(प्रस्तावना) पालकसंस्था : दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर | समन्वयक : श्रीनिवास वडगबाळकर | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
पृथ्वीच्या सर्व भागांची माहिती मिळविणे हा भूविज्ञानाचा हेतू असला,तरी शास्त्रज्ञांना पृथ्वीचा घन झालेला काही दश किलोमीटर जाडीच्या खडकांच्या उथळ पृष्ठीय कवचीय भूभागाचे परीक्षण करणे फक्त शक्य झाले आहे. तथापि पृथ्वीच्या खोल भागात होणाऱ्या काही प्रक्रियांचे दृश्य परिणाम या कवचाच्या खडकांवर व भूपृष्ठ स्वरूपांवर झालेले आढळतात व त्यावरून संपूर्ण पृथ्वीच्या अंतरंगाचा आणि होऊ शकणाऱ्या परिणामांचा अनुमानांच्या आधारे अप्रत्यक्ष अभ्यासही यात केला जातो.
वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पृथ्वीच्या कवचातील खडक, तसेच अंतरंगातील विविध घटक यांमधील परस्परसंबंधात होणारे सर्वंकष बदल या पृथ्वीच्या भौतिक अभ्यासाबरोबरच पृथ्वीच्या कवचाचे परीक्षण व अन्वेषण (संशोधन) करून अतिप्राचीन काळापासून तो मानवी इतिहासकालाच्या सुरूवातीपर्यंतच्या कवचाचा इतिहास जुळविणे, हे भूविज्ञानाचे मुख्य कार्य आहे. भूविज्ञान विषयाचे स्वरूप अतिशय जटिल आणि व्यापक असून, वास्तवशास्त्र (Reality), भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology) व गणित (Mathematics) या मूलभूत विज्ञानांच्या ज्ञानाच्या आधारावरच, भूविज्ञानाची उभारणी झाली आहे.
भूविज्ञान हे आधुनिक विज्ञान असून वातावरणातील शेवटच्या मर्यादेपासून ते पृथ्वीग्रहाच्या केंद्रस्थानापर्यंत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, विविध प्रयोग, निरीक्षणे, ऐतिहासिक तसेच तार्किक दाखले, पृथ्वी संलग्नित संशोधन इत्यादींद्वारे मिळणारे पुरावे आणि अनुमान यांवरून ते अभ्यासले जातात. यांमध्ये मुख्यत्वेकरून आपल्या भोवती असलेल्या निसर्गाला आणि निसर्गचक्राला समजून घेणे,मानवी विकासामध्ये महत्त्वाचे घटक असलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती ( चक्रीवादळ, भूकंप व ज्वालामुखी) आणि विविध नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, खनिजे, ऊर्जा इ.) शोध यांचा समावेश होतो.
आकाश आणि अवकाश विज्ञानाच्या अतिशय वेगाने झालेल्या, आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे, नवीन माहिती, तसेच महत्त्वाच्या नवीन प्रणालींच्या, विविध उपग्रहांद्वारे, दळणवळण आणि संपर्कयंत्रणांच्या अत्याधुनिकतेमुळे संपर्कात नसलेल्या आणि मानवास अगम्य असलेल्या भागांच्याही मिळणाऱ्या माहितीमुळे, पृथ्वीविज्ञानातील काही न सुटलेली कोडी सुटण्यास मदत होत आहे.
या शास्त्राच्या अभ्यासात पृथ्वीचा अवाढव्यपणा, अतिविशाल कालखंड (अब्जावधी वर्षे) आणि त्यात झालेले आणि होत असलेले कालातीत बदल (प्राकृतिक, आंतरिक-विनाशकारी, जीवसृष्टीतील उलथापालथ इ.) आणि बहुतांशी अतिसंथ रित्या चालणाऱ्या भूपृष्ठाजवळच्या आणि भू-आंतरिक नैसर्गिक प्रक्रिया इ. चा सलग, परस्पर कालसंबंधासह एकत्रित आणि सखोल अभ्यास करता न येणे, हे महत्त्वाचे अडथडे आहेत.
नेफेलीन सायनाइट हे किसनगढ (अजमेर; राजस्थान) गावातील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय शिला स्मारक त्याच गावाच्या नावाने भारतीय भूशास्त्रीय इतिहासात प्रचलित असून अतिप्राचीन ...
पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या भूशास्त्रीय घटनाक्रम इतिहासकाळात विविध शैलप्रणाली निर्माण झालेल्या आहेत. मुख्य दोन शैल संघ (Group) – प्रणाली (System) मध्ये ...
विविध स्फोटशकली पदार्थांना एकत्रित आणण्याचे काम जेव्हा त्यांच्यातील उष्णतेमुळे वितळलेले कण, ज्वालामुखीय काच पदार्थ तसेच लाव्हारसाचे अंश करतात तेव्हा त्याला ...
बेसाल्ट खडक हा भूपृष्ठावर सर्वात विपुलपणे आढळतो. हा गडद रंगाचा, घट्ट, अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) आणि कॅल्शियम, लोह व ...
सॅनिडीन हे फेल्स्पार गटातील एक खनिज असून ऑर्थोक्लेजचा (KAlSi3O8) हा एक प्रकार आहे. याला ज्वालामुखीय ऑर्थोक्लेज असेही म्हणतात. स्वच्छ काचेप्रमाणे ...
स्ट्राँशियम या धातूचे सल्फेट प्रकारात असलेले निसर्गातील प्रमुख व सर्वांत विपुल आढळणारे खनिज. याच्या आकाशी निळसर रंगछटामुळे याला लॅटीन भाषेतील ...
तपकिरी मातीने माखलेल्या पांढऱ्या नायट्राटाइन स्फटिकाचा नमुना. सोडा नायटर हे सोडियमचे खनिज असून ते नायट्राटाइन (Nitratine), चिली सॉल्टपीटर (Chile saltpeter) ...
नॉर्वेमधील स्कुटेरुड या गावी हे प्रथम आढळल्याने याला स्कुटेरुडाइट नाव देण्यात आले. हे कोबाल्ट-निकेल आर्सेनाइड मालिकेतील खनिज असून यात बहुधा ...
रंगहीन व सूईसारखे स्फटिक असलेला स्कोलेसाइट स्कोलेसाइट हे झिओलाइट गटातील खनिज असून नॅट्रोलाइटशी याचे साम्य आहे. कृत्रिम रीतीने बनविलेल्या या ...
स्टिल्बाइटचे स्फटिक झिओलाइट गटातील हे सिलिकेटी खनिज आहे. याला डेस्माइन (Desmine) असेही म्हणतात. याचे एकनताक्ष, प्रचिनाकार, वडीसारखे व पातळ स्फटिक ...
पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या भूशास्त्रीय घटनाक्रम इतिहास काळात विविध शैल प्रणाली (System) निर्माण झालेल्या आहेत. मुख्य दोन शैल संघ (Group) किंवा ...
जोधपूर (राजस्थान) येथे प्रसिद्ध असलेल्या मेहरानगड किल्ल्याच्या पायथ्याशी फिकट रंगाच्या वालुकाश्म खडकांचा जोधपूर श्रेणी आणि मलाणी अग्निज कुल/गट खडकांचा संपर्क ...
भूखंडीय हालचालींमुळे (Epeirogenic movements) आणि जमिनीच्या अंतर्गत होणाऱ्या विवर्तनी (Tectonic) घडामोडींमध्ये – प्रामुख्याने पर्वतीय निर्माण प्रक्रियेमध्ये – असमान दाब वितरणामुळे ...
स्फीन हे खनिज टिटॅनियम व कॅल्शियम यांचे ऑर्थोसिलिकेट आहे. याचे स्फटिक एकनताक्ष प्रणालीचे व पाचरीच्या आकाराचे असतात आणि त्यांची ठेवण ...
स्माल्टाइट स्माल्टाइट हे कोबाल्ट जास्त व आर्सेनिक कमी असणारे खनिज आहे. स्माल्ट ही गडद निळ्या रंगाची काच असून तिच्या संदर्भातून ...
जस्ताचे हे खनिज पूर्वी जस्त धातू मिळविण्यासाठी वापरीत. त्याचे स्फटिक समांतरषट्फलकीय अथवा विषम त्रिभुजफलकी समूहाचे असून ते लहान असतात. ते ...
आर्सेनिक या मूलद्रव्याचे खनिज. हरताळच्या वैशिष्ट्यपूर्ण पिवळ्या रंगामुळे व त्यात सोने असते या समजामुळे ऑरिपिग्मेंटम (सोनेरी रंग लेप) या लॅटिन ...
हर्सीनाइट हे स्पिनेल गटातील लोहयुक्त खनिज आहे. चेक रिपब्लिकच्या बोहीमिया जंगलाचे लॅटिन नाव
सिल्वा हर्सीनिया हे आहे. या जंगलात ते ...
पायरोक्सीन खनिज गटापैकी ऑर्थोपायरोक्सीन उपगटातील हे महत्त्वाचे खनिज असून प्रादेशिक रूपांतरण (Regional Metamorphism) प्रकारातील अति उच्च दाब व उष्णता (Very ...
झिओलाइट गटामधील हार्मोटोम-फिलिसाइट या शृंखलेतील एक बेरियमयुक्त दुर्मिळ खनिज. क्रुसासारख्या विशिष्ट आकाराच्या स्फटिकांमुळे जोड व कापलेला या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून या ...