(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

सीमोर बेन्झर (Seymour Benzer)

सीमोर बेन्झर

सीमोर बेन्झर बेन्झर, सीमोर : (१५ ऑक्टोबर १९२१ — ३० नोव्हेंबर २००७). अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि रेणवीय जीवशास्त्रज्ञ. बेन्झर यांचा जन्म ...
सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज (Severo Ochoa de Albornoz)

सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज

आल्बोर्नोज, सीवीरो ओचोआ द : (२४ सप्टेंबर १९०५ – ०१ नोव्हेंबर १९९३) सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज यांचा जन्म स्पेनच्या किनारपट्टीवर लुआर्का ...
सुकुमार रामन (Sukumar Raman)

सुकुमार रामन

रामन, सुकुमार :  ( ३ एप्रिल १९५५ ) सुकुमार रामन यांचा जन्म चेन्नई येथे झाला.  त्यांना लहानपणापासून जंगले आणि वन्य प्राण्यांची ...
सुखदेव पवन (Sukhadev Pawan)

सुखदेव पवन

पवन सुखदेव : ( ३० मार्च, १९६० ) पवन सुखदेव यांचा जन्म नवी दिल्ली येथे १९६० साली झाला. बालपणीच त्यांना ...
सुदीप्ता सेनगुप्ता (Sudipta Sengupta)

सुदीप्ता सेनगुप्ता

सेनगुप्ता, सुदीप्ता : (२० ऑगस्ट १९४६). भारतीय भूशास्त्र वैज्ञानिक. अदिती पंत यांच्यासह अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत ...
सुब्बाराव यल्लाप्रगडा (Subbarao Yellapragada)

सुब्बाराव यल्लाप्रगडा

यल्लाप्रगडा सुब्बाराव : (१२ जानेवारी १८९५ – ८ ऑगस्ट १९४८) यल्लाप्रगडा यांचा जन्म १२ जानेवारी १८९५ या दिवशी  ब्रिटिश राजवटीतील मद्रास ...
सुरय्या हसन-बोस (Suraiya Hasan-Bose) 

सुरय्या हसन-बोस

हसन-बोस सुरय्या : (१९२८ – ३ सप्टेंबर २०२१) सुरय्या हसन-बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण हैद्राबाद येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ...
सुरेखा झिंगाडे (Surekha Zingade)

सुरेखा झिंगाडे

झिंगाडे, सुरेखा  : (४ मार्च १९५१).  भारतीय जीवरसायनशास्त्र आणि पेशी आवरण अभ्यासक. त्यांचे कर्करोगासंदर्भातील जीवशास्त्र, रक्ताच्या कर्करोगाशी संबंधित मज्जारज्जू, पेशी ...
सुलिव्हन, डेनिस, पारनेल (Sullivan, Dennis Parnell)

सुलिव्हन, डेनिस, पारनेल

सुलिव्हन, डेनिस, पारनेल : (१२ फेब्रुवारी, १९४१) अमेरिकन गणिती सुलिव्हन यांचा जन्म पोर्ट ह्युरॉन, मिशिगन येथे झाला. ह्युस्टन, टेक्सास येथे प्राथमिक ...
सुश्रुत (Sushrut)

सुश्रुत

सुश्रुत :  (अंदाजे ६०० ते ५१२) आयुर्वेदशास्त्रामधे अतुलनीय योगदान देणाऱ्या संशोधकांमध्ये सुश्रुताचार्यांची गणना होते. त्यांचा  कार्यकाळ इ.स.पूर्व ६०० ते ५१२ ...
सुसुमू टोनागावा (Susumu Tonegawa)

सुसुमू टोनागावा

टोनागावा, सुसुमू : (५ सप्टेंबर, १९३९) सुसुमू टोनगावा यांचा जन्म जपानमधील नागोया येथे झाला. टोनगावांचे प्राथमिक शिक्षण टोकियोमधील हिबिया हायस्कूल ...
सॅम्युअल कोउ (Samuel Kou)

सॅम्युअल कोउ

कोउ, सॅम्युअल : (१९७४ -) सॅम्युअल कोउ यांचे बालपण चीनमधील लांझ्हाउ या अतिदुर्गम डोंगराळ भागात गेले. माध्यमिक शाळेत कोऊ यांनी गणित ...
सेंगर, फ्रेडरिक ( Sanger, Fredrick )

सेंगर, फ्रेडरिक

सेंगर, फ्रेडरिक : (१३ ऑगस्ट, १९१८ – १० नोव्हेंबर, २०१३)                      ...
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए ( Center for Disease Control and Prevention, USA)

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए 

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, यूएसए. : ( स्थापना १९४६ ) मलेरियाच्या परजीवी जीवाणूने यूरोपिअन लोकांच्या बरोबर अमेरिकेत प्रवेश केला ...
सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Center For Microbiology and Biotechnology Research and Training Institute )

सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 

सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट :  सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही ...
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी (Centre for cellular and Molecular Biology – CCMB)

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी : (स्थापना – १९७७) वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या केंद्र सरकारच्या  संस्थेच्या अंतर्गत ...
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिर्कोट)(Central Institute for Research on   Cotton Technology – CIRCOT)

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सिर्कोट) (स्थापना – १९२४)  इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी या संस्थेने टेक्नॉलॉजीकल लॅबोरेटरी या छोट्या ...
सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटऑफ इंडिया, सीएलआरआय (Central Leather Research Institute of India, CLRI)

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटऑफ इंडिया, सीएलआरआय

सीएलआरआय सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट ( CLRI ) ही  जगातील सर्वांत मोठी चर्म संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना २४ ...
सेंट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट (Central Soil Salinity Reserch Institute – CSSRI)

सेंट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट

सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना – मे, १९६९ )        सेंट्रल  सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूटची ...
सेमेरेद, ई. (Szemeredi, Endre)

सेमेरेद, ई.

सेमेरे, . : (२१ ऑगस्ट, १९४०) हंगेरियन–अमेरिकन गणिती सेमेरेद यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. तेथील इओट्वोस लॉंरंड विद्यापीठातून (Eötvös Lorand ...