इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रणाली (Electronic Communication System)

माहितीचे आदान-प्रदान म्हणजे संप्रेषण (Communication) होय. एकमेकांमध्ये अधिक अंतर असल्यास माहितीच्या प्रसारासाठी टेलिग्राफ व टेलिफोन यांचा वापर पूर्वी केला जात असे. दूरध्वनी (Telephone), भ्रमणध्वनी (Mobile), दूरचित्रवाणी (Television), रेडिओ (Radio, wireless…