एखादा पदार्थ तापविला असता घन पदार्थाचे द्रवात रूपांतर होते आणि द्रव पदार्थ वाफेत रूपांतरित होतो. ही वाफ हवेच्या म्हणजेच ऑक्सिजनच्या संपर्कात आली की, तिचे ज्वलनशील मिश्रण तयार होते. या मिश्रणाचा ठिणगीशी संपर्क आला की, ज्या कमीत कमी तापमानाला पहिली ठिणगी पडते, ते तापमान त्या पदार्थाचा प्रज्वलन बिंदू (Flash point) होय. हेच तापमान पेट्रोलियम  पदार्थांची वर्गवारी करण्यासाठी वापरतात व त्यानुसार त्यांची हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक केली जाते.

पेट्रोलियम : या वर्गातील पदार्थांचा प्रज्वलन बिंदू २३ से. पेक्षा कमी असतो. पेट्रोल, नॅप्था तसेच काही बाष्पनशील रासायनिक द्रावण या वर्गात मोडतात. त्यांना धोकादायक संबोधिले जाते. यातील बर्‍याच पदार्थांचा प्रज्वलन बिंदू शून्याच्या खालीदेखील असतो.

पेट्रोलियम :  या वर्गातील पदार्थांचा प्रज्वलन बिंदू २३—६५ से. तापमानाच्या दरम्यान असतो. डिझेल, केरोसीन, टर्पेंटाइन तेल ही त्यांची उदाहरणे होत. हे पदार्थ तुलनात्मकदृष्ट्या कमी धोक्याचे असतात.

पेट्रोलियम :  या वर्गातील पदार्थांचा प्रज्वलन बिंदू ६५ से.च्यावर असतो. हे पदार्थ फारसे धोक्याचे नसतात. काळी इंधन तेले त्यांची उदाहरणे होत.

अवर्गीकृत पेट्रोलियम पदार्थ : वंगणतेलांना अवर्गीकृत पदार्थ म्हटले जाते कारण त्यांचा प्रज्वलन बिंदू १५० से. तापमानावर असतो.

प्रज्वलन बिंदू मोजण्यासाठी तीन प्रकारची उपकरणे वापरली जातात :

अ. क्र. उपकरणाचे नाव पदार्थ माप ( से.)
१. अॅबेल उपकरण (Abel apparatus) इंधने -१८ — ७०
२. पेन्स्की-मार्टेन बंदिस्त चषक उपकरण (Pensky-Marten closed-cup apparatus, PMCC) इंधने आणि वंगणे ३५ — १५०
३. क्लीव्हलँड  खुला चषक उपकरण (Cleveland open-cup apparatus, COC) वंगणे ८० च्या वर

 

पेट्रोलियम पदार्थ हायड्रोकार्बन रसायनांनी बनलेले असतात व ते विशिष्ट तापमानाच्या मर्यादेत उकळत असतात. इंधने आणि द्रावणे कमी तापमानाला उकळतात, तर वंगणे उच्च तापमानला वायुरूप बनतात. पेट्रोलियम पदार्थांचा प्रज्वलन बिंदू त्या द्रव्याचा  ० ते १० % घटक उकळण्यास जे तापमान लागते यावर अवलंबून असतो.

प्रज्वलन बिंदू बाष्पाशी निगडित असतो, तेव्हा  वातावरणाच्या दाबाचा त्यावर परिणाम होतो. या चाचणीचा एकजिनसीपणा राखण्यासाठी अवतीभवतीच्या  दाबाचे माप घेऊन येणाऱ्या किमतीला दुरुस्त करावे लागते आणि समुद्रसपाटीला असणाऱ्या वातावरणाच्या दाबाला (७६० mm Hg) किती प्रज्वलन बिंदू येऊ शकतो  याची नोंद करावी लागते.

संदर्भ :

  • Petroleum rules,1976,Government of India.
  • Indian Diary of Libricants:2003 SARBI engineering and WHG Pvt Ltd, Mumbai.
  • Auto Fuel Policy, MOP & G, of India,Oct.2003

 

समीक्षक – भालचंद्र भणगे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content