(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

कूर्मासन (Kurmasana)

कूर्मासन

एक आसनप्रकार. कूर्म म्हणजे कासव. या आसनामध्ये शरीराची अंतिम स्थिती कासवासारखी दिसते म्हणून या आसनाला कूर्मासन असे म्हणतात. कृती : ...
केवली प्राणायाम (Kevali Pranayama)

केवली प्राणायाम

घेरण्डसंहितेत निर्दिष्ट केलेल्या आठ प्रकारच्या कुंभकांपैकी ‘केवलकुंभक’ हा शेवटचा व प्रमुख कुंभक होय. केवलकुंभक म्हणजेच केवली प्राणायाम. तो ‘पूरक-रेचका’शिवाय होतो, ...
कैवल्य

दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट ...
क्रियायोग (Kriya yoga)

क्रियायोग

क्रिया हाच योग किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे क्रियायोग. जेव्हा क्रिया किंवा कर्म हे स्वत:च योगसाधना आहे अशा भावनेने केले जाते, ...
क्रियायोग (योगोदा सत्संग सोसायटी) (Kriya Yoga - Yogoda Satsanga Society)

क्रियायोग

क्रियायोग ही प्राचीन काळातील लुप्तप्राय झालेली साधना महावतार बाबाजी नामक अलौकिक योग्यांनी परत शोधून काढली, त्या साधनेच्या आचारपद्धतीचे नवे तंत्र ...
क्लेश

योगशास्त्रात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांना ‘क्लेश’ अशी संज्ञा आहे (अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा:| योगसूत्र २.३). ते नाना प्रकारच्या ...
क्षुरिकोपनिषद् (Kshurikopanishad)

क्षुरिकोपनिषद्

कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात अवघे २५ मंत्र आहेत. यातील उपदेश साधकांना संसाराचे बंध कापून मोक्षाची वाट सुकर करण्यासाठी ...
खेचरी मुद्रा (Khechari Mudra)

खेचरी मुद्रा

योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा. ही मुद्रा जिभेशी संबंधित असून ती शारीरिक, मानसिक तसेच शरीरांतर्गत ग्रंथींचे कार्य प्रभावित करणारी आहे. यामुळे ...
गरुडासन (Garudasana)

गरुडासन

एक आसनप्रकार. या आसनामध्ये शरीराचा आकार गरुड पक्षाप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला गरुडासन असे म्हणतात. गरुडासन कृती : आसनपूर्व स्थितीमध्ये ...
गर्भासन (Garbhasana)

गर्भासन

एक आसनप्रकार. गर्भाशयामध्ये बाळ जसे संपूर्ण शरीर घट्ट आवळून बसते, तसाच शरीराचा आकार या आसनाच्या अंतिम स्थितिमध्ये दिसतो, म्हणून या ...
गुणपर्व (Different stages of manifestation of gunas)

गुणपर्व

सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. पर्व या शब्दाचा अर्थ पेर किंवा विभाग असा होतो. विशेष, अविशेष, लिंगमात्र, ...
गोमुखासन (Gomukhasana)

गोमुखासन

योगासनाचा एक प्रकार. गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड. या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात ...
गोरक्षशतकम् (Gorakshashatakam : a treatise on Yoga) 

गोरक्षशतकम्

गोरक्षशतकम्  हा गोरक्षनाथ यांनी लिहिलेला पद्यग्रंथ आहे. गोरक्षनाथांच्या काळाबद्दल मतभेद असून ते ७ वे ते १५ वे शतक या दरम्यान ...
घेरण्डसंहिता (Gheranda Samhita)

घेरण्डसंहिता

हठयोगावरील संस्कृत भाषेतील महत्त्वाचा पद्यग्रंथ. संहिता म्हणजे संग्रह अथवा विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी. हठयोगावर गोरक्षसंहिता, हठयोगप्रदीपिका, घेरण्डसंहिता  आणि शिवसंहिता  हे ...
चक्रासन (Chakrasana)

चक्रासन

एक आसनप्रकार. ‘चक्र’ या संस्कृत शब्दाचा अर्थ चाक असा आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर गोलाकार होते म्हणून याचे नाव ...
चतुर्व्यूह (Fourfold aspects of a structured procedure)

चतुर्व्यूह

योगशास्त्राची रचना चार मुख्य घटकांवर आधारित असल्यामुळे योगशास्त्राला चतुर्व्यूह म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात (आयुर्वेदात) रोग, रोगाचे कारण, आरोग्य (रोगाचा नाश) ...
चंद्राभ्यास प्राणायाम (Chandrabhedana Pranayama)

चंद्राभ्यास प्राणायाम

प्राणायामात जेव्हा चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने पूरक व रेचक केला जातो, त्यास चंद्राभ्यास किंवा चंद्रभेदन प्राणायाम असे नाव आहे. चंद्रनाडीने ...
चित्तपरिणाम (Changes in Chitta)

चित्तपरिणाम

चित्त हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे गुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. चित्ताच्या ...
चित्तप्रसादन (Chittaprasadana)

चित्तप्रसादन

चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय ...
चित्तभूमी (Chitta Bhumi)   

चित्तभूमी

चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी ...