(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

न्यायनिवाड्याचा दिवस (Judgment Day)

न्यायनिवाड्याचा दिवस

ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी या धर्मांतील ही एक संकल्पना. मात्र या ठिकाणी ज्यू व ख्रिस्ती धर्मांच्याच अनुषंगाने ऊहापोह केले ...
पदार्थप्रकार (Categories)

पदार्थप्रकार

पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा ...
पपया (Papaya)

पपया

हटीअन मूळ असणारी एक हिटाइट देवता. ही देवता नेहमी इस्तुस्तया या देवतेसोबत कायम गणली जाते. ह्या दोन्ही देवता हिटाइट मिथकांमध्ये ...
परिवर्तन (Change)

परिवर्तन

एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल ...
पर्सेफोनी (Persephone)

पर्सेफोनी

एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी ...
पवित्र त्रैक्य (Trinity)

पवित्र त्रैक्य

ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा धर्मसिद्धांत. हा धर्मसिद्धांत परमेश्वराचे त्रिविध स्वरूप समजावून सांगतो. पित्याच्या स्वरूपातील देव, पुत्राच्या स्वरूपातील देव आणि पवित्र ...
पायथॅगोरस (Pythagoras)

पायथॅगोरस

पायथॅगोरस : (इ.स.पू.सु. ५७५‒४९५). ग्रीक गूढवादी तत्त्वज्ञ, गणितज्ञ व त्याच्या नावाने ओळखण्यात येणार्‍या तत्त्वज्ञानात्मक पंथाचा संस्थापक. पायथॅगोरसचे स्वत:चे लिखाण उपलब्ध ...
पारिक्रमिकी (Peripatetics)

पारिक्रमिकी

थोर ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याची शिष्यपरंपरा. ॲरिस्टॉटलने प्रस्थापित केलेल्या लायसिअम पीठाच्या प्रांगणात एक छायाच्छादित मार्ग−पेरिपॅटॉस−होता आणि त्यावरून फिरत फिरत ॲरिस्टॉटल ...
पुनरुत्थान (Resurrection)

पुनरुत्थान

ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम धर्मांतील एक श्रद्धेय संकल्पना. तिचा अर्थ मृतावस्थेतून पुन्हा जिवंत होणे, असा होतो. या नोंदीत फक्त ख्रिस्ती ...
पोसायडन (Poseidon)

पोसायडन

प्राचीन ग्रीक समुद्रदेवता. तसेच तो अश्व आणि भूकंपाचा देव म्हणूनही ओळखला जातो. त्याचा काही वेळा पोसिडॉन असाही उच्चार केला जातो. त्याच्या नावाचा ...
प्रभात ख्रिस्ती धर्माची (The Rise of Christianity)

प्रभात ख्रिस्ती धर्माची

येशू हा जन्माने यहुदी होता. ‘धर्म’ स्थापन करण्यासाठी मी आलो आहे, असे विधान त्याने चुकूनही केले नाही. त्याच्या शिकवणुकीला ‘ख्रिस्ती’ ...
प्रवाह प्रेषितीय परंपरेचा (The flow of Apostolic Tradition)

प्रवाह प्रेषितीय परंपरेचा

येशू ख्रिस्ताने जरी धर्म स्थापन केला नसला, तरी एका नव्या धर्माचे बीज त्याने त्याच्या शिष्यांच्या हातांमध्ये ठेवून दिले. त्या काळी ...
प्रेषित, इस्लाम धर्मातील (The Prophet of Islam)

प्रेषित, इस्लाम धर्मातील

प्रेषितांवर विश्वास ठेवणे हे इस्लाम धर्माच्या सहा कलमांमधील एक महत्त्वाचे कलम आहे. इस्लाम धर्मात प्रेषितांचे नबी आणि रसूल असे दोन ...
प्रेषितांचा विश्वासांगिकार व श्रद्धा प्रकटन (Apostle Creed)

प्रेषितांचा विश्वासांगिकार व श्रद्धा प्रकटन

एक कॅथलिक प्रार्थना. ‘क्रेडो’ (Credo) ह्या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ ‘मी श्रद्धा ठेवतो’ असा होतो. या लॅटिन शब्दावरून ‘मतांगिकार’ (क्रीड), ...
प्लेटो (Plato)

प्लेटो

प्लेटो : (इ.स.पू.सु. ४२८‒ इ.स.पू.सु. ३४८). प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोचा जन्म अथेन्स किंवा ईजायना ह्या नगरात झाला. प्लेटोचे घराणे हे अथेन्समधील ...
फना (Fana)

फना

सूफी तत्त्वप्रणालीतील एक अवस्था. अध्यात्मसाधना करताना भक्ताचा जीव सात टप्प्यांतून जातो. त्याला ‘मकामात’ (मुक्काम) म्हणतात. यातही मनाच्या अनेक अवस्था असतातच. ‘अनल्हक’ ...
फादर थॉमस स्टीफन्स (Father Thomas Stephens)

फादर थॉमस स्टीफन्स

स्टीफन्स, फादर थॉमस : ( १५४९ – १६१९ ). ख्रिस्ती मराठी कवी-साहित्यिक. जन्माने इंग्रज. शिक्षण विंचेस्टर येथे. थॉमस स्टीव्हन्स तसेच ...
फादर मॅथ्यू लेदर्ले (Father Matthew Lederle)

फादर मॅथ्यू लेदर्ले

लेदर्ले, फादर मॅथ्यू : ( १३ मार्च १९२६—८ जून १९८६ ). ख्रिस्ती धर्मगुरू. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. प्रत्येक सशक्त तरुणाने ...
फिक्‌ (Fiqh)

फिक्‌

इस्लामी कायदेशास्त्र. फिका, फिक्‌ह असेही उच्चार केले जातात. हे मुसलमानी विधीच्या दोन संकल्पनांपैकी एक असून उसूल-अल्-फिक् म्हणूनही ते ओळखले जाते ...
फ्रान्सिस्कन (Franciscan)

फ्रान्सिस्कन

एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. इटलीच्या उत्तरेकडील भागात असिसी या गावामध्ये कपडे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाराचा फ्रान्सिस (इ.स.११८१–१२२६) नावाचा तरुणवयीन मुलगा एक ...