(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

योगदर्शन (Yoga Darsana)

योगदर्शन

योगदर्शन हे भारतीय दर्शनांच्या परंपरेतील वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा प्रमुख आस्तिक दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ म्हणजे ...
योगदर्शनानुसार कारणांचे प्रकार

सर्व दर्शनांमध्ये ‘कार्य-कारण संबंध’ हा महत्त्वपूर्ण विषय चर्चिला गेला आहे. संस्कृत भाषेमध्ये कार्य शब्दाचा अर्थ — ‘जे उत्पन्न होते ते ...
योगदर्शनानुसार धर्म व धर्मी

धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनलेला असून या धातूचा मूळ अर्थ ‘धारण करणे’ असा होतो. या अर्थानुसार एखाद्या ...
योगयाज्ञवल्क्य (Yoga Yajnavalkya)

योगयाज्ञवल्क्य

पातंजल योगसूत्रावर आधारित एक ग्रंथ. या ग्रंथात १२ अध्यायांतून याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादाच्या रूपाने येणाऱ्या ५०४ श्लोकांद्वारे अष्टांगयोगाच्या प्रत्याहार, ...
योगवासिष्ठ (Yogavasishtha)

योगवासिष्ठ

योगवासिष्ठ  हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता  या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते ...
योगशास्त्रानुसार मौनाचे प्रकार

महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो ...
योगशिखा-उपनिषद्

योगशिखा-उपनिषद् (योगशिखोपनिषद्) हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् पद्य शैलीत असून योगविषयक उपनिषदांमध्ये त्याची गणना केली जाते. प्रस्तुत उपनिषदामध्ये गुरू (महेश्वर) आणि ...
योगसारसंग्रह

योगसारसंग्रह हा आचार्य विज्ञानभिक्षूंनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यांनी लिहिलेल्या योगवार्त्तिक  या व्यासभाष्यावरील विस्तृत टीकेनंतर योगमताचे सार म्हणून योगसारसंग्रह हा ग्रंथ ...
योगसूत्रे (Yoga Sutras)

योगसूत्रे

‘योगसूत्रे’ हा ग्रंथ योगदर्शनचा पाया आहे. इ. स. पूर्व २ रे शतक हा सर्वसाधारणपणे योगसूत्राचा काळ समजला जातो. योगसूत्रांच्या संख्येविषयी ...
योनिमुद्रा (Yoni mudra)

योनिमुद्रा

योनिमुद्रा ही योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा आहे. योनी ह्या शब्दाने गर्भाशयाचा किंवा उत्पत्ती स्थळाचा बोध होतो. योनीमुद्रेच्या साधनेने साधक निर्मितीक्षम ...
राग (Attachment)

राग

राग म्हणजे ‘आसक्ती’ होय. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ ‘क्रोध’ असा होतो, परंतु संस्कृतमध्ये प्रिय वस्तूंप्रति असणारी आसक्ती म्हणजे राग ...
वक्रासन (Vakrasana)

वक्रासन

एक आसनप्रकार. वक्र म्हणजे वळविलेला किंवा पीळ दिल्याप्रमाणे डावीकडे किंवा उजवीकडे फिरविलेला. या आसनात मेरुदंडास पीळ दिला जातो म्हणून या ...
वज्रासन (Vajrasana)

वज्रासन

वज्रासन वज्रासन : पश्चबाजू स्थिती. एक आसनप्रकार. वज्र म्हणजे इंद्रदेवाचे आयुध. वज्र हे अतिशय दृढ व शक्तिशाली असते. त्याप्रमाणेच या ...
वमनधौती (Vaman Dhauti)

वमनधौती

षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी धौती क्रियेचा एक प्रकार. धौती म्हणजे धुणे, स्वच्छ करणे. धौतीचे अंतर्धौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन किंवा गणेश क्रिया ...
वराहोपनिषद् (Varaha Upanishad)

वराहोपनिषद्

वराह रूपातील भगवंतांनी महामुनी ऋभु यांना सांगितलेले तत्त्वज्ञान हा वराह उपनिषदाचा विषय आहे. ह्यात एकूण पाच अध्याय असून त्यांत भगवंतांनी ...
वस्त्रधौती (Vastra Dhauti)

वस्त्रधौती

षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी धौती क्रियेचा एक प्रकार. धौती म्हणजे धुणे, स्वच्छ करणे. धौतीचे अंतर्धौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन किंवा गणेश क्रिया ...
वासना (Vasana)

वासना

वासना या संकल्पनेचा सर्वसामान्य अर्थ इच्छा किंवा कामना असा होतो. परंतु महर्षी पतंजलींनी ‘पातंजल योगसूत्र’ ग्रंथातील कैवल्यपाद या चौथ्या प्रकरणात ...
विकल्प (Vikalpa)

विकल्प

योगदर्शनानुसार चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी विकल्प ही एक प्रकारची वृत्ती आहे. विकल्प या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘पर्याय’ असा आहे. परंतु, योगशास्त्रात ...
विक्षेप-सहभू (Factors accompaning distraction)

विक्षेप-सहभू

महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (योगसूत्र १.३०) योगाभ्यासात येणारी नऊ विघ्ने सांगितली आहेत. या विघ्नांना त्यांनी अंतराय अशी संज्ञा वापरली आहे ...
विपरीतकरणी (Viparita-karani)

विपरीतकरणी

विपरीतकरणी हठयोगात निर्देश केलेल्या मुद्रांपैकी विपरीतकरणी ही एक मुद्रा आहे. या मुद्रेचा उपयोग आसन म्हणूनही केला जातो. विपरीत म्हणजे उलटे ...