जिराफ (Giraffe)

समखुरी गणाच्या जिराफिडी कुलातील सस्तन प्राणी. जलद गतीने चालणारा या अर्थाच्या 'झरापा' या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे. जिराफाचे वास्तव्य फक्त आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण भागातील खुल्या वनक्षेत्रात आहे.…