(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
सर्वच समाजव्यवस्थांमध्ये विविध पातळ्यांवर दृश्यकलांसबंधात निर्मिती व व्यवहार होत असतात. चित्रकला व शिल्पकला यांसारख्या कलांना स्थूलमानाने दृश्यकला असे म्हणता येते. त्या कला प्रामुख्याने दृश्यस्वरूपात दृग्गोचर होतात. कलाकृती आणि कलाकार यांपलीकडे जाऊन आशय व्यक्त करण्याचे माध्यम, त्याचे तंत्र, कलाकृती घडविण्यामागचा हेतू, शैली, प्रांत, प्रदेश, राज्य, देश, खंड अशा क्रमाने व्यापक पातळीवर जाऊन आकलन होणे आवश्यक असते.

दृश्यकलेचे शिक्षण, संवर्धन व जतन यांचे शास्त्र, अभ्यासपद्धती, दृश्यकलेचा इतिहास व तत्त्वज्ञान, संबंधित व्यक्ती व समाज अशा अनेक घटकांचा विचार ही कला समजावून घेताना करावा लागतो. याबरोबरीनेच धर्म, राजकीय विचारसरणी, आर्थिक, नैतिक, सामाजिक, जीवनविषयक दृष्टिकोन व तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा संबंध दृश्यकलांशी येत असतो. त्यामुळे कलाकृती व त्यांची निर्मिती यांना विस्तृत असा सांस्कृतिक व सामाजिक अर्थ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे साहित्य, संगीत, नृत्य-नाट्य, चित्रपट आदी ललित आणि प्रयोगीय कलांचा दृश्यकलांशी संबंध निर्माण होऊन या सर्वच कला अधिक सकस व आशयघन होतात. हे मुद्दे दृश्यकला समजावून घेताना लक्षात घेणे गरजेचे असते.

अशा कलाव्यवहाराची जडणघडण व्यक्ती, समूह, समाज, देश, संस्कृती अशा अनेक परिघांमध्ये होत असते. त्यामुळे भौगोलिक स्थिती, स्थानिक वातावरण यांसारख्या गोष्टींचा प्रत्यक्ष –अप्रत्यक्षरीत्या तसेच मानवी समाजातील अनेक व्यवहारांचा कलाव्यवहारावर तात्कालिक आणि दूरगामी परिणाम होत राहतो. उदाहरणार्थ धर्मश्रद्धा, धर्मप्रसार, व्यापार, आक्रमणे, युद्ध, प्रवाशांचे वृत्तांत अशा अनेक मार्गांनी विविध संस्कृतींचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित होत असतो. यातूनही विविध संस्कृतीतील कलांचा एकमेकांशी संबंध येतो आणि एकमेकांवर प्रभावही पडतो. दृश्यकला या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हे लक्षात घेऊन सदर ज्ञानमंडळाच्या या स्वतंत्र संकेतस्थळावर चित्रकला आणि शिल्पकलाविषयक नोंदी आहेत. सोयीसाठी या विषयाचे दहा विभाग करण्यात आले आहेत: १. कलाकृतींचे प्रकार आणि निकष यांवर आधारित वर्गीकरण २. भूखंडानुरूप वर्गीकरण ३. काळानुरूप वर्गीकरण ४. कलाकृती संच ५. कलाकृतींसंबधीच्या संकल्पना ६. दृश्यकला व इतर ज्ञानशाखांचा आंतरसंबंध ७. चित्रकार आणि शिल्पकार – चरित्र आणि योगदान ८. दृश्यकला शैली ९. दृश्यकला व्यवहार (Art-practice) १०. दृश्यकला आणि समाज.

ग्रीक कला : भौमितिक काळ (Greek Art : Geometric Period)

ग्रीक कला : भौमितिक काळ

मायसीनीअन संस्कृतीच्या शेवटापासून साधारण इ.स.पू. ११०० ते इ.स.पू. ७०० या प्रारंभिक प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या उदयापर्यंतच्या काळाचा, तज्ञांनी या काळातील अजूनपर्यंत ...
ग्रीक कला (Greek Art)

ग्रीक कला

प्राचीन ग्रीक कला-संस्कृती भूमध्य सागरातील ग्रीसची मुख्य भूमी आणि इजीअन समुद्रातील बेटांवर व आजूबाजूच्या भू बेटांवर उदयास आली. ही संस्कृती ...
ग्रीक चित्रकला (Greek Painting )

ग्रीक चित्रकला

फ्रँकॉईस कलश, इ.स.पू. ५७० ते ५६५ पुरातत्त्व संग्रहालय, फ्लॉरेन्स. प्राचीन ग्रीसमध्ये तेथील भौगोलिक व राजकीय परिस्थितीमुळे चित्रकलेच्या अनेक आंतरसंबंधित परंपरा ...
ग्रीक भित्तिचित्रकला (Greek Fresco Painting)

ग्रीक भित्तिचित्रकला

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील ग्रीक पद्धती. ग्रीक चित्रकलेमध्ये भित्तिचित्रांची परंपरा ही मिनोअन व मायसिनीअन कांस्य (ब्राँझ) युगापर्यंत मागे जाते. नॉसस, टायरिन्झ ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : काळ्या आकृत्यांची शैली (Greek Pottery Painting : Black Figure Style)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : काळ्या आकृत्यांची शैली

लाल रंगातील मृत्पात्रांवरील काळ्या-आकृत्यांची ही शैली इ.स.पू. सातव्या शतकात प्राचीन ग्रीकमध्ये निर्माण झाली. प्रथम कॉरिंथ व नंतर अथेन्स येथील मृत्पात्री ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : द्विभाषिक कलश चित्रण (Greek Pottery Painting : Bilingual vase painting)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : द्विभाषिक कलश चित्रण

प्राचीन ग्रीकमधील साधारण इ.स.पू. ५३० ते ५०० या कालावधीतील मृत्पात्र चित्रणाची एक शैली. द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting) हा ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : पांढऱ्या पृष्ठावरील तंत्र (Greek Pottery Painting : White Ground technique)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : पांढऱ्या पृष्ठावरील तंत्र

प्राचीन ग्रीकमधील अथेन्समध्ये इ.स.पू.सु. सहाव्या शतकाच्या शेवटी उदयास आलेली मृत्पात्रांवरील चित्रकलेतील एक महत्त्वाची चित्र तंत्रपद्धती. या चित्रण पद्धतीत मृत्पात्रावर पांढऱ्या ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : पौर्वात्य काळ्या आकृत्यांची शैली (Greek Pottery Painting : Oriental Black Figure Style)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : पौर्वात्य काळ्या आकृत्यांची शैली

ग्रीक आर्ष काळातील कलेवर साधारण इ.स.पू. आठव्या शतकाच्या मध्यापासून इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या पूर्व भूमध्यासागरीय व पूर्वेकडील ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : लाल आकृत्यांची शैली (Greek Pottery Painting : Red-Figure Pottery)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : लाल आकृत्यांची शैली

प्राचीन ग्रीकमध्ये इ.स.पू. साधारण सहाव्या शतकांत निर्माण झालेली काळ्या रंगातील मृत्पात्रांवरील लाल आकृत्यांची चित्रशैली. ही शैली साधारण इ.स.पू. ५३० पासून ...
ग्रीक मृत्पात्र चित्रकला : वन्य बकरी शैली  (Greek Pottery Painting : Wild Goat Style)

ग्रीक मृत्पात्र चित्रकला : वन्य बकरी शैली  

आर्ष काळाच्या शेवटी साधारण इ.स.पू. ६५० ते ५७० या काळात दक्षिण व पूर्व आयोनियन बेटांवरील कलाकारांनी मृत्पात्रांवर केलेल्या चित्रणाची शैली ...
ग्रीक मृत्पात्रावरील चित्रकला : भौमितिक शैली (Greek Pottery Painting : Geometric Style)

ग्रीक मृत्पात्रावरील चित्रकला : भौमितिक शैली

भौमितिक रूपचिन्हांनी चित्रित केलेल्या मृत्पात्रांवरील चित्रणाची शैली म्हणजे भौमितिक चित्र शैली होय. प्राचीन ग्रीसमध्ये साधारण इ.स.पू. नवव्या ते सातव्या शतकात ...
ग्रीक मृत्पात्रावरील चित्रकला (Greek Pottery Painting)

ग्रीक मृत्पात्रावरील चित्रकला

प्राचीन ग्रीक चित्रकलेतील अजूनही अस्तित्वात असलेल्या आणि विपुल प्रमाणात उपलब्ध झालेल्या पुराव्यांमध्ये मृत्पात्रांवरील चित्रणाचा समावेश होतो. ग्रीक मृत्पात्र चित्रकला ही ...
ग्रीक शिल्पकला : अभिजात काळ (Greek Sculpture : Classical Period)

ग्रीक शिल्पकला : अभिजात काळ

क्रिटिऑस, संगमरवर. ग्रीकमधील सुवर्णकाळात अभिजात कलेची निर्मिती झाली, म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या या काळाला अभिजात काळ अशा नावाने ओळखतात. ग्रीक कलेच्या इतिहासातील ...
ग्रीक शिल्पकला : आर्ष काळ (Greek Sculpture : Archaic Period)

ग्रीक शिल्पकला : आर्ष काळ

प्राचीन ग्रीक संस्कृती भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला तुर्कीपासून फ्रान्सच्या दक्षिणेपर्यंतच्या अनेक भूभागांमध्ये पसरली होती. ग्रीकांचे इजिप्शियन, सिरियन आणि पर्शियन यांसारख्या इतर ...
ग्रीक शिल्पकला : ग्रीकांश काळ (Greek Sculpture : Hellenistic Period)

ग्रीक शिल्पकला : ग्रीकांश काळ

सम्राट अलेक्झांडर द ग्रेट नंतरच्या इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३० या काळाला ग्रीकांश काळ (Hellenistic Period) म्हणून ओळखतात. या काळातील ...
ग्रीक शिल्पकला (Greek Sculpture)

ग्रीक शिल्पकला

प्राचीन अभिजात ग्रीक कलेचा प्रभाव यूरोपीय कलाविश्वावर अत्यंत दीर्घकालीन आहे. तो साहित्य, तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र या क्षेत्रांतही दिसून येतो. प्रमाणबद्धता ...
ग्रीकांश कला (Hellenistic Art)

ग्रीकांश कला

इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३१ या काळाला ग्रीकांश काल म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरने आपले साम्राज्य स्थापन केल्यानंतर, तत्पूर्वी काही ग्रीक ...
ग्लॅडस्टन सॉलोमन (Gladstone Solomon)

ग्लॅडस्टन सॉलोमन

सॉलोमन, ग्लॅडस्टन : ( २४ मार्च १८८० – १८ डिसेंबर १९६५ ). ब्रिटिश लष्करी अधिकारी व सर जे.जे. स्कूल ऑफ ...
घनवाद (Cubism)

घनवाद

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पॅरिस येथे स्थापित झालेला एक आधुनिक कलासंप्रदाय. ही शैली सुरू करण्याचे श्रेय विसाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत ...
चिकणरंग चित्रण (Tempera Painting)

चिकणरंग चित्रण

‘चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’मध्ये रंगद्रव्य सौम्य होण्यासाठी तसेच चित्र सुकल्यावर ते पक्के व्हावे, म्हणून तेल वा पाण्यासारख्या द्राव्य माध्यमात मिसळून चित्रणासाठी ...