(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

ख्रिस्ती संत (Christian Saints)

ख्रिस्ती संत

‘संत’ हा शब्द इंग्रजीतील ‘सेंट’ या शब्दाचा मराठी पर्याय म्हणून वापरला आहे. सेंट हा इंग्रजी शब्द Sanctus (सॅन्क्टस) या लॅटिन, ...
गर्भपात : चर्चची भूमिका (Abortion : The Role of the Church)

गर्भपात : चर्चची भूमिका

साधारणपणे गर्भ जीवनक्षम बनण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडल्यास, गर्भाला हेतुपुरस्सर नष्ट केल्यास गर्भपात झाला असे म्हणतात. काही लोकांच्या मते गर्भधारणा झाल्याच्या ...
गिलगामेश (Gilgamesh)

गिलगामेश

बॅबिलोनियन पुराणकथांमध्ये वर्णिलेला एक प्रसिद्ध सुमेरियन राजा. त्याचे राज्य ऊरुक नावाच्या नगरात होते. हे नगर इ.स.पू. ३००० च्या सुमारास अस्तित्वात ...
गुड-फ्रायडे (Good-Friday)

गुड-फ्रायडे

शुभ-शुक्रवार : ख्रिस्ती धर्मातील हा एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस असून तो ईस्टरच्या दोन दिवस अगोदर आणि उपासकाळाच्या शेवटी ...
गृहीतक (Hypothesis)

गृहीतक

कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण किंवा उपपादन (Explanation) करण्यासाठी एखादी कल्पना गृहीत धरावी लागते व तिच्या अनुषंगाने त्या घटनेचा अर्थ लावावा लागतो ...
गेब (Geb)

गेब

प्राचीन ईजिप्शियन पृथ्वी देवता. ईजिप्शियन देवतांच्या पूर्वजांचा पूर्वज मानला गेलेल्या रा देवतेचा एकटेपणा घालवून त्याला मनोरंजनाचे साधन आणि विश्रामासाठी जागा ...
ग्रीक तत्त्वज्ञान (Greek Philosophy)

ग्रीक तत्त्वज्ञान

ग्रीक तत्त्वज्ञानाची सुरुवात थेलीझ (इ.स.पू. सातवे-सहावे शतक) ह्या विचारवंतापासून झाली आणि त्याचा शेवट इ.स. ५२९ मध्ये अथेन्स येथील नव-प्लेटोमताचे पीठ ...
चराचरेश्वरवाद (Pantheism)

चराचरेश्वरवाद

धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे ...
चर्च (Church)

चर्च

ख्रिस्ती धर्मीयांच्या ‘उपासनामंदिरा’ला सर्वसाधारणपणे ‘चर्च’ असे म्हटले जाते. उपासनामंदिराची इमारत व विश्वव्यापी चर्च या दोन्ही संकल्पनांसाठी वापरलेला एकच शब्द कधी ...
चर्च आणि अन्य धर्मीयांशी सुसंवाद (Interaction with Church and Other Religions)

चर्च आणि अन्य धर्मीयांशी सुसंवाद

ख्रिस्ती समूह एक आध्यात्मिक वास्तव असला, तरी ख्रिस्ती माणसांचे जीवन ऐहिक जगात नात्यांच्या धाग्यादोऱ्यांनी विणलेले असते. ख्रिस्ती माणसांच्या शेजारी निरनिराळ्या ...
चर्च आणि राजकारण (Church & Politics)

चर्च आणि राजकारण

प्रस्तावना : राजकारण हे मानवी जीवनाशी निगडित असून त्यांच्या व्यवहारावर आणि कारभारावर त्याचा परिणाम होत असतो. सत्ताधार्‍यांच्या चांगल्या-वाईट निर्णयांचे परिणाम ...
चर्च आणि लोकशाही (Church and The Democracy)

चर्च आणि लोकशाही

राजकीय सत्ता ही लोकांची असते. म्हणूनच राजकारणात लोकशाही सर्वमान्य होऊ लागली आहे. हुकूमशाही, घराणेशाही आणि एकाधिकारशाही अन्यायकारक आणि शोषक असते ...
चर्च आणि शोषणमुक्तीची चळवळ (The Church and Liberation Movement)

चर्च आणि शोषणमुक्तीची चळवळ

इसवी सन १९६० च्या दरम्यान लॅटिन अमेरिकेत एका वैचारिक क्रांतीची पहाट झाली. कार्ल मार्क्स यांच्या विश्लेषण पद्धतीचा आधार घेऊन विद्यापीठांतील ...
चर्च आणि स्त्रीमुक्ती लढा (Church and Women Liberation Movement)

चर्च आणि स्त्रीमुक्ती लढा

इसवी सन १९६० च्या दरम्यान यूरोपमध्ये झालेल्या सांस्कृतिक क्रांतीनंतर स्त्रियांना आपल्या हक्कांची प्रकर्षाने जाणीव झाली. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने केलेल्या अन्यायापासून मुक्त ...
चारित्र्य (Character)

चारित्र्य

चारित्र्याचे किंवा शीलाचे स्वरूप दुहेरी आहे. ज्याच्या ठिकाणी चारित्र्य आहे, अशा माणसाच्या मानसिक जीवनात व वर्तनात सुसंगती असते, त्याच्या आचरणात ...
चिश्ती संप्रदाय (Chishti School)

चिश्ती संप्रदाय

इस्लामी गूढवादी परंपरेमधल्या महत्त्वाच्या चार संप्रदायांपैकी एक संप्रदाय. याचा उगम अफगाणिस्तानातील चिश्त गावात इ.स.च्या १० व्या शतकात झाल्याचे मानतात. पुढे ...
चुआंग त्झू (Chuang Tzu)

चुआंग त्झू

चुआंग त्झू : (इ.स.पू.सु. ३६९—इ.स.पू.सु.२८६). चिनी तत्त्वज्ञ. चिनी उच्चार ‒ ज्वांग जू. त्याचा जन्म चीनच्या मेंग (सध्याचे शांग-जो शहर) प्रदेशात ...
जडवाद (Materialism)

जडवाद

ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ...
जॅकोबाइट पंथ (Jacobite School)

जॅकोबाइट पंथ

एक ख्रिस्ती धर्मपंथ. ईजिप्तमधील कॉप्ट्स व मोनोफिझाइट्स यांसारखाच पण रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स या चर्चशी संबंध नसलेला असा हा ...
जेज्वीट / जेझुइट (Jesuit)

जेज्वीट / जेझुइट

रोमन कॅथलिक चर्चमधील व्रतस्थांचा एक संघ. संत इग्नेशिअस लॉयोला पॅरिस विद्यापीठात असताना त्यांचा संत फ्रान्सिस झेव्हिअर व पीटर फेबर यांच्याशी ...