(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

कुलशेखरपट्टणम (Kulasekharapattinam)

कुलशेखरपट्टणम

तमिळनाडूतील एक मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे तमिळनाडूतील थुथूकुडी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर थिरूचेंदूरच्या दक्षिणेस १४ किमी. अंतरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे प्राचीन बंदर ...
कूबी फोरा (Koobi Fora)

कूबी फोरा

पूर्व आफ्रिकेच्या केन्या (केनिया) येथील रूडॉल्फ (तुर्काना) सरोवर भागातील एक विख्यात पुराजीवशास्त्रीय स्थळ. कूबी फोरा हे मानवजातीच्या उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी जगातील ...
के. पदय्या (K. Paddayya)

के. पदय्या

पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली ...
केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स (Kenyanthropus platyops)

केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स

केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. केनियात लेक तुर्कानाच्या पश्चिमेला लोमेक्वी येथे ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह लिकी यांना चपटा ...
कॉस्के गुहा (Cosquer Cave)

कॉस्के गुहा

फ्रान्समधील एक प्रसिद्ध गुहा. प्रागैतिहासिक काळात समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली असताना मानवाने वसती केली होती, त्याचे अवशेष आता पाण्यात ...
कोट्टापुरम (Kottapuram)

कोट्टापुरम

केरळमधील मेरीटाइम पुरातत्त्वीय स्थळ. कोट्टापुरमचा किल्ला केरळमधील त्रिसूर जिल्ह्यात कोडुंगलूर गावाच्या पूर्वेस ५ किमी. अंतरावर पेरियार नदीच्या मुखाजवळ उत्तर तीरावर ...
क्वाटर्नरी युग (चतुर्थ कल्प) (Quaternary Period)

क्वाटर्नरी युग

क्वाटर्नरी युग (चतुर्थ कल्प) : (२.५ दशलक्ष वर्षपूर्व ते आजपर्यंत). भूशास्त्रात पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास अनेक महाकल्प आणि युगे यांत विभागला ...
खलकत्तापटणा (Khalkattapatna)

खलकत्तापटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे कुशभद्रा नदीच्या मुखाजवळ असून कोणार्कच्या सूर्यमंदिरापासून पूर्वेला ११ किमी. अंतरावर आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन ...
गुडरुन कॉर्व्हिनस (Gudrun Corvinus)

गुडरुन कॉर्व्हिनस

कॉर्व्हिनस, गुडरुन : (१४ डिसेंबर १९३१ — १ जानेवारी २००६). जर्मन प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पोलंडमध्ये श्टेट्सीन (श्टेटीन) येथे झाला ...
गुन्हेगार जहाजबुडीचे पुरातत्त्व (Convict Ship Archaeology)

गुन्हेगार जहाजबुडीचे पुरातत्त्व

पुरातत्त्वीय अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग. सर्व वसाहतवादी यूरोपीय देशांनी सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी आपल्या देशातील ...
गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व (Archaeology of Penal Settlements)

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात गुन्हेगारांच्या वसाहतींचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून विशेष अभ्यास केला जातो ...
गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व (Archaeology of Gulag Camps)

गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व

सोव्हिएत महासंघात असलेल्या कैदी छावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाला गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व असे म्हटले जाते. हे बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचे विशेष क्षेत्र आहे ...
गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व (Archaeology of Slavery)

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. माणसांची खरेदी-विक्री, दास्यत्व आणि गुलामगिरी हे प्राचीन काळापासून ...
गोपकपट्टण (गोवा वेल्हा) (Gopakapattan)

गोपकपट्टण

गोव्यातील मेरिटाइम आणि मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. सध्याचे गोवा वेल्हा. हे स्थळ झुआरी नदीच्या मुखाजवळ आहे. सन १०४९ मध्ये राजा वीरविक्रमदेव ...
गौरांगपटणा (Gaurangapatna)

गौरांगपटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे ...
ग्रेगरी एल. पोशेल (Gregory L. Possehl)

ग्रेगरी एल. पोशेल

पोशेल, ग्रेगरी लुई : (२१ जुलै १९४१–८ ऑक्टोबर २०११). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. दक्षिण आशियातील पुरातत्त्वविश्वात ग्रेग पोशेल या ...
घोघा (Ghogha)

घोघा

गुजरातमधील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. गोघा हे प्राचीन बंदर असून ते खंबातच्या आखाताच्या किनाऱ्यावर सध्याच्या भावनगर बंदरापासून १५ किमी. अंतरावर आहे ...
चतालहुयुक (Catalhuyuk)

चतालहुयुक

तुर्कस्तानच्या (सध्याचे नाव तुर्की) दक्षिण ॲनातोलिया प्रांतातील एक पुरातत्त्वीय स्थळ आणि जागतिक वारसास्थळ. नवाश्म व ताम्रपाषाणयुगातील आद्य शेतकऱ्यांची मोठी वसाहत ...
छद्मपुरातत्त्व (Pseudoarchaeology)

छद्मपुरातत्त्व

छद्मपुरातत्त्व अथवा भ्रामक पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची अधिकृत शाखा नसून हा एक वैचारिक गैरप्रकार अथवा खोटेपणा आहे. विश्वसनीय पुरातत्त्वीय माहितीचा चुकीचा ...
जगतपती जोशी

जोशी, जगतपती : (१४ जुलै १९३२ – २७ जून २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक व सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांचे ...