मराठी भाषा विभाग/प्रशासकीय
शिक्षण : एम. ए., एम. बी. ए., एम, एल्, एल, पीएच डी.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
प्रा. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor) आहेत. 'भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (ICHR), नवी दिल्ली' या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. शालेय स्तरापासून विद्यापीठीय स्तरापर्यंत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीच्या क्षेत्रात सुमारे तीन दशके त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या चाळीस वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीत त्यांनी मुख्यतः इतिहास या विषयाचे अध्यापन व संशोधन केले. ते त्यांच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासामुळेसुद्धा ओळखले जातात. त्यांनी विपुल प्रमाणात काव्य आणि ललित व वैचारिक लेखन केलेले असून विविध ग्रंथांचे लेखन व संपादनही केलेले आहे. 'राजा दीक्षित' या लेखन-नामानेच ते मुख्यतः ओळखले जातात. प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. 'नवभारत' या वैचारिक मासिकाचे ते संपादक आहेत. नोंदींच्या लेखन-संपादनाच्या निमित्ताने राजा दीक्षित हे मराठी विश्वकोशाशी गेली सुमारे पस्तीस वर्षे संबंधित आहेत. २७ मे २०२१ पासून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. विश्वकोशाच्या कामाला पूर्णविराम नसतो. ते सातत्याने चालणारे काम आहे, ती एक प्रवाही प्रक्रिया आहे. सध्याचे युग हे जागतिकीकरणाचे, ज्ञान-विस्फोटाचे, संज्ञापन-क्रांतीचे, नव्या तंत्रज्ञानाचे युग आहे. ज्ञानापासून वंचित अशा लोकसमूहांच्या जागृतीचे व सबलीकरणाचेही ते युग आहे. त्यामुळे या युगाचे भान ठेवून आणि ज्ञानात्मक व सामाजिक, अशी दुहेरी बांधिलकी बाळगून विश्वकोशाचे काम पुढे नेणे आवश्यक आहे. गुणवत्ता टिकवून, पण सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ रीतीने ज्ञानाची मांडणी करणे गरजेचे आहे. हे ज्ञान खेड्यापाड्यांपर्यंत, आदिवासी भागांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंतसुद्धा पोहोचवावे लागेल. आंतरजाल आणि मुद्रित अशा दोन्ही माध्यमांद्वारे सातत्याने व अद्ययावत स्वरुपात ज्ञानप्रसार करणे, परिभाषा घडवणे व मराठी भाषेच्या वृद्धीला हातभार लावणे विश्वकोशाच्या कामात अभिप्रेत आहे. हा प्रादेशिक भाषेतला कोश आहे, पण त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा, असाच आमचा प्रयत्न आहे.
- प्रा. राजा दीक्षित,
अध्यक्ष व प्रमुख संपादक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाई.
१. डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित, अध्यक्ष
२. डॉ. भीमराव उल्मेक, सदस्य
३. डॉ. श्रीनंद बापट, सदस्य
४. डॉ. अरूण भोसले, सदस्य
५. श्री. राहूल देशमुख, सदस्य
६. डॉ. प्रभाकर देव, सदस्य
७. श्री. सतिश आळेकर, सदस्य
८. श्री. हेमंत राजोपाध्ये, सदस्य
९. श्री. सुबोध जावडेकर, सदस्य
१०. श्री. आसाराम लोमटे, सदस्य
११. डॉ. रविंद्र रुक्मिणीबाई पंढरीनाथ, सदस्य
१२. श्री. निखिलेश चित्रे, सदस्य
१३. डॉ. प्रकाश पवार, सदस्य
१४, श्रीमती शर्मिला फडके, सदस्य
१५. डॉ. प्राची देशपांडे, सदस्य
१६. श्रीमती प्राची दुबळे, सदस्य
१७. डॉ. सदाशिव पाटील, सदस्य
१८. प्रा. संजय ठिगळे, सदस्य
१९. डॉ. कृष्णदेव गिरी, सदस्य
२०. डॉ. विशाल इंगोले, सदस्य
२१. डॉ. निंबा देवराव नांद्रे, सदस्य
२२. प्रा. संतोष पवार, सदस्य
२३. श्रीमती मनिषा उगले, सदस्य
२४. श्री. भाऊसाहेब चासकर, सदस्य
२५. प्रा. उल्हास पाटील, सदस्य