मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.