काश्मीर विद्यापीठ (Kashmir University)

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये जम्मू व काश्मीर या नावाने स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठाचे १९६९ मध्ये विभाजन होऊन जम्मू आणि काश्मीर अशी दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली.…

जम्मू विद्यापीठ (Jammu University)

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. १९४८ मध्ये श्रीनगर येथे जम्मू व काश्मीर या नावाचे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. १९६९ मध्ये या विद्यापीठाची दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली.…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University)

महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील एक जुने विद्यापीठ. विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठ या नावाने झाली. सुरुवातीला विद्यापीठाचे अधिकारक्षेत्र विदर्भातील ११ जिल्ह्यांत होते; परंतु १९८३ मध्ये संत गाडगेबाबा…

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ काश्मीर (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Kashmir)

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२ च्या आधिनियमानुसार १९८२ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. श्रीनगरमधील शालीमार येथे या विद्यापीठाचे मुख्य केंद्र आहे.…

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ जम्मू (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Jammu)

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. काश्मीर विभागाच्या तुलनेत जम्मू विभागातील पशुधन, कृषिप्रकार, पिकांचे स्वरूप इत्यादींमध्ये तफावत असून तेथील समस्यांचे स्वरूपही वेगळे आहे. त्यामुळे जम्मू विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी वारंवार…

श्री कृष्णदेवराय विद्यापीठ (Shri Krishnadevaraya University)

आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर येथील एक सार्वजनिक विद्यापीठ. स्थापना १९८१. तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे एक पदव्युत्तर शिक्षण केंद्र म्हणून १९६८ मध्ये याचे कार्य सुरू झाले. १९७६ मध्ये या पदव्युत्तर…

पारिस्थितिकीय स्तूप (Ecological pyramid)

कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक पोषणपातळीवरील जैववस्तुमान किंवा जैववस्तुमानाची उत्पादकता, सजीवांची संख्या, ऊर्जा-विनिमयाची पातळी यांसंबंधीची माहिती ही आलेख स्वरूपात मांडली जाते, तिला पारिस्थितिकीय स्तूप म्हणतात. ब्रिटनचे प्राणिवैज्ञानिक आणि पारिस्थितिकीतज्ज्ञ चार्ल्स एल्टन यांनी…