श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती,जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो.देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले.गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदीआनंद झाला.या दिवशी उपवास करतात.रात्री मंदिरातून जन्मोत्सव आणि कथाकीर्तने होतात.वैष्णव संप्रदायात हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारकादी क्षेत्रांत,कृष्णजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.दहीहंडी वृंदावन येथे या निमित्ताने ‘दोलोत्सव’ होतो.कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दहीकाला होतो व दहिहंड्या फोडतात. काही ठिकाणी गोपालकाला होतो.

गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा