(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

पश्चिमोत्तानासन (Pashchimottanasana)

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन एक आसनप्रकार. पश्चिम या संस्कृत शब्दाचा एक अर्थ ‘मागे’ असा आहे. ज्या आसनात शरीराची मागची अर्थात पाठीकडची बाजू ताणली ...
पुरुष

पुरुष आणि प्रकृति ही सांख्यदर्शनाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. भारतीय दर्शनात व्यक्तीच्या आत्म्यास ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. सांख्यदर्शनात पुरुषाला ...
प्रकृति

सांख्य-योग दर्शनांमध्ये पुरुष आणि प्रकृती ही दोन सर्वव्यापी आणि नित्य तत्त्वे आहेत. पुरुष म्हणजे चेतनतत्त्व आणि प्रकृति म्हणजे जडतत्त्व असे ...
प्रज्ञा

प्रज्ञा या शब्दाचा अर्थ ‘प्रकृष्ट ज्ञान’ अर्थात् संपूर्ण ज्ञान असा होतो. ज्यावेळी व्यक्तीला एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा ...
प्रतिपक्षभावन (Pratipaksha bhavana)

प्रतिपक्षभावन

ज्यावेळी चित्तामध्ये अहिंसा इत्यादी यमांच्या साधनेला प्रतिकूल विचार उत्पन्न होतो त्यावेळी त्या विचाराला छेद देणाऱ्या सकारात्मक विषयावर ध्यान करणे याला ...
प्रतिप्रसव / प्रतिसर्ग (Pratiprasava / Pratisarga)

प्रतिप्रसव / प्रतिसर्ग

‘प्रसव’ किंवा ‘सर्ग’ याचा अर्थ सृष्टी किंवा निर्मिती असा आहे. ‘प्रतिप्रसव’ म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमश: मूळ कारणात लय होणे. प्रकृति म्हणजे ...
प्रत्यय (Knowledge)

प्रत्यय

सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय ...
प्रत्ययसर्ग

बुद्धीमध्ये असणाऱ्या धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, राग (आसक्ती), वैराग्य, ऐश्वर्य (अष्टसिद्धी) आणि अनैश्वर्य (सिद्धींचा अभाव) या आठ भावांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे ...
प्रत्याहार (Pratyahara)

प्रत्याहार

‘प्रत्याहार’  या  शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति ...
प्रमाण (Valid knowledge)

प्रमाण

‘प्रमा’ म्हणजे यथार्थ ज्ञान व ज्या साधनाद्वारे ज्ञान प्राप्त होते त्याला ‘प्रमाण’ असे म्हणतात. योगदर्शनानुसार कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी चित्ताची ...
प्राण (योगविज्ञान)

प्राण

प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच प्रमुख प्राण तसेच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण मानवी ...
प्राणायाम (Pranayama / Restrain of Breathing)

प्राणायाम

प्राणायाम हा हठयोग व पातंजल (अष्टांग) योगाचा एक प्रमुख भाग आहे. आसनांच्या दीर्घ अभ्यासामुळे प्राणायामासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची, उदा., शारीरिक व ...
प्रातिभ (ज्ञान)

प्रातिभ

विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही ...
बंध

अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुष (आत्मा) चित्ताशी तादात्म्याचा अनुभव करतो व स्वत:ला चित्ताद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजतो. या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे ...
बुद्धीचे आठ भाव

बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यत: आकलन-क्षमता असा समजला जातो; परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे ‘निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन’ होय ...
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति (Brihadyogiyajnavalkyasmriti)

बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति

हा ग्रंथ स्मृतिवाङ्मयात मोडतो. या स्मृतिमध्ये योगशास्त्रविषयक विवेचन असल्यामुळे  योगशास्त्राच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची मानली जाते.या ग्रंथाची रचना नवव्या शतकाच्या पूर्वी ...
ब्रह्मचर्य (Celibacy)

ब्रह्मचर्य

पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी ब्रह्मचर्य हा चवथा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवरील संयम. व्यासभाष्यात ...
भद्रासन (Bhadrasana)

भद्रासन

एक आसनप्रकार. भद्र म्हणजेच जे शुभ आहे, कल्याणकारी आहे. भद्रासन हे ध्यानात्मक स्वरूपाचे आसन आहे. योग साधकांसाठी अध्यात्मिक दृष्ट्या अधिक ...
भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन

योगासनाचा एक प्रकार. हठयोगातील हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. ‘भुजंग’ म्हणजे सर्प. भुजंग ह्या शब्दाने क्वचित नागाचाही बोध होतो. या ...
भूतजय

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा ...