(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
मानवी मनाबाबत सर्वांनाच अतिशय कुतूहल असते. माणसाचे मन कशा प्रकारे काम करते? आपल्याला इतरांचे मन समजू शकते का? आपल्या मनामध्ये आपल्याला बदल घडवता येतात का? मानसशास्त्रीय चाचण्या कशा असतात आणि त्यांचा वापर कसा करतात? यासारखे अनेक प्रश्न पडतात. यासारख्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मानसशास्त्रज्ञ करतात. मानसशास्त्र हे मानवी मन आणि त्याच्या प्रक्रिया यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करते. मानसशास्त्र ज्याप्रमाणे मनाचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याप्रमाणे ते जीवनोपयोगी असे उपयोजित शास्त्रसुद्धा आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक आणि व्यावसायिक यांना मानसशास्त्रज्ञ म्हंटले जाते. ते ज्या विशिष्ट विषयात काम करतात त्यानुसार त्यांची सामाजिक, चिकित्सा, संघटन आणि औद्योगिक, बोधनिक, शैक्षणिक आणि सल्ला व मार्गदर्शन मानसशास्त्रज्ञ इत्यादीप्रकारे वर्गवारी केली जाते. मनाचा अभ्यास करताना मानसशास्‍त्रामध्ये मेंदूच्या व जैविक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रज्ञ मनाच्या निरनिराळ्या क्रियांची माहिती मिळविण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात.

मानसशास्त्राच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बोधनिक, व्यक्तिमत्त्व, सामाजिक, मनोगतीकीय, वार्तनिक, भावना, प्रेरणा, समष्टी, मानवता आणि अस्तित्ववादी, चेतामानसशास्त्र, वैकासिक, लिंगभाव, सकारात्मक, संस्कृतीचे मानसशास्त्र अशा अनेक मुलभूत/सैद्धांतिक शाखा आहेत. तसेच चिकित्सा, समुपदेशन, संघटन आणि औद्योगिक, उपयोजित, सामाजिक, मानसिक, शारीरिक, आरोग्य, समूह, शैक्षणिक, पर्यावरण व पर्यावरण संवर्धन, सैनिकी, सामाजिक बदलाचे मानसशास्त्र इत्यादी उपयोजित शाखा आहेत. अर्थवर्तन, राजकीय, उत्क्रांती यांसारख्या अनेक आंतरविद्याशाखीय विषयांचा अभ्यासही यात केला जातो. वरील सर्व विद्याशाखांमार्फत मानवी प्रक्रियांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो.

मराठी विश्वकोशाच्या मानसशास्त्राच्या या ज्ञानमंडळात मानसशास्त्रातील संकल्पना, मानसशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत, विशेष मानसशास्त्रज्ञांची चरित्रे, मानसशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखा व उपशाखा आणि मानसिक विकृती अथवा आजार या पाच प्रकारांच्या मुख्य वर्गवारीमध्ये मानसशास्त्रीय नोंदी पहावयास मिळतील.

विल्यम जेम्स (William James)

विल्यम जेम्स

जेम्स, विल्यम : (११ जानेवारी १८४२ –१९ ऑगस्ट १९१०). प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व फलप्रामाण्यवादाचा एक संस्थापक. जन्म न्यूयॉर्क येथे. पित्याचे ...
व्यक्तिमत्त्वाचा पंचघटक सिद्धांत (Five Factor Model)

व्यक्तिमत्त्वाचा पंचघटक सिद्धांत

हा व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेतील एक महत्त्वाचा गुण विशेष (trait) सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्वाचे पाच प्रमुख घटक आहेत ...
व्हिल्हेल्म व्हुंट (Wilhelm Wundt)

व्हिल्हेल्म व्हुंट

व्हुंट, व्हिल्हेल्म : (१६ ऑगस्ट १८३२–३१ ऑगस्ट १९२०). जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. शरीरक्रियावैज्ञानिक. प्रायोगिक मानसशास्त्राचे अध्वर्यू. मॅनहाइमजवळील (Mannheim) नेकाराऊ (Neckarau) ...
व्हिल्हेल्म श्टेकेल (Wilhelm Stekel)

व्हिल्हेल्म श्टेकेल

श्टेकेल, व्हिल्हेल्म वुल्फ : (१८ मार्च १८६८–२७ जून १९४०). ऑस्ट्रियन मानसोपचारतज्ज्ञ. जन्म रूमानियातील चेरनॉव्ह्त्सी ह्या शहरी. व्हिएन्ना येथे त्याने वैद्यकाचे ...
शाक्खटर - सिंगर भावनेचा सिद्धांत (Schachter-Singer Emotional Theory)

शाक्खटर – सिंगर भावनेचा सिद्धांत

हा भावनेचा बोधनिक सिद्धांत आहे. भावनांच्या अभ्यासाविषयी जी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत त्यांना भावनेचे सिद्धांत म्हणतात. भावनेचे विविध सिद्धांत विविध ...
श्राव्य संवेदनिक स्मृति (Echoic Sensory Memory)

श्राव्य संवेदनिक स्मृति

अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. ही स्मृती सर्व प्रकारच्या ध्वनींची नोंद करते. जसे की भाषण, कुत्र्याचे भुंकणे आणि आपत्कालीन वाहनांचे आवाज ...
समूहविचार (Groupthink)

समूहविचार

सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वाची विचारपद्धती. समाजात वावरत असताना इतर व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह यांच्याशी आपला संपर्क येत असतो. परस्परांचा सहवास व ...
संवेदनिक स्मृति (Sensory Memory)

संवेदनिक स्मृति

मानवी अल्पकालिक स्मृती किंवा स्मृतीचा एक प्रकार. मानवी स्मृतीचा अभ्यास करून मानसशास्त्रज्ञांनी सुरुवातीला तिचे दोन विभागांत वर्गीकरण केले, ते म्हणजे ...
स्व-आदरभाव (Self-Esteem)

स्व-आदरभाव

स्व-आदरभाव ही संकल्पना मानसशास्त्राच्या व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र या शाखेमधील एक महत्त्वाची संकल्पना आहे. स्व आदरभाव हा मानवी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण घटक ...
स्वीकार आणि बांधिलकी उपचारपद्धती  (ACT –Acceptance and Commitment Therapy)

स्वीकार आणि बांधिलकी उपचारपद्धती 

ही एक मानसोपचारपद्धती आहे. हिचे उगमस्थान बोधात्मक उपचारपद्धतीत आहे. मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्हन सी. हेझ (Steven C. hayes) यांनी १९८२ साली ही ...