अरविंद घोष (Aurobindo Ghosh)

घोष, अरविंद : (१५ ऑगस्ट १८७२—५ डिसेंबर १९५०). आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी. जन्म कलकत्ता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात. आई स्वर्णलतादेवी म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक राजनारायण बोस यांची कन्या.…