युट्रोफिकेशन आणि हवामानातील बदलांचा खारफुटींवर परिणाम (Effect of Eutrophication and Climate Change to Mangrove Vegetation)

जमिनीवरील विविध स्रोतांमधून मूलद्रव्यांचा अव्याहत ओघ जलप्रवाहात येऊन मिळत असतो. त्यामुळे अशा जलसंस्था आणि त्यांचे कार्य यासाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा वाढीव प्रमाण पाण्यात आढळते. याला युट्रोफिकेशन असे म्हणतात. सागरात पाण्याचे…

पोषकद्रव्यांच्या संवर्धनासाठी खारफुटींचे धोरण (Mangrove Strategy for Nutrient Enrichment)

अति क्षाराच्या जमिनीमध्ये वाढताना झालेल्या अनुकूलनांमुळे खारफुटी वनस्पती या अनेक बाबतीत जमिनीवर वाढणार्‍या इतर वनस्पतींपासून वेगळ्या आहेत. त्यामुळेच मातीतील पोषकद्रव्यांचे ग्रहण करण्याच्या बाबतीतील त्यांचे धोरणही निराळे आहे. सामान्यत: खारफुटी वनस्पतींच्या…

अंकीय वनस्पतिसंग्रह (Digital Herbarium)

वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरणशाखेत वनस्पतींचे नमुने अभ्यासाकरिता जपून ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. सगळ्या वनस्पती सर्वकाळ उपलब्ध होत नाहीत, शिवाय वर्गीकरण दृष्ट्या शाकीय अवयवांपेक्षा त्यांच्या फुलांचा आणि फळांचा उपयोग अधिक परिणामकारक…

वनस्पतींतील प्रतिकार योजनाची उत्क्रांती (Evolution of Defence Strategies in Plants)

जैविक उत्क्रांतीच्या एकंदर प्रक्रियेत ‘नैसर्गिक निवड’ हे महत्त्वाचे सूत्र वारंवार आढळून आले आहे. निसर्गचक्रात वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे परस्परसंबंधदेखील यांवरच आधारित आहेत. उत्क्रांतीच्या  विविध टप्प्यांवर वनस्पतींचे त्यांच्या समुदायातील अन्य…