.

भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रिचर्ड फेनमन (Richard Feynman) यांनी त्यांच्या १९५९ मधील भाषणात “देअर इज अ प्लेंटी ऑफ रूम अॅट द बॉटम ” ही संकल्पना मांडली. त्यांनी शास्त्रज्ञांना असे आवाहन केले की, त्यांनी निसर्गाच्या कार्यपद्धतीचे तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातून जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग करून लहानात लहान आकाराचे पदार्थ बनवावेत व त्यापासून विविध यंत्रे आणि उपकरणांची निर्मिती करावी. १९७४ साली ‘नॅनो-टेक्नॉलॉजी’ ही संज्ञा सर्वप्रथम नोरिओ तानिगुची (Norio Taniguchi) यांनी वापरली. नॅनो-टेक्नॉलॉजी या शब्दातील नॅनो हा शब्द nanos या ग्रीक शब्दावरून आला असून त्याचा अर्थ ‘खुजा किंवा छोटा’ असा होतो. कोणत्याही पदार्थाची मिती (लांबी, रुंदी अथवा उंची) मोजण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर अशा एककांचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे अणू,रेणू किंवा त्याहूनही लहान गोष्टींची मिती मोजण्यासाठी नॅनोमीटर (अब्जांश मीटर) या एककाचा वापर केला जातो. एक नॅनोमीटर (नॅमी.) म्हणजेच १/१ अब्ज मीटर. म्हणजेच १ मीटर लांबीच्या तुकड्याचे १ अब्ज समान तुकडे केल्यास त्यातील एका तुकड्याची लांबी एक नॅनोमीटर इतकी असेल. ज्या पदार्थकणांची मिती अंदाजे ०.१ ते १०० नॅमी. असते अशा कणांपासून विविध प्रकारचे पदार्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केले जातात. अशा पदार्थांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याचा विषय म्हणजे ‘अब्जांश विज्ञान (Nanoscience)’ आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान म्हणजेच ‘अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology)’ होय.

अब्जांश तंत्रज्ञान या ज्ञानशाखेला संगणकशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, जैवइंधन, जैवतंत्रज्ञान, कृषिविज्ञान, ऊर्जानिर्मिती, सौरऊर्जा अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये महत्त्व निर्माण झाले आहे. या ज्ञानशाखेच्या आधारे ही क्षेत्रे अधिकाधिक विस्तार पावत आहेत. अब्जांश तंत्रज्ञान ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखेचे महत्त्व सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रयत्न आहे.

अब्जांश तंत्रज्ञानाचा प्राचीन इतिहास (Ancient history of Nanotechnology)

अब्जांश तंत्रज्ञानाचा प्राचीन इतिहास

अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फिलिप्स फाइनमन (Richard Phillips Feynman) यांनी २९ डिसेंबर १९५९ रोजी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे भरलेल्या ...
अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषीक्षेत्रातील उपयोग : प्रस्तावना (Nanotechnology in Agriculture)

अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषीक्षेत्रातील उपयोग : प्रस्तावना

अब्जांश तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्राला लाभलेले एक वरदान आहे. या तंत्रज्ञानामध्ये कृषी व अन्न उद्योग क्षेत्रात प्रचंड बदल घडवून आणण्याची ...
अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषीक्षेत्रामधील उपयोग (Application of Nanotechnology in Agriculture)

अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषीक्षेत्रामधील उपयोग

जागतिक स्तरावर अन्नपदार्थांच्या मागणीमध्ये सातत्त्याने वाढ होत आहे. त्यामुळे अन्न उत्पादन, अन्न सुरक्षा, अन्न वाहतूक इत्यादी बाबतीत अनेक आव्हाने निर्माण ...
अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रातील उपयोग (Nanotechnology in Defence Sector)

अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रातील उपयोग

अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रात अनेकविध उपयोग आहेत. या लेखन नोंदीमध्ये यांबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अब्जांश तंत्रज्ञानाचा सैनिकी क्षेत्रात ...
अब्जांश पदार्थ निर्मिती पद्धती (Production methods of nano substance)

अब्जांश पदार्थ निर्मिती पद्धती

अब्जांश पदार्थ तयार करण्यासाठी ज्या विविध पध्दती वापरतात त्यांचे वर्गीकरण सामान्यत: दोन प्रकारच्या प्रक्रियांमध्ये केले जाते. या प्रक्रिया ‘टॉप डाऊन ...
अब्जांश पदार्थ विषशास्त्र (Nanotoxicology)

अब्जांश पदार्थ विषशास्त्र

अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनात धातूपासून बनविलेले पदार्थ तसेच धातुजन्य पदार्थ यांचा उपयोग केला जात आहे. अठराव्या शतकात सुरू ...
अब्जांश पदार्थांचे जैविक पेशीवर होणारे परिणाम (Effect of nanomaterials on bio-cell)

अब्जांश पदार्थांचे जैविक पेशीवर होणारे परिणाम

अब्जांश पदार्थांचा शिरकाव मानव व इतर सजीवांमध्ये श्वसन, अन्न पदार्थ, त्वचा अशा विविध मार्गांनी होतो. वातावरणातील अब्जांश पदार्थ ओढे, नाले, ...
अब्जांश पदार्थांचे प्राण्यांवरील दुष्परिणाम (Nanotechnology : Side effects related to animals)

अब्जांश पदार्थांचे प्राण्यांवरील दुष्परिणाम

अब्जांश पदार्थांच्या आकार व आकारमानानुसार त्यांचे गुणधर्म बदलत असतात. सजीवांवर होणाऱ्या त्यांच्या दुष्परिणामांची तीव्रताही आकार व आकारमान यांवर अवलंबून असते, ...
अब्जांश प्लाझ्मॉनिक रंगकाम (Nano-Plasmonic Color Printing)

अब्जांश प्लाझ्मॉनिक रंगकाम 

निसर्गातील वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक इत्यादी विविध प्रकारचे सजीव तसेच डोंगर, खडक, माती अशा निर्जीव वस्तू यांमध्ये आपल्याला अनेकविध रंग ...
अब्जांश रोबॉट (Nano-Robot)

अब्जांश रोबॉट

अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियोजित कार्य अचूकतेने, अत्यल्प वेळात व कार्यक्षमतेने करण्यासाठी अब्जांश रोबॉटचा वापर केला जातो. अब्जांश रोबॉट म्हणजे स्वयंचलित ...
अब्जांश लस (Nanovaccine)

अब्जांश लस

लस म्हणजे विशिष्ट रोगाचे मृत किंवा जिवंत अवस्थेतील जंतूंचा अंश असतो. ही लस दिल्यास मानवी शरीरात त्या रोगाचा प्रतिकार करण्याची ...
अब्जांश संवेदके (Nanosensors)

अब्जांश संवेदके

आ.१. पंचेंद्रिये : मानवी संवेदके मानवी शरीराच्या डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या संवेदना ग्रहण केल्या ...
अब्जांश सौंदर्यप्रसाधने (Nanocosmetics)

अब्जांश सौंदर्यप्रसाधने

व्यक्तीचे सौंदर्य व मोहकता वाढविणे आणि सर्वसाधारणपणे व्यक्तीमत्त्वात सुधारणा करणे यांसाठी खासकरून तयार केलेल्या द्रव्यांना किंवा पदार्थांना सौंदर्यप्रसाधने म्हणतात. कालानुरूप ...
अब्जांश स्फटिक संरचना (Structure of Nanocrystals)

अब्जांश स्फटिक संरचना

आधुनिक तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांच्या आधारे विकसित होते. त्यामुळेच अब्जांश तंत्रज्ञानाच्या प्रगतीकरिता ‘अब्जांश-पदार्थ’ विज्ञानाचा सखोल अभ्यास सातत्त्याने होणे आवश्यक ...
ऊर्जा क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology in energy sector)  

ऊर्जा क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान

सामाजिक, आर्थिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांतील विकासात ऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऊर्जेचा अपुरा पुरवठा झाल्यास विकासाचे उपक्रम राबवण्यावर मर्यादा येतात ...
कार्बन अब्जांशनलिका (Carbon Nanotubes)

कार्बन अब्जांशनलिका 

कार्बन अब्जांशनलिका हे कार्बन या मूलद्रव्याचे हिरा, ग्रॅफाइट आणि ग्रॅफिन प्रमाणेच एक बहुरूप आहे. त्याचा शोध १९९१मध्ये जपानच्या सुमिओ इजिमा ...
गंधक अब्जांश कण (Sulphur Nanoparticles)

गंधक अब्जांश कण

गंधक (सल्फर) हे अधातुवर्गीय मूलद्रव्य आहे. त्याच्या अब्जांश कणांची निर्मिती भौतिक, रासायनिक, जैविक अशा विविध पद्धतींनी केली जाते. या कणांच्या ...
ग्रॅफिन (Graphene)

ग्रॅफिन

ग्रॅफिन हे कार्बनच्या ग्रॅफाइट, कोळसा, अब्जांशनलिका आदी बहुरूपकांचे मूळ संरचनात्मक रूप आहे. पूर्णतः कार्बनने घडलेले ग्रॅफिन स्फटिकरुपी असून ते द्विमितीय आहे. ग्रॅफिनचे ग्रॅफाईटशी असलेल्या ...
चलाख धूळ (Smart dust)

चलाख धूळ

अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चलाख धूळ (Smart dust) तंत्रज्ञान होय. चलाख धूळ ही असंख्य सूक्ष्म विद्युत ...
चांदीचे अब्जांश कण (Silver Nanoparticles)

चांदीचे अब्जांश कण

आ. १. चांदीचे अब्जांश कण धातुजन्य अब्जांश कणांमध्ये चांदीच्या [Silver; (Ag)] अब्जांश कणांना अतिशय महत्त्व आहे. चांदीचे अब्जांश कण सामान्यत: ...