(प्रस्तावना) पालकसंस्था : के. जे. सोमैय्या भारतीय संस्कृतिपीठम्, विद्याविहार (पूर्व), मुंबई | समन्वयक : रूद्राक्ष साक्रीकर | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

सर्वांगासन (Sarvangasana)

सर्वांगासन (Sarvangasana)

एक आसनप्रकार. या आसनामुळे शरीराच्या सर्व अवयवांना लाभ होतो म्हणून या आसनाला सर्वांगासन असे म्हणतात. या आसनाच्या रचनेवरून हे आसन ...
संस्कार (Samskara; Impressions)

संस्कार (Samskara; Impressions)

सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ ...
सहित प्राणायाम (Sahit Pranayaam)

सहित प्राणायाम (Sahit Pranayaam)

हठयोगप्रदीपिकेत प्राणायामाचे पूरक, रेचक व कुंभक असे तीन प्रकार आणि कुंभकाचे सहित व केवल हे दोन उपप्रकार सांगितले आहेत (प्राणायामस्त्रिधा ...
सांख्यकारिका (Samkhyakarika)

सांख्यकारिका (Samkhyakarika)

आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) ...
सांख्ययोगगीता (Sankhyayoga Gita)

सांख्ययोगगीता (Sankhyayoga Gita)

महाभारताच्या शांतिपर्वाच्या मोक्षधर्मपर्वात भीष्म व युधिष्ठिर ह्या दोघांमधला सांख्य व योग ह्या विषयांवरील संवाद आलेला आहे. हीच सांख्ययोगगीता होय. सांख्य ...
सिद्धसिद्धान्तपद्धति (Siddhasiddantapaddhatih)

सिद्धसिद्धान्तपद्धति (Siddhasiddantapaddhatih)

सिद्धसिद्धान्तपद्धति  हा गोरक्षनाथांनी रचलेला ग्रंथ नाथयोगाच्या परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. नाथयोगाचे तत्त्वज्ञान, परमात्म्याचे स्वरूप, विश्वोत्पत्तीचा सिद्धांत, अवधूत योग्याची लक्षणे इत्यादी ...
सिद्धासन (Siddhasana)

सिद्धासन (Siddhasana)

एक आसनप्रकार. सिद्धासनाने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, म्हणून यास सिद्धासन असे म्हणतात. हे आसन योगी लोकांच्या आवडीचे आहे. मुक्तासन, ...
सिद्धि (Accomplishments)

सिद्धि (Accomplishments)

विशिष्ट योगसाधना केल्यावर योग्याला स्वत:च्या चित्तात, इंद्रियांत किंवा शरीरात असणाऱ्या असाधारण योग्यतेची जाणीव होते व योगी स्वत:मधील विशेष सामर्थ्य वापरण्यास ...
सिंहासन (Simhasana)

सिंहासन (Simhasana)

या आसनात चेहेऱ्यावरचे उग्र भाव सिंहमुखाची आठवण करून देतात म्हणून या आसनाला सिंहासन हे नाव दिले आहे. घेरण्डसंहिता, हठप्रदीपिका, वसिष्ठसंहिता, ...
सीत्कारी प्राणायाम (Sitkari Pranayama)

सीत्कारी प्राणायाम (Sitkari Pranayama)

सीत्कार किंवा सीत्कृति म्हणजे श्वास आत घेताना झालेला किंवा केलेला शीतलतेचे/थंडीने कुडकुडण्याचे प्रतीक असलेला आवाज. या सीत्कार क्रियेचा योगशास्त्रात प्राणायामातील ...
सूक्ष्म शरीर / लिंगदेह (लिंगशरीर)

सूक्ष्म शरीर / लिंगदेह (लिंगशरीर)

डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, ...
सूर्यनमस्कार (Surya namaskar)

सूर्यनमस्कार (Surya namaskar)

व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ ...
सूर्यभेदन प्राणायाम (Suryabhedan Pranayam)

सूर्यभेदन प्राणायाम (Suryabhedan Pranayam)

हठयोगाच्या परिभाषेनुसार ‘सूर्य’ म्हणजे ‘सूर्यनाडी’ अर्थात ‘उजवी’ नाडी व ‘चंद्र’ म्हणजे ‘चंद्रनाडी’ अर्थात ‘डावी’ नाडी. हठयोगात शरीराच्या उजव्या भागाचा निर्देश ...
स्मृति (Smriti)

स्मृति (Smriti)

योगदर्शनानुसार स्मृति ही चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी एक वृत्ति आहे. ज्या वस्तूचा अनुभव घेतला असेल, त्या वस्तूचेच स्मरण होऊ शकते व ...
स्वस्तिकासन (Swastikasana)

स्वस्तिकासन (Swastikasana)

स्वस्तिकासन एक आसनप्रकार. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीनुसार शुभचिन्ह आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पायांची रचना स्वस्तिकाच्या फुलीप्रमाणे दिसते म्हणून या ...
हठरत्नावली (Hatharatnavali)

हठरत्नावली (Hatharatnavali)

श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला ...
हनुमानासन (Hanumanasana)

हनुमानासन (Hanumanasana)

एक आसनप्रकार. या आसनामध्ये शरीराचा आकार (विशेषत: पायांमधील अंतरामुळे होणारा शरीराचा आकार) हा झेप घेतलेल्या हनुमानासारखा दिसतो म्हणून या आसनाला ...
हलासन (Halasana)

हलासन (Halasana)

एक आसनप्रकार. शेतात नांगरणीसाठी जो नांगर (हल) वापरतात त्याप्रमाणे या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतीबंध भासतो, म्हणून या आसनास हलासन ...
हंसासन (Hansasana)

हंसासन (Hansasana)

एक आसनप्रकार. हे आसन करताना शरीराचा आकृतीबंध हंस पक्षाप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला हंसासन असे म्हणतात. हंसासन कृती : आसनपूर्व ...
हस्तमुद्रा (Hastamudra - gesture of hand)

हस्तमुद्रा (Hastamudra – gesture of hand)

योगशास्त्र, नृत्य आणि धार्मिक क्रियांमध्ये हस्तमुद्रांचे अनन्यसाधारण स्थान आढळते. चित्तशोधन, चित्ताची एकाग्रता, मनोविजय तसेच वायूवरील नियंत्रणासाठी योगशास्त्रात मुद्रांचे महत्त्व सांगितले ...