(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

चित्तप्रसादन (Chittaprasadana)

चित्तप्रसादन

चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय ...
चित्तभूमी (Chitta Bhumi)   

चित्तभूमी

चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी ...
चित्ताचे अपरिदृष्ट धर्म (Subtle attributes of the Mind)

चित्ताचे अपरिदृष्ट धर्म

महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर अनेक व्याख्या आणि टीकाग्रंथ लिहिले गेले आहेत, त्यांमध्ये व्यासभाष्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रांमध्ये वर्णन ...
जनार्दनस्वामी (Janardan Swami)

जनार्दनस्वामी

जनार्दनस्वामी : (१८ नोव्हेंबर १८९२ — २ जून १९७८). जनार्दनस्वामी यांचे पूर्वाश्रमीचे नाव जनार्दन गोडसे असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील ...
जागतिक योग दिन (International Yoga Day)

जागतिक योग दिन

योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. मानवी ...
जाबालदर्शनोपनिषद् (Jabaldarshanopnishad)

जाबालदर्शनोपनिषद्

जाबालदर्शनोपनिषद् हे सामवेदाशी संबंधित असलेले उपनिषद् आहे. यालाच दर्शनोपनिषद् असे म्हणतात. या उपनिषदामध्ये योगशास्त्रातील संकल्पनांचा विचार पातंजल योगाबरोबरच किंबहुना त्यापेक्षा ...
ज्ञानमुद्रा (Dnyanmudra)

ज्ञानमुद्रा

योगाभ्यासातील एक आसन प्रकार. हाताचा अंगठा हे विश्वात्म्याचे व तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) हे जीवात्म्याचे प्रतीक मानलेले आहे. या दोहोंची जुळणी ...
तत्त्वसमाससूत्र (Tattvasamasasutra)

तत्त्वसमाससूत्र

तत्त्वसमाससूत्र हा सूत्ररूप ग्रंथ इसवी सनाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात निर्माण झाला. त्याच्या कर्त्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही विद्वानांच्या ...
तन्मात्र

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र, ...
ताडासन (Tadasana)

ताडासन

एक आसनप्रकार. ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या ...
तुष्टि  [Contentment (positive and negative)]

तुष्टि  [Contentment

तुष्टी या शब्दाचा शब्दश: अर्थ संतोष व समाधान असा आहे. सांख्यदर्शनामध्येही हा शब्द याच अर्थाने परंतु एक पारिभाषिक संज्ञा म्हणून ...
तेजोबिंदू उपनिषद् (Tejobindu Upanishad)

तेजोबिंदू उपनिषद्

तेजोबिंदू उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदांतर्गत येणारे उपनिषद् असून तेजोबिंदूवर केलेले ध्यान, सच्चिदानंदरूप परमतत्त्व, विदेहमुक्तीचा साक्षात्कार इत्यादी मुद्यांची चर्चा याच्या सहा ...
त्राटक (Trataka)

त्राटक

‘त्राटक’ हे हठयोगातील षट्कर्मांपैकी एक कर्म असून ते अत्यंत मौलिक आहे असे हठप्रदीपिकेत म्हटले आहे (२.३३ ). दृष्टिदोषांनी पीडित लोकांसाठी ...
त्रिकोणासन (Trikonasana)

त्रिकोणासन

एक आसनप्रकार. हे आसन करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात. त्रिकोणासन कृती : आसनपूर्व स्थितीमध्ये दोन्ही ...
त्रिगुण

सांख्य-योग दर्शनांनी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले आहेत. हे त्रिगुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या ...
द योग इन्स्टिट्यूट (The Yoga Institute)

द योग इन्स्टिट्यूट

द योग इन्स्टिट्यूट ही प्रामुख्याने योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जगातील पहिली योगसंस्था आहे. श्री योगेंद्र यांनी १९१८ साली ...
दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट (The Lonavla Yoga Institute)

दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट

योगाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था. दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट (इंडिया) ही संस्था डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे यांनी १ जून १९९१ ...
दु:ख

जीवाला ज्या भावनेचा अनुभव अप्रिय वाटतो, अशी प्रतिकूल भावना म्हणजे दु:ख होय. दु:खाचा अनुभव सर्वच जीवांना प्रत्यक्ष रूपाने येत असल्यामुळे ...
दु:खत्रय

भारतीय दर्शनांतील एक संज्ञा. त्रय म्हणजे तीन प्रकारचे. भारतीय दर्शनांत दु:ख तीन प्रकारचे मानले आहे. या दर्शनांमध्ये दु:ख, त्याची कारणे, ...
द्रव्य (Substance)

द्रव्य

सर्व दर्शनांमध्ये द्रव्य कशाला मानावे, द्रव्ये किती आहेत, त्यांचे स्वरूप काय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. योगदर्शनानुसार  पृथ्वी, जल, ...