गोंधळ (Gonadhal)

महाराष्ट्रातील काही कुळांत प्रचलित असलेला एक कुलाचार. घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा विधी असतो. रेणुका, अंबाबाई व तुळजाभवानी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ…

खंडोबा (Khandoba)

महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते हे दैवत सु.अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले.…

पोवाडा (Powada)

एक मराठी काव्यप्रकार. पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन, अशी आजची समजूत; परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत पुढील तीन प्रकारची कवने आढळतात : (१) दैवतांच्या अद्‌भुत लीला…

सगनभाऊ (Saganbhau)

सगनभाऊ : (सु. १७७८- सु. १८५०). मराठी शाहीर व लावणीकार. तो मुस्लिमधर्मीय असून धंदयाने शिकलगार म्हणजे हत्यारांना धार लावणारा कारागीर होता; पण या पिढीजाद धंदयात त्यास विशेष रस नव्हता, म्हणून…

ग्रामदैवते (Gramdaivate)

ग्रामसंस्थेला भारतात विशेष महत्त्व असून ह्या ग्रामांची जी संरक्षक दैवते आहेत, त्यांना ग्रामदैवते म्हणतात. ग्रामसंस्थेत ह्या ग्रामदैवतांना प्राचीन काळापासून फार महत्त्व असल्याचे दिसून येते. भारतात आर्यांच्या वसाहती होण्यापूर्वीपासून भारतातील मूळ…

हदगा (Hadga)

एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय.हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे, अशी समजूत आहे.हे व्रत त्या समजुतीशी निगडित…

होनाजी बाळा (Honaji Bala)

(अठराव्या शतकाचा उत्तरार्ध–एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध). प्रसिद्ध शाहीर. संपूर्ण नाव होनाजी सयाजी शिलारखाने. जातीने नंदगवळी, पंथाने लिंगायत आणि धंद्याने गवळी. ह्याच्या घराण्यात किमान तीन पिढ्या शाहिरी पेशा चालत आलेला दिसतो. प्रसिद्ध…

कहाण्या (Folktale)

धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा. व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा मुख्य  उद्देश. अशा कहाण्या श्रावणमासात लेकीसुनांना वडीलधाऱ्या स्त्रिया सांगतात. त्यांना त्यायोगे  चांगले वळण…

भवाई (Bhawai)

गुजरात-राजस्थानमधील लोकनृत्यनाट्याचा एक पारंपरिक प्रकार. असाईत ठाकूर या गुजराती साधूला भवाईचा जनक मानतात. गुजराती भवाई नाट्याची कथा बहुधा लोकगीतांवर आधारलेली असून ती चार टप्प्यांत विभागलेली असते. पहिल्या टप्प्यात हंसोली व…

बंगाली जात्रा (Bengali Jatra)

बंगाली लोकनाट्याचा एक प्रकार. बिहार व ओरिसातही तो लोकप्रिय आहे. ‘जात्रा’ म्हणजे यात्रा. निरनिराळ्या सणावारी देवदेवतांच्या मूर्ती रथातून नगरप्रदक्षिणेला काढण्याची पुरातन प्रथा आहे. रथयात्रा, दोलायात्रा या अशाच यात्रा होत. बंगालमध्ये…

गौळण (Gawlan)

मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार. कृष्णाच्या बालक्रिडा, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गौळणींनी यशोदेकडे आणलेल्या तक्रारी, त्यांतूनच गौळणींनी मांडलेले कृष्णदेवाचे प्रच्छन्न ‘कवतिक’, गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या…

पठ्ठे बापूराव (Patthe Bapurao)

पठ्ठे बापूराव : (११ नोव्हेंबर १८६६–२२ डिसेंबर १९४५).प्रसिद्ध मराठी शाहीर. मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सांगली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूराव ब्राह्मण…

शाहीर साबळे (Shahir Sable)

साबळे, शाहीर : (३ सप्टेंबर १९२३–२० मार्च, २०१५) ). ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे परंतु शाहीर साबळे ह्या नावानेच ते परिचित आहेत. सातारा जिल्ह्यातील…

लोकसाहित्य (Folklore)

लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात.‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते.पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची…

लोककथा (Folktale)

लोककथा: पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा ही सुद्धा समूहनिर्मित,समूहरक्षित असते. ती परंपरागत तरीही परिवर्तनशील आणि प्रवाही असते.मौखिक परंपरेने…