(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

सावळदा संस्कृती (Savalda Culture)

सावळदा संस्कृती

सावळदा संस्कृती : (इ. स. पू. २५००–२०००). महाराष्ट्रातील आद्य शेतकर्‍यांची एक सर्वांत जुनी संस्कृती. इ. स. पू. २५०० च्या सुमारास ...
साहेलान्थ्रोपस (Sahelanthropus tchadensis)

साहेलान्थ्रोपस

साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिस हे मानवी उत्क्रांतीशी संबधित एका प्रायमेट प्रजातीचे नाव आहे. मानवी पूर्वजांच्या संदर्भात या प्रजातीचे जीवाश्म सध्या सर्वांत प्राचीन ...
सिएरा दे अतापुएर्का (Sierra de Atapuerca)

सिएरा दे अतापुएर्का

यूरोप खंडातील स्पेनमधील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. अलीकडे विसाव्या शतकात स्पेनमधील बर्गोस प्रांतामध्ये सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगांमध्ये मीटर रूळांतर (मीटर ...
सिरिएशन (Seriation)

सिरिएशन

सिरिएशन याचा अर्थ क्रमनिर्धारण अथवा कोणत्याही एखाद्या निश्चित गुणधर्माचा वापर करून वस्तूंची विशिष्ट क्रमाने मांडणी करणे. या तंत्राचा उपयोग कालमापनासाठी ...
सी. जे. थॉमसन (C. J. Thomsen and The Three Age System)

सी. जे. थॉमसन

थॉमसन, सी. जे. : (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५). डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक. पूर्ण नाव ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन ...
सीमा डेल एलिफान्टे (Sima del Elefante)

सीमा डेल एलिफान्टे

स्पेनमधील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ. विसाव्या शतकात यूरोपमधील आयबेरिअन द्वीपकल्पात (पोर्तुगाल आणि स्पेन) स्पेनमधील बर्गोस प्रांतामधील सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगामध्ये ...
सेपियन मानव (Homo sapiens)

सेपियन मानव

विचार करणारा, प्रगल्भ बुद्धिप्रधान, प्रत्यक्षात शारीरिक दृष्ट्या अधिक प्रगत असलेला आधुनिक मानव. त्यालाच शास्त्रीय भाषेत ‘सेपियन मानव’ (होमो सेपियन) असे ...
सोमनाथ (Somnath)

सोमनाथ

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे गुजरातच्या गीर जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र सोमनाथ पाटण, प्रभासपाटण व ...
स्टार कार (Star Carr)

स्टार कार

इंग्लंडमधील जगप्रसिद्ध मध्याश्मयुगीन (मेसोलिथिक) पुरास्थळ. ते उत्तर यॉर्कशायर परगण्यात स्कारबोरो या गावाच्या  दक्षिणेस ७ किमी. अंतरावर असून कुजून रूपांतर झालेल्या ...
स्त्रीवादी पुरातत्त्व (Feminist Archaeology)

स्त्रीवादी पुरातत्त्व

स्त्रीवादी पुरातत्त्व हा पुरातत्त्वीय पुराव्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून अर्थ लावण्याचा आग्रह धरणारी संमिश्र स्वरूपाची विचारधारा असून ती पुरातत्त्वविद्येची एकसंध अशी शाखा ...
स्वार्टक्रान्स गुहा (Swartkrans Cave)

स्वार्टक्रान्स गुहा

दक्षिण आफ्रिकेतील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय आणि जागतिक वारसा स्थळ. मानवजातीच्या उत्क्रांतीसंदर्भात दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गच्या (जोहॅनिसबर्ग) पश्चिमेस स्थित काही महत्त्वपूर्ण ...
हसमुख धीरजलाल सांकलिया (Hasmuskh Dhirajlal Sankalia)

हसमुख धीरजलाल सांकलिया

सांकलिया, हसमुख धीरजलाल : (१० डिसेंबर १९०८ – २८ जानेवारी १९८९). आधुनिक भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. त्यांचे ...
हायडल्बर्ग मानव (Homo heidelbergensis)

हायडल्बर्ग मानव

एक लुप्त पुरातन मानवी जाती. सु. ७ लाख ते २ लाख वर्षपूर्व या काळात अस्तित्वात असलेल्या या जातीच्या जीवाश्मांचा शोध ...
हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन ही निरपेक्ष कालमापनाची एक पद्धत असून ती प्रामुख्याने चतुर्थक कालखंडातील हिमयुगाशी निगडित घटनांच्या कालमापनासाठी उपयुक्त ठरली आहे ...
हॅबिलिस मानव (Homo habilis)

हॅबिलिस मानव

मानवी जीवाश्मांतील सर्वांत प्राचीन जाती. पुरामानवशास्त्रामध्ये ही जाती एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. टांझानियातील पुराणाश्मयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओल्डुवायी गॉर्ज ...
हॉवर्ड कार्टर (Howard Carter) 

हॉवर्ड कार्टर

कार्टर, हॉवर्ड : (९ मे १८७४–२ मार्च १९३९).  ईजिप्तचा राजा (फॅरो) तुतानखामेन (तूतांखामेन) याचे थडगे शोधणारे ईजिप्तविद्या अभ्यासक व पुरातत्त्वशास्त्रात ...
ॲन्टेसेसर मानव (Homo antecessor)

ॲन्टेसेसर मानव

इरेक्टस मानवाप्रमाणे पश्चिम व मध्य यूरोपमधील सर्वांत प्राचीन मानव जाती. ‘ॲन्टेसेसर’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अग्रणी’, ‘प्रारंभी बसणारा’ ...
ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती (Amino acid Dating)

ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती

प्राचीन हाडे, जलचर प्राण्यांचे अवशेष यांचे कालमापन करण्याची एक पद्धती. हाडांमधील सेंद्रिय घटकातील बदलावर ती आधारलेली आहे. सेंद्रिय संयुगांमध्ये अनेकदा ...