मराठी विश्वकोशाचे अभिमान गीत
अमृताते पैजा जिंके अशी देववाणी
मराठीचे आम्ही सारे सारे अभिमानी
तिच्या सागरमंथनी लाभे अमृत कलश
मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश||
संथ वाहते कृष्णाई, तिच्या काठी गाव वाई
तर्कतीर्थांची भूमी ही, मराठीची हो पुण्याई
यशवंते बांधीयेला, मराठीचा ज्ञानसेतू
वर्धिष्णु करु भाषेला, अंतरात शुध्द हेतू ||
वृक्ष लावियेला द्वारी, अज्ञातास होई ज्ञात
सरस्वतीच्या अंगणी, मराठीचा पारीजात
उपासकांची साधना, करी अज्ञानाचा नाश
मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश||
गीत : डॉ. विजया वाड
संगीत : अशोक पत्की
गायक : शंकर महादेवन
संकल्पना व सुलेखन : अच्युत पालव
निर्मिती : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ