गांडूळ (Earthworm)

अ‍ॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्‍या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी…