(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
सर्वच समाजव्यवस्थांमध्ये विविध पातळ्यांवर दृश्यकलांसबंधात निर्मिती व व्यवहार होत असतात. चित्रकला व शिल्पकला यांसारख्या कलांना स्थूलमानाने दृश्यकला असे म्हणता येते. त्या कला प्रामुख्याने दृश्यस्वरूपात दृग्गोचर होतात. कलाकृती आणि कलाकार यांपलीकडे जाऊन आशय व्यक्त करण्याचे माध्यम, त्याचे तंत्र, कलाकृती घडविण्यामागचा हेतू, शैली, प्रांत, प्रदेश, राज्य, देश, खंड अशा क्रमाने व्यापक पातळीवर जाऊन आकलन होणे आवश्यक असते.

दृश्यकलेचे शिक्षण, संवर्धन व जतन यांचे शास्त्र, अभ्यासपद्धती, दृश्यकलेचा इतिहास व तत्त्वज्ञान, संबंधित व्यक्ती व समाज अशा अनेक घटकांचा विचार ही कला समजावून घेताना करावा लागतो. याबरोबरीनेच धर्म, राजकीय विचारसरणी, आर्थिक, नैतिक, सामाजिक, जीवनविषयक दृष्टिकोन व तत्त्वज्ञान अशा गोष्टींचा संबंध दृश्यकलांशी येत असतो. त्यामुळे कलाकृती व त्यांची निर्मिती यांना विस्तृत असा सांस्कृतिक व सामाजिक अर्थ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे साहित्य, संगीत, नृत्य-नाट्य, चित्रपट आदी ललित आणि प्रयोगीय कलांचा दृश्यकलांशी संबंध निर्माण होऊन या सर्वच कला अधिक सकस व आशयघन होतात. हे मुद्दे दृश्यकला समजावून घेताना लक्षात घेणे गरजेचे असते.

अशा कलाव्यवहाराची जडणघडण व्यक्ती, समूह, समाज, देश, संस्कृती अशा अनेक परिघांमध्ये होत असते. त्यामुळे भौगोलिक स्थिती, स्थानिक वातावरण यांसारख्या गोष्टींचा प्रत्यक्ष –अप्रत्यक्षरीत्या तसेच मानवी समाजातील अनेक व्यवहारांचा कलाव्यवहारावर तात्कालिक आणि दूरगामी परिणाम होत राहतो. उदाहरणार्थ धर्मश्रद्धा, धर्मप्रसार, व्यापार, आक्रमणे, युद्ध, प्रवाशांचे वृत्तांत अशा अनेक मार्गांनी विविध संस्कृतींचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित होत असतो. यातूनही विविध संस्कृतीतील कलांचा एकमेकांशी संबंध येतो आणि एकमेकांवर प्रभावही पडतो. दृश्यकला या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हे लक्षात घेऊन सदर ज्ञानमंडळाच्या या स्वतंत्र संकेतस्थळावर चित्रकला आणि शिल्पकलाविषयक नोंदी आहेत. सोयीसाठी या विषयाचे दहा विभाग करण्यात आले आहेत: १. कलाकृतींचे प्रकार आणि निकष यांवर आधारित वर्गीकरण २. भूखंडानुरूप वर्गीकरण ३. काळानुरूप वर्गीकरण ४. कलाकृती संच ५. कलाकृतींसंबधीच्या संकल्पना ६. दृश्यकला व इतर ज्ञानशाखांचा आंतरसंबंध ७. चित्रकार आणि शिल्पकार – चरित्र आणि योगदान ८. दृश्यकला शैली ९. दृश्यकला व्यवहार (Art-practice) १०. दृश्यकला आणि समाज.

चित्रकथी, पैठण व पिंगुळी (Chitrakathi)

चित्रकथी, पैठण व पिंगुळी

चित्रकथी ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्त्वपूर्ण लोककला-चित्रपरंपरा आहे. तिचा कथन आणि चित्रण (दृक्श्राव्य) असा दुहेरी आविष्कार आढळतो. साधारणतः ३०×४० ...
चेरियाल चित्रकला, तेलंगणा (Cheriyal Painting, Telangana)

चेरियाल चित्रकला, तेलंगणा

सांची स्तूपाच्या तोरणावर पटचित्राचे शिल्पांकन पटचित्रकलेचा तेलंगणा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. प्रामुख्याने कापडावर कुलपुराणाचे अंकन असलेल्या चित्रकलेला पटचित्रकला म्हणून ओळखले जाते ...
जगदीश स्वामिनाथन् (Jagdish Swaminathan)

जगदीश स्वामिनाथन्

स्वामिनाथन्, जे. : (२१ जुलै १९२८–२५ एप्रिल १९९४). श्रेष्ठ भारतीय चित्रकार आणि भारतातील नव-तांत्रिक कलाप्रवाहाचे एक जनक. त्यांचा जन्म संजौली (सिमला) ...
जलरंग, भारतीय (Watercolour)

जलरंग, भारतीय

ज्या रंगकामाकरिता पाणी हे माध्यम म्हणून वापरले जाते, त्यास जलरंग असे म्हणतात. जलरंगांचे प्रमुख दोन प्रकार आहेत :  अपारदर्शक जलरंग ...
जहांगीर साबावाला (Jehangir Sabavala)

जहांगीर साबावाला

साबावाला, जहांगीर अर्देशिर : (२३ ऑगस्ट १९२२–२ सप्टेंबर २०११). आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे एका गर्भश्रीमंत पारशी घराण्यात, अर्देशिर ...
जिव्या सोमा मशे (Jivya Soma Mashe)

जिव्या सोमा मशे

मशे, जिव्या सोमा : (२५ डिसेंबर १९३४ – १५ मे २०१८ ). वारली चित्रकला प्रकाराला सातासमुद्रापार नेणारे आणि भारतीय लोककलेच्या ...
तिशन (Titian)

तिशन

तिशन, सेल्फ पोर्ट्रेट तिशन : ( सु. १४८८–२७ ऑगस्ट १५७६ ). प्रबोधनयुगातील एक श्रेष्ठ इटालियन चित्रकार व व्हेनिशियन चित्रसंप्रदायाचा प्रमुख ...
दीनानाथ दामोदर दलाल (Dinanath Dalal)

दीनानाथ दामोदर दलाल

दलाल, दीनानाथ दामोदर : (३० मे १९१६ – १५ जानेवारी १९७१). सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार. त्यांचा जन्म मडगावजवळील कोंब (गोवा) ...
दृश्यकला, कालानुरूप वर्गीकरण (Visual arts)

दृश्यकला, कालानुरूप वर्गीकरण

मानवी समूहांत वेगवेगळ्या काळांत दृश्य कलाकृतींचा दर्जा आणि गुणवत्ता यांबाबत निरनिराळे निकष अस्तित्वात असतात व त्यांनुसार उपलब्ध कलाकृतींचा अन्वयार्थ लक्षात ...
देवीप्रसाद रायचौधरी (Debi Prasad Roy Choudhury)

देवीप्रसाद रायचौधरी

राय चौधरी, देवी प्रसाद : ( १५ जून १८९९ – ? ऑक्टोबर १९७५ ). आधुनिक भारतीय शिल्पकार व चित्रकार. त्यांचा ...
दोनातेलो (Donatello)

दोनातेलो

दोनातेलो : ( १३८६–१३ डिसेंबर १४६६ ). पंधराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ इटालियन मूर्तिकार. इटालियन प्रबोधनकालीन कलेत नवशैली निर्माण करणारा तो एक ...
पेस्तनजी बोमनजी (Pestonji Bomanji)

पेस्तनजी बोमनजी

मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी : (१ ऑगस्ट १८५१ – सप्टेंबर १९३८). प्रसिद्ध भारतीय पारशी व्यक्तिचित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या ...
प्रागैतिहासिक कला, भारतातील (Prehistoric Art in India)

प्रागैतिहासिक कला, भारतातील

मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. त्याचे स्थूलमानाने प्रागैतिहास, आद्य इतिहास (protohistory) व इतिहासकाळ असे तीन ...
प्राचीन मृत्तिका कला (Ancient Ceramic Art)

प्राचीन मृत्तिका कला

प्राचीन काळापासून मृत्तिकेचा (मातीचा) उपयोग विविध कलावस्तू बनविण्याकरिता होत आहे. त्यांचा समावेश प्राचीन मृत्तिका कला या संज्ञेमध्ये होतो.  निसर्गात आढळणारे ...
फ्रांथीस्को गोया (Francisco Goya)

फ्रांथीस्को गोया

फ्रांथीस्को गोया याचे व्यक्तिचित्र गोया, फ्रांथीस्को : ( ३० मार्च १७४६–१६ एप्रिल १८२८ ). प्रख्यात स्पॅनिश चित्रकार आणि उत्कीर्णनकार. त्याचे ...
फ्रान्सिस न्यूटन सोझा (Francis Newton Souza)

फ्रान्सिस न्यूटन सोझा

सोझा, फ्रान्सिस न्यूटन : (१२ एप्रिल १९२४ – २८ मार्च २००२). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म गोव्यामधील साळगाव, ...
बाबूराव पेंटर (Baburao Painter )

बाबूराव पेंटर

बाबूराव पेंटर : (३ जून १८९० – १६ जानेवारी १९५४). प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक. पूर्ण नाव बाबूराव ...
बाळाजी वसंत तालीम (Balaji Vasant Talim)

बाळाजी वसंत तालीम

तालीम, बाळाजी वसंत : (? १८८८- २५ डिसेंबर १९७०). विख्यात भारतीय शिल्पकार. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील निजाम ...
बिनाले : (द्वैवार्षिक प्रदर्शन) (Biennale)

बिनाले :

‘बिनाले’ (Biennale) किंवा ‘बायएनिअलʼ या शब्दाचा मराठीतील अर्थ ‘द्वैवार्षिक’ असा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणारे कलाप्रदर्शन, दृश्यकला महोत्सव एवढेच ...
भित्तिलेपचित्रण (Fresco)

भित्तिलेपचित्रण

भिंतीच्या गिलाव्यावर चित्र रंगविण्याची एक तांत्रिक प्रक्रिया. थेट भिंतीवर व छतावर चित्र काढण्यासाठी वापरात आलेल्या पारंपरिक चित्रणाच्या एका प्राचीन तंत्रपद्धतीस ...