(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : माधव राजवाडे | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
भौतिकीमध्ये प्रामुख्याने पदार्थांच्या स्थिती-गतीचा आणि त्यातील बदलांचा विचार केला जातो. तसेच पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सदर कार्यकारणभावाच्या विवेचनातून या शास्त्राचा पाया घातला गेला. हा ज्ञानविकास होताना साधारणतः निरीक्षण ते सिद्धांत हे अनुक्रमे प्रारंभिक व अंतिम टप्पे मानले जातात. या दरम्यान निरीक्षणाबाबत उपपत्ती,प्रयोग, अनुमान असे टप्पे घेत हा प्रवास पूर्ण होतो. अर्थात प्रत्येक वेळेस अशाच मार्गाने भौतिकीमध्ये ज्ञानाची निर्मिती झाली असे मानण्याचे कारण नाही.

भौतिकीच्या प्रगतीत इतर विज्ञानाप्रमाणे, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन विज्ञान असे दोन भाग पडतात. जगातल्या महत्वाच्या संस्कृतींनी भौतिकीबाबत विकसित विचार केल्याची उदाहरणे आढळतात. भारतीय संदर्भात खगोलशास्त्राचा विकास हा महत्वाचा टप्पा आहे. मात्र प्रयोग करून उपपात्तींची सत्यता तपासणे हा आधुनिक विज्ञानातला महत्वाचा घटक प्राचीन विज्ञानात अभावानेच आढळतो.
भौतिकी या विषयाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. सैद्धांतिक –प्रायोगिक किंवा मुलभूत- उपयोजित असे याकडे बघता येईल.तसेच ज्या ज्या परिणामांचे स्पष्टीकरण शोधण्यात आले त्या प्रमाणे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ – विद्युतप्रवाहाचे परिणाम ‘ विद्युत चुंबकत्व’ या शाखेमध्ये अभ्यासले जातात तसेच पदार्थांच्या उष्माविषयक गुणधर्मांची चिकित्सा ‘उष्मा व उष्मागातीकी’ या शाखेत होऊ शकते. तसेच ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास होत गेला त्या त्या संकल्पनांच्या विकासाचा मागोवा घेता येऊ शकतो. भौतिकीच्या ज्ञानमंडळातर्फे मूलभूत भौतिकी, उपयोजित भौतिकी, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयांच्या नोंदी तयार करणे अपेक्षित आहे.

या अनुषंगाने सदर विषयाची खालील दहा उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.
१. स्थितीगतीशास्त्र व वस्तूचे गुणधर्म
२. तरंग व दोलन
३. उष्मा व उष्मागतीकी
४. ध्वनी
५. विद्युत चुंबकत्व
६.न्युक्लीय व कण भौतिकी
७. आण्विक व रेणूभौतिकी
८.घन अवस्था भौतिकी
९. प्रकाशकी
१०. आंतरशाखीय भौतिकी
११.खगोलशास्त्र व खगोलभौतिकी
१२..विश्वरचनाशास्त्र व सापेक्षता
१३.पुंज भौतिकी
अर्थातच या उपविभागांचे अजून उप-उपविभाग आहेत. ह्या रचनेचे बलस्थान हे की त्यामुळे तुकड्या- तुकड्यातील ज्ञानाचा एकसंधपणा अधोरेखित होतो. अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या अथक संघर्षामुळेच भौतिकीच्या ज्ञानशाखांचा हा व्यासंग आपल्याला शक्य होतो आहे. त्यांचे ऋण मनी ठेवत भौतिकी विषयाबाबत उत्सुकता बाळगणाऱ्या सर्व जिज्ञासू वाचकांचे ज्ञानमंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत!.

सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families)

सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे

सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families) : सॅरोस चक्र किंवा ग्रहणांची कुटुंबे हा ग्रहण विषयातील एक कुतूहलाचा ...
सेंटॉर लघुग्रह (Centaur Asteroids)  

सेंटॉर लघुग्रह

सेंटॉर लघुग्रह ‘सेंटॉर’ म्हणजे वरचे अर्धे शरीर मानवी आणि खालचे अर्धे शरीर आणि पाय घोड्याचे असणारा ग्रीक पुराण कथांमधील ...
स्थानिक याम्योत्तर वृत्त (Local Meridian)

स्थानिक याम्योत्तर वृत्त

स्थानिक याम्योत्तर वृत्त: निरीक्षकाच्या थेट ऊर्ध्वबिंदूतून (Z) (अंगणात उभे असताना निरीक्षकाच्या थेट डोक्यावर असणारा बिंदू ; Zenith) आणि उत्तर व दक्षिण ...
स्थिति समीकरण (State equation)

स्थिति समीकरण

भौतिकी हे निसर्गातील विविध प्रणालींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या प्रणाल्या विविध प्रकारच्या असू शकतात. उदा., एखाद्या डब्यात बंद करून ...
स्थितिस्थापकतेचा आयतन मापांक (Bulk Modulus of elasticity)

स्थितिस्थापकतेचा आयतन मापांक

(अंकीय स्थिरांक, Numerical constant). आयतन मापांक घन पदार्थाच्या (Solid) अथवा द्रायूच्या (fluid) लवचिकता (elasticity) या महत्त्वाच्या गुणधर्मावर भाष्य करतो.
एखाद्या ...
हायड्रोजन बाँब (Hydrogen Bomb)

हायड्रोजन बाँब

(ऊष्मीय अणुकेंद्रीय बाँब; अणुकेंद्रीय संघटन बाँब). अणुकेंद्रीय स्फोटामध्ये मुख्यतः भंजन (अणुकेंद्र फुटणे; Fission) किंवा संघटन (दोन अणुकेंद्रांचा संयोग होणे; Fusion) ...
हॅड्रॉन (Hadron)

हॅड्रॉन

सर्व प्रकारच्या मूलभूत आंतरक्रियांमध्ये भाग घेणाऱ्या कणांना हॅड्राॅन (Hadron) म्हणतात. हॅड्राॅनची उदाहरणे म्हणजे अणुकेंद्रात असलेले प्रोटॉन (Proton; ) आणि न्यूट्रॉन (Neutron; ) ...
होरा किंवा विषुवांश (Right Ascension ‍= R.A.)

होरा किंवा विषुवांश

होरा किंवा विषुवांश : होरा (विषुवांश किंवा वैषुवांश) हा वैषुविक सहनिर्देशक पद्धतीतील एक सहनिर्देशक आहे. एखादा तारा वैषुविकवृत्ताच्या संदर्भात किती ...