(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

इच्छामरण/दयामरण : चर्चची भूमिका (Euthanasia : The role of the church)

इच्छामरण/दयामरण : चर्चची भूमिका

असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांतून वा दु:खांतून मुक्ती मिळण्यासाठी एखादी मरणासन्न व्यक्ती जेव्हा मरणाची इच्छा व्यक्त करते किंवा त्यासाठी ...
इनाना (Inanna)

इनाना

इनाना ही प्राचीन सुमेरियन संस्कृतीमध्ये प्रेम, सौंदर्य, लैंगिक भावना, प्रजनन, युद्ध आणि नैतिकतेचे प्रतीक असलेली देवता आहे. तिला स्वर्गाची आणि ...
इब्न रुश्द (Ibn Rushd)

इब्न रुश्द

इब्‍न रुश्द : (?११२६—१० डिसेंबर ११९८). एक अरबी तत्त्ववेत्ते. संपूर्ण नाव अबुल-वलीद मुहंमद बिन अहमद बिन रुश्द. मध्ययुगीन यूरोपात ‘आव्हेरोईझ’ ...
इब्न सीना (Ibn Sina)

इब्न सीना

इब्‍न सीना : (९८०–१०३७). एक अरबी तत्त्वज्ञ व वैद्यकवेत्ते. पूर्ण नाव अबुल अली अल्-हुसेन इब्‍न अब्दल्ला इब्‍न सीना. त्यांचे लॅटिन ...
इसिस (Isis)

इसिस

प्राचीन ईजिप्तमधील अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय देवता. आयसिस, इसेत, आसेत असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात. होरसला दूध पाजताना मातृदेवता ...
इस्माइली पंथ (Ismaili Sect / Cult)

इस्माइली पंथ

एक इस्लामी धर्मपंथ. शिया पंथाचाच हा एक उपपंथ असून तो इमाम जाफर अल्-सादिक यांच्या मृत्यूनंतर ७६५ च्या सुमारास उदयास आला ...
ईआबेत (Iabet)

ईआबेत

एक प्राचीन ईजिप्शियन गौण देवता. पूर्वेकडील वाळवंटातील रहिवासी असून ती सुफलन व पुनर्जन्माची देवता होय. पूर्व दिशेच्या भूमीचे हे मानवीकरण ...
ईस्टर (Easter)

ईस्टर

ईस्टर किंवा पास्का (Pascha) हा ख्रिस्ती भाविकांचा आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाचा सण. यहुदी धर्मप्रमुखांनी व रोमन अधिकाऱ्यांनी पॅलेस्टाइन भूमीतील कालवारी ...
ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च (Eastern Orthodox Church)

ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च

रोमन साम्राज्यातील पूर्वेकडील भाग ‘बायझंटिन (बिझंटाईन) साम्राज्य’ म्हणून प्रसिद्धीस आला. ख्रिस्ती धर्माला जवळ करणारा पहिला रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन याच्या नावावरून ...
उपवास (Fasting)

उपवास

उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी ...
उलेमा (Ulema)

उलेमा

इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा ...
उस्मान (Usman / Uthman)

उस्मान

उथ्‌मान (उस्मान) बिन अफ्फान : (सु. ५७६—१७ जून ६५६). इस्लामी परंपरेतील तिसरे खलीफा. त्यांचा जन्म मक्का येथे कुरैश जमातीतील प्रसिद्ध ...
एकसत्तावाद (Monism)

एकसत्तावाद

विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद ...
एक्युमेनिकल चळवळ (Ecumenism)

एक्युमेनिकल चळवळ

ख्रिस्ती ऐक्याचे प्रतीक ख्रिस्ती ऐक्य : त्रैक्यीय परमेश्वरातील मानवी शरीर धारण केलेल्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्यावर श्रद्धा ठेवून जीवन जगणाऱ्या ...
एक्युमेनिकल परिषदा व चर्च (Ecumenical Councils & The Church)

एक्युमेनिकल परिषदा व चर्च

चर्च (ख्रिस्तसभे)चा अंतर्गत इतिहास समजण्यासाठी, त्याचप्रमाणे कॅथलिक चर्च समजून घेण्यासाठी आणि ख्रिस्ती माणूस नक्की कुठल्या संदर्भात स्वत:ला समजून वागतो, हे ...
एन्की (Enki)

एन्की

अँकी/इआ : सुमेरियन जलदेवता. मेसोपोटेमियन देवतांमधील एक प्रमुख देव. तो अनु आणि नामू यांचा पुत्र मानला जातो. ह्या देवतामंडळातील अत्यंत ...
एन्लिल (Enlil)

एन्लिल

सुमेरियन पृथ्वीदेव. तो एन्कीप्रमाणेच सुमेरियन संस्कृतीतील एक प्रमुख देव. सुमेरियन अनुनामक आकाशदेवाचा तो पुत्र असून वायुदेव म्हणूनही त्यास संबोधले जाते ...
एपिक्यूरस (Epicurus)

एपिक्यूरस

एपिक्यूरस : (इ.स.पू. ३४१—इ.स.पू. २७०). एक ग्रीक तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म आशिया मायनरमधील सेमॉस येथे ॲथीनियन पालकांच्या पोटी झाला. एपिक्यूरियन या ...
एमस (Amos)

एमस

एमस : (इ.स.पू. आठवे शतक). एक ज्यू प्रेषित. जुन्या करारातील ‘बुक ऑफ एमस’ प्रसिद्ध आहे. दक्षिण पॅलेस्टाइनमधील टीकोआचे ते मेंढपाळ ...
एरॉस (Eros)

एरॉस

प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ...