कांदळ (True mangrove)

कांदळ : (इं.ट्रु मॅनग्रोव्ह; क.कांदले; लॅ.ऱ्हायझोफोरा मक्रोनेटा;  कुल ऱ्हायझोफोरेसी).  हा सदापर्णी लहान वृक्ष (४.५-७.५ मी. उंच)  समुद्रकिनारी दलदलीच्या जागी, भारत (मुंबई, तमिळनाडू, अंदमान व बंगाल), श्रीलंका, सिंध, ब्रह्मदेश व मलाक्का…