(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मानवी संस्कृतीची वाटचाल गेली किमान २५ लक्ष वर्षे सुरू आहे. वर्तमानकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल, ही मानवाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही; कारण लेखनकला ही तुलनेने अलीकडील पाच-सहा हजार वर्षांमधील आहे. तत्पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वविद्या उपयोगी पडते. प्राचीन मानवाचा वावर असलेल्या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून मानवी वसाहतींच्या समग्र सांस्कृतिक इतिहासाची मांडणी करण्याचे काम पुरातत्त्वविद्या करते. आता पुरातत्त्वविद्येचे स्वरूप केवळ पुराणवस्तू संशोधन आणि कलात्मक वस्तूंचे वर्णन नसून ती एक इतिहासाला मदत करणारी, स्वतंत्र ज्ञानशाखा आहे.

पुरातत्त्वविद्येमध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण व उत्खनन करून अवशेष जमा केले जातात. उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अर्थान्वय विविध वैज्ञानिक अनेक ज्ञानशाखांची मदत घेऊन करतात. केवळ छंद अथवा अर्थप्राप्तीच्या लोभातून प्रारंभ झालेली पुरातत्त्वविद्या एकविसाव्या शतकात किती आणि कशी विकसित झाली, याचा परामर्श प्रस्तुत ज्ञानमंडळ घेणार आहे. पुरातत्त्वविद्येची व्याप्ती मोठी आहे. तसेच पुरातत्त्वविद्येची स्वतंत्र उद्दिष्टे असून स्वतंत्र संशोधनपद्धती आहे. पुरातत्त्वविद्येच्या वैकासिक उत्क्रांतीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या अभ्यासकांची व महत्त्वाच्या प्रसिद्ध उत्खनित पुरातत्त्वीय स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न हे ज्ञानमंडळ करेल.

इतिहासपूर्व काळाला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधितात. याच काळात शिकार करून व अन्न गोळा करून राहणाऱ्या मानवी समूहांमधून अन्न निर्माण करण्याचे तंत्र अवगत केलेल्या आणि एका जागी स्थिर झालेल्या मानवी संस्कृतींचा विकास झाला. प्रागैतिहासिक काळामध्ये म्हणजे सुमारे पंचवीस लक्ष वर्षे ते आजपासून अंदाजे दहा हजार वर्षे पूर्वीपर्यंतच्या कालखंडात घडलेल्या मानवी संस्कृतीमधील विविध बदलांचा मागोवा हे ज्ञानमंडळ घेईल.

आद्य ऐतिहासिक कालखंडात मानवाने पशुपालन व शेती करण्यास सुरुवात केली. यामुळे मानवाचे जीवन स्थिर झाले व मोठ्या वसाहती तयार झाल्या. शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त धान्य उत्पादनाची साठवणूक करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि त्यांचा वापर देवघेव करण्यासाठी केला गेला. यातूनच पुढे व्यापार सुरू झाला आणि मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली. ह्याचे उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती होय. आद्य ऐतिहासिक कालखंड हा दहा हजार वर्षे ते दोन हजार वर्षे असा आहे. या दरम्यान सिंधू संस्कृती, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि नवाश्मयुगीन संस्कृतीचा उगम तसेच विकास कसा होत गेला, याचाही मागोवा या ज्ञानमंडळाद्वारे घेतला जाईल.

जाक बुशे दी पर्थ (Jacques Boucher de Perthes)

जाक बुशे दी पर्थ

दी पर्थ, जाक बुशे : (१० सप्टेंबर १७८८– ५ ऑगस्ट १८६८). प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि भूविज्ञान यांची सांगड घालणारे हौशी फ्रेंच ...
जिओव्हान्नी बेल्झोनी (Giovanni Belzoni)

जिओव्हान्नी बेल्झोनी

बेल्झोनी, जिओव्हान्नी : (५ नोव्हेंबर १७७८ – ३ डिसेंबर १८२३). प्रसिद्ध इटालियन शोधक, अभियंता व हौशी पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म इटलीतील ...
जी. आर. शर्मा (G. R. Sharma)

जी. आर. शर्मा

शर्मा, गोवर्धन राय : (१३ ऑगस्ट १९१९–११ नोव्हेंबर १९८६). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि इतिहासकार. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील ...
जुझेप्पे फिओरेल्ली (Giuseppe Fiorelli)

जुझेप्पे फिओरेल्ली

फिओरेल्ली, जुझेप्पे : (८ जून १८२३–२८ जानेवारी १८९६). जुझेप्पे फ्योरेल्ली. पुरातत्त्वविद्येला आधुनिक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एकोणिसाव्या शतकातील इटालियन पुरातत्त्वज्ञ ...
जे. डेस्मंड क्लार्क (J. Desmond Clark)

जे. डेस्मंड क्लार्क

क्लार्क, जॉन डेस्मंड : (१० एप्रिल १९१६ – १४ फेब्रुवारी २००२). विख्यात इंग्लिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांच्या ...
जे. सी. ग्यरदाँ (Jean-Claude Gardin)

जे. सी. ग्यरदाँ

ग्यरदाँ, जाँ-क्लुड : (३ एप्रिल १९२५ – ८ एप्रिल २०१३). पुरातत्त्वीय सिद्धांतात योगदान देणारे आणि पुरातत्त्वीय संशोधनात गणित, तर्कशास्त्र आणि ...
जेकब स्पॉन (Jacob Spon)

जेकब स्पॉन

स्पॉन, जेकब : (७ जानेवारी १६४७ – २५ डिसेंबर १६८५). जाक स्पॉन. पुरातत्त्वविद्येच्या उगमकाळात सर्वप्रथम भूतकाळाच्या अभ्यासासाठी ‘पुरातत्त्वʼ हा शब्द ...
जेन्स जेकब अस्मुसेन वोर्से (Jens Jacob Asmussen Worsaae)

जेन्स जेकब अस्मुसेन वोर्से

वोर्से, जेन्स जेकब अस्मुसेन : (१४ मार्च १८२१–१५ ऑगस्ट १८८५). एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक आधारावर पुरातत्त्वशास्त्राची पायाभरणी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे ...
जेरोम जेकबसन (Jerome Jacobson)

जेरोम जेकबसन

जेकबसन, जेरोम : (१३ जून १९३० – २१ ऑगस्ट २०२०). दक्षिण आशियाई पुरातत्त्व आणि विशेषतः भारतीय प्रागैतिहासिक पुरातत्त्वाच्या क्षेत्रात योगदान ...
जैवपुरातत्त्वविज्ञान

प्राचीन मानवी वसाहतींच्या उत्खननात मानव, मानवेतर प्राणी व वनस्पतींचे अवशेष मिळतात. अशा अवशेषांचा सविस्तर अभ्यास करणाऱ्या पुरातत्त्वविद्येच्या शाखेला जैवपुरातत्त्वविज्ञान असे ...
जैविक मानवशास्त्र ( Biological Anthropology )

जैविक मानवशास्त्र

प्राचीन काळी अनेक मानवसमूहांमध्ये मृतांचे दफन केले जात असे. काही संस्कृतींमध्ये मृत शरीरावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून ते जतन करण्याची ...
जॉन ऑब्रे (John Aubrey)

जॉन ऑब्रे

ऑब्रे, जॉन : (१२ मार्च १६२६ – ७ जून १६९७). प्रसिद्ध इंग्लिश लेखक व पुरावस्तू संग्राहक. त्यांचा जन्म विल्टशायर परगण्यातील ...
जॉन फ्रेरे (John Frere)

जॉन फ्रेरे

फ्रेरे, जॉन : (१० ऑगस्ट १७४०–१२ जुलै १८०७). प्रागैतिहासिक पुरातत्त्व शाखेची संकल्पनात्मक पायाभरणी करणारे अठराव्या शतकातील ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ व राजकीय ...
झैनुद्दिन अन्सारी (Z. D. Ansari)

झैनुद्दिन अन्सारी

अन्सारी, झैनुद्दिन दाऊद : (१९२३–१८ फेब्रुवारी १९९८). डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाच्या वाढीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे व भारतातील एक अग्रगण्य क्षेत्रीय ...
टी. सी. शर्मा (T. C. Sharma)

टी. सी. शर्मा

शर्मा, तरुणचंद्र : (११ एप्रिल १९२९ – १७ नोव्हेंबर २०११). ईशान्य भारतात महत्त्वाचे संशोधन करणारे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा ...
ट्रॉय (Troy)

ट्रॉय

तुर्कस्तानातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. सध्याचे हिसार्लिक. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या मुखापासून आग्नेयीस सु. साडेसहा किमी.वर ते वसले आहे. ट्रोजा, इलीऑन, ट्रोॲस, ...
डिकिका बालक (Dikika baby) Selam (Australopithecus)

डिकिका बालक

डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म ...
डेक्कन कॉलेज, पुणे (Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune)

डेक्कन कॉलेज, पुणे

अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असलेली भारतातील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था. संस्थेची स्थापना ‘द हिंदू कॉलेजʼ या नावाने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ...
डेव्हिड क्लार्क (David L. Clarke)

डेव्हिड क्लार्क

क्लार्क, डेव्हिड लिओनार्ड : (३ नोव्हेंबर १९३७ – २७ जून १९७६). नवपुरातत्त्व विचारधारेचे अग्रणी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील केंट ...
तप्तदीपन (प्रदीपन) कालमापन पद्धती (Thermoluminescence dating)

तप्तदीपन

पुरातत्त्वामध्ये उत्खननात सापडणार्‍या अवशेषांत भाजलेल्या मातीच्या अनेक वस्तू सापडतात. त्यांच्या कालमापनासाठी उपयोगी पडणारी ही भौतिकी-रासायनिक पद्धती आहे. या पद्धतीला औष्णिक ...