(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

बायबलसंबंधी मतभेद (Biblical Differences)

बायबलसंबंधी मतभेद

गेल्या २००० वर्षांतील बायबलच्या अन्वयार्थासंबंधीचा (Interpretation) इतिहास सातत्याच्या उलथापालथी व फाटाफुटी यांनी भरलेला आहे. ईश्वराविषयी संकल्पना, येशू ख्रिस्त यांचे दैवीपण, ...
बालहत्या : चर्चची भूमिका (Infanticide : The Role of The Church)

बालहत्या : चर्चची भूमिका

भ्रूणहत्या म्हणजे गर्भावस्थेत असताना बाळाची केलेली हत्या. जगाच्या सुरुवातीपासूनच अनेक कारणांसाठी भ्रूण-बालहत्या केल्याचे दिसते. आधुनिक युगामध्ये बहुधा अनैतिक संबंधांतून बाळाचा ...
बास्टेट (Bastet)

बास्टेट

एक ईजिप्शियन प्राचीन स्त्री-देवता. सामान्यत: मांजर, सुपीकता, प्रजनन, संगीत, युद्ध, संरक्षण, शुश्रूषा इत्यादींशी तिचा संबंध जोडला जातो. मांजरीचे तोंड असलेली, ...
बैत (Bait)

बैत

सूफी गुरू आपल्या शिष्यांना जी दीक्षा देतात तिला ‘बैत’ (बयत) असे म्हणतात. बैत एक मान्यता आहे. खलीफा निवडीच्या काळी मतपत्रिका ...
भारतातील ख्रिस्ती धर्म व संस्कृतीकरण (Christian Inculturation in India)

भारतातील ख्रिस्ती धर्म व संस्कृतीकरण

संस्कृती म्हणजे समाजाच्या सर्वंकष जीवनाच्या विविध बाजूंचे दर्शन घडविणारा आलेख. त्या आलेखात भाषा, चालीरिती, परंपरा, साहित्य, धर्म इत्यादी बाबी येतात ...
भारतीय (ख्रिस्ती) घटस्फोट कायदा, १८६९ (Indian Devorce Act, 1869)

भारतीय

भारतीय घटस्फोट कायदा १८६९ साली व भारतीय ख्रिस्ती विवाह कायदा १८७२ साली लागू करण्यात आले. सदरचे कायदे इंग्रजांनी आपल्या राजवटीत ...
भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद (CBCI)

भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद

भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद (Catholic Bishops’ Conference of India) ही एक कायमस्वरूपी संघटना असून भारतातील सर्व कॅथलिक बिशप या संघटनेचे ...
भारतीय ख्रिस्ती विवाह कायदा (Indian Christian Marriage Act)

भारतीय ख्रिस्ती विवाह कायदा

प्रत्येक देशाची आपापली कायदेपद्धती असते व त्या कायद्यांनुसार त्या देशाच्या नागरिकांचा व्यवहार चालत असतो. विवाह हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक सोहळा ...
मंजुश्री (Manjushri)

मंजुश्री

महायान बौद्ध पंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध बोधिसत्त्व. पूर्वोत्तर आशियातील देशांमध्ये त्याच्या उपासनेमुळे ज्ञान, चातुर्य, स्मरणशक्ती, बद्धी आणि वक्तृत्व प्राप्त ...
मठवासी जीवन (Christian Monasticism)

मठवासी जीवन

ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणारा ख्रिस्ती समाज हा सुरुवातीच्या काळात ख्रिस्ताच्या नावीन्यपूर्ण संदेशाने व भविष्यात होणाऱ्या प्रभूच्या पुनरागमनाच्या आशेने इतका भारावून गेला ...
मदर तेरेसा (Mother Teresa)

मदर तेरेसा

तेरेसा, मदर : ( २७ ऑगस्ट १९१० – ५ सप्टेंबर १९९७ ). एक थोर मानवतावादी समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या ...
महाराष्ट्रात कार्य केलेले उल्लेखनीय ख्रिस्ती संघ (Remarkable Works of Christian Missionaries in Maharashatra)

महाराष्ट्रात कार्य केलेले उल्लेखनीय ख्रिस्ती संघ

ख्रिस्ती धर्माला सुरुवात झाल्यानंतर शे-पाचशे वर्षे धार्मिक वृत्तीची मंडळी ‘संन्यस्त’ म्हणून रानावनात मनन-चिंतन करत एकएकटे राहात. पुढे स्व-संरक्षणार्थ त्यांतली काही ...
महाराष्ट्रात चर्चचा उगम (Christianity in Maharashtra)

महाराष्ट्रात चर्चचा उगम

मुसलमानांशी धार्मिक, व्यापारी व राजकीय संघर्ष वाढल्यामुळे भारत या उपखंडाला जोडणारा मध्य आशियातील खुष्कीचा मार्ग मध्ययुगाच्या काळात पाश्चिमात्यांना बंद झाला ...
माआट (Maat)

माआट

न्याय, सत्य, सुसंगती आणि एकोपा ह्यांच्याशी संबंधित असलेली एक प्रमुख ईजिप्शियन स्त्रीदेवता. माएट, मेईट असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात ...
मानवारोपवाद (Anthropomorphism)

मानवारोपवाद

धर्म, मानवशास्त्र, मानसशास्त्र आणि वाङ्‌मयाचा अभ्यास यांत वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण संज्ञा. मूळ ‘अँथ्रोपॉमॉर्फिझम’ ह्या ग्रीक संज्ञेसाठी ‘मानवारोपवाद’ ही मराठी ...
मार्टिन ल्यूथर (Martin Luther)

मार्टिन ल्यूथर

ल्यूथर, मार्टिन : ( १० नोव्हेंबर १४८३ — १८ फेब्रुवारी १५४६ ). ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथाचे प्रवर्तक. जर्मनीतील आइस्लेबन, सॅक्सनी ...
मार्डुक (Marduk)

मार्डुक

प्राचीन बॅबिलोनियातील एक प्रमुख देव. तो जलदेव एन्की (इआ) व डॅमकिना (दमकिना) यांचा मुलगा होय. मार्डुक हा सूर्याशी संबंधित देव ...
मिथ्र (Mithra)

मिथ्र

इराणच्या पारशी धर्मातील देवता. इंडो-इराणीयन कालखंडातील या देवतेचा संबंध प्रकाश, करार, वचन व बंधन यांच्याशी आहे. मिथ्र या शब्दाची व्युत्पत्ती ...
मीन (Min)

मीन

एक प्राचीन ईजिप्शियन देव. इ.स.पू. ६०००–३१५० हा त्याचा काळ मानला जातो. सुरुवातीला तो उत्पादकतेशी, धान्यांच्या वाढीशी, काळ्या सुपीक मातीशी संबंधित ...
मुतझिला (Mutazila)

मुतझिला

एक बुद्धिप्रामाण्यवादी इस्लामी धर्मपंथ. ‘मुतझिल’ ह्याचा अर्थ ‘फुटीरतावादी’ असा होतो. बसरा (इराक) ही मुतझिलांची जन्म व कर्मभूमी होती. विशेषत: ग्रीक ...