एम. एन. रॉय (M. N. Roy)

रॉय, मानवेंद्रनाथ : (२१ मार्च १८८७ ‒ २५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. कलकत्त्या(कोलकाता)जवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव…