(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

ॲन्टेसेसर मानव (Homo antecessor)

ॲन्टेसेसर मानव

इरेक्टस मानवाप्रमाणे पश्चिम व मध्य यूरोपमधील सर्वांत प्राचीन मानव जाती. ‘ॲन्टेसेसर’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अग्रणी’, ‘प्रारंभी बसणारा’ ...
ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती (Amino acid Dating)

ॲमिनो अम्ल कालमापन पद्धती

प्राचीन हाडे, जलचर प्राण्यांचे अवशेष यांचे कालमापन करण्याची एक पद्धती. हाडांमधील सेंद्रिय घटकातील बदलावर ती आधारलेली आहे. सेंद्रिय संयुगांमध्ये अनेकदा ...