(प्रस्तावना) पालकसंस्था : रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई | समन्वयक : भालचंद्र भणगे | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
आजच्या आधुनिक विज्ञानात रसायनशास्त्राच्या विविध शाखा कार्यरत आहेत. या प्रत्येक शाखेचे महत्त्व हे वेगळे आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या निर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील औषधनिर्मितीपर्यंतची विविध क्षेत्रे ही रसायनशास्त्राच्या पायावर उभी आहेत. यात सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, तसेच भौतिक रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र अशा रसायनशास्त्रांच्या विविध शाखांचा वापर केला जातो. रसायनशास्त्राच्या या मूळ शाखांव्यतिरिक्त
धातुशास्त्र, बहुवारिकशास्त्र, पदार्थशास्त्र, जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र, अणुशास्त्र अशा इतर अनेक शाखांचाही रसायनशास्त्र हा एक अविभाज्य घटक आहे. इतकेच कशाला, तर आपल्या शरीरात वा निसर्गातील इतर सजीवांत चाललेल्या विविध क्रिया या रसायनशास्त्रामुळेच शक्य झाल्या आहेत.
रसायनशास्त्र हे प्रत्येक पदार्थाची जडण-घडण तपासते. तसेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या
पदार्थाबरोबर कशी आंतरक्रिया होते याचाही पाठपुरावा करते. त्यामुळे विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या
जडण-घडणीशी आणि त्याच्या गुणधर्माशी रसायनशास्त्राचा संबंध येतो. निसर्गात उपलब्ध असलेल्या
पदार्थांपासून मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास हा
रसायनशास्त्राचाचा भाग आहे. एखाद्या वस्तूच्या गुणधर्मात बदल करून त्याची सुधारित आवृत्ती निर्माण करणे किंवा विशिष्ट कारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या पदार्थाची नवनिर्मिती करणे, हीसुद्धा रसायनशास्त्राचीच कार्यक्षेत्रे आहेत. रसायनशास्त्राचा या बहुविध उपयोगांमुळे, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन हे विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचीही अत्यावश्यक गरज बनले आहे. याच कारणास्तव रसायनशास्त्राची विलक्षण वेगाने सर्वांगीण प्रगती होत आहे. या प्रगतीची माहिती होण्यासाठी, रसायनशास्त्राची वेगेवगळ्या अंगांनी ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यांना ही ओळख मराठीतून करून दिल्यास, जनसामान्यांना मानवी जीवनाशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निगडित असणाऱ्या रसायनशास्त्राचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकेल. रसायनशास्त्रावरील ज्ञानमंडळाचे हेच उद्दिष्ट आहे. विश्वकोशातील रसायनशास्त्रावरील या विभागात, रसायनशास्त्रातील विविध संज्ञा, रसायने, नियम, अभिक्रिया, प्रक्रिया, संशोधने, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती करून देण्यात येत आहे.
अकार्बनी रसायनशास्त्र (Inorganic Chemistry)

अकार्बनी रसायनशास्त्र

सर्व जैव रसायनांचा मुख्य घटक कार्बन असतो; म्हणून त्यांना कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व उरलेल्या सर्व रसायनांविषयीच्या ...
अँथ्रॅसीन (Anthracene)

अँथ्रॅसीन

अँथ्रसीन हे फिकट पिवळ्या रंगाचे स्थायुरूप कार्बनी संयुग आहे. हे तीन बेंझिन वलये एकमेकांशी जुळल्या जाऊन तयार झाले आहे. याचे ...
अधिशोषण (Adsorption)

अधिशोषण

अधिशोषण : पृष्ठीय प्रक्रिया. काही घन किंवा द्रव पदार्थ त्यांच्या पृष्ठभागाशी संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या घन, द्रव किंवा वायूरूप पदार्थांतील ...
अपघर्षक (Abrasive)

अपघर्षक

घर्षणाने पृष्ठाची झीज घडवून आणणारा पदार्थ. कोणत्याही वस्तूचा पृष्ठभाग घासून स्वच्छ करणे, गुळगुळीत करणे, त्याच्यावर चकाकी आणणे, पृष्ठ झिजवून त्या ...
अंबर, उदी (Ambergris, Ambergrease, Grey Amber)

अंबर, उदी

उदी अंबर हा एक नैसर्गिक राखाडी रंगाचा, मेणचट व सुगंधी स्थायू पदार्थ आहे. याचा उपयोग अत्तरे व सुगंधी द्रव्यनिर्मितीमध्ये करतात ...
अभिशोषण (Absorption)

अभिशोषण

ज्या क्रियेमध्ये वायू, द्रव किंवा घन पदार्थाचे दुसऱ्या द्रव किंवा घन पदार्थाकडून शोषण होते, त्या क्रियेला अभिशोषण असे म्हणतात. ज्या ...
अमाइडे (Amides)

अमाइडे

कारबॉक्सिलिक अम्‍लांच्या —COOH गटातील -OH चे प्रतिष्ठापन (संयुगातील एखाद्या अणूच्या जागी दुसरा अणू येणे) -NH2 या गटाने झाले म्हणजे अमाइडे ...
अमाइने (Amines)

अमाइने

अमोनियाच्या (NH3) एक, दोन किंवा तिन्ही हायड्रोजन अणूंच्या जागी एकसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांची प्रतिष्ठापना करून अमोनियापासून मिळणाऱ्या कार्बनी संयुगांचा एक गट ...
अमिनीकरण (Amine synthesis)

अमिनीकरण

अमाइन वर्गातील संयुगे तयार करण्याच्या क्रियेला अमिनीकरण म्हणतात. अमोनिया (NH3) मधील एक अथवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी एक अथवा अधिक ...
अमोनियम लवणे (Ammonium salts)

अमोनियम लवणे

अमोनियम आयन (NH4)+ अम्‍लांची  अमोनियासह किंवा त्याच्या पाण्याची विद्रावाशी विक्रिया होण्याने अमोनियाची लवणे तयार होतात. त्याच्यात NH4+ हा रंगहीन आयन ...
अमोनिया (Ammonia)

अमोनिया

इतिहास : ख्रि.पू. ४ थ्या शतकात ईजिप्तमधील लोक उंटाची लीद जाळल्यावर जी काजळी जमते तिच्यापासून अमोनियम क्लोराइड (नवसागर) बनवीत. ते ...
अम्लराज (Aqua regia)

अम्लराज

तीन मोल संहत (तीव्र) हायड्रोक्लोरिक अम्ल व एक मोल संहत नायट्रिक अम्ल यांच्या मिश्रणाला ‘अम्‍लराज’ म्हणतात. हे पिवळसर रंगाचे वाफाळणारे ...
अऱ्हेनियस सिद्धांत (Arrhenius Theory)

अऱ्हेनियस सिद्धांत

स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांटे अऱ्हेनियस (Svante Arrhenius) यांनी १८८७ मध्ये रासायनिक पदार्थांच्या वर्गीकरणासाठी या सिद्धांताची मांडणी केली. रसायनांच्या अम्ल आणि अल्कली ...
अल्कलॉइडे (Alkaloides)

अल्कलॉइडे

सजीवांनी (वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी) आपल्या विविध शारीरिक भागात निर्मिलेल्या नायट्रोजनयुक्त (Nitrogen containing) पदार्थांना अल्कलॉइडे असे संबोधिले जाते. याची सर्वसमावेशक ...
अवक्षेपण, रासायनिक (Chemical Precipitation)

अवक्षेपण, रासायनिक

अवक्षेपण विक्रिया जलीय विद्रावकातील धन आणि ऋण आयनांच्या संयोगामुळे अविद्राव्य आयनिक घन पदार्थ तयार होण्याच्या रासायनिक ‍विक्रियेला अवक्षेपण म्हणतात. यामध्ये ...
आइन्स्टाइनियम (Einsteinium)

आइन्स्टाइनियम

आइन्स्टाइनियम मूलद्रव्य आइन्स्टाइनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील ॲक्टिनाइड श्रेणीतील मानवनिर्मित/संश्लेषित धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Es अशी ...
आधुनिक आवर्त सारणी (Modern Periodic table)

आधुनिक आवर्त सारणी

मेंडेलेव्ह यांनी जेंव्हा मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली तेंव्हा रसायनशास्त्रज्ञांना अणूच्या अंतर्गत रचनेची काहीच माहिती नव्हती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मूलद्रव्याचा ...
आयन (Ion)

आयन

अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन हे धन विद्युत भारित तर अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण विद्युत भारित असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन ...
आवर्त सारणी : पायाभूत सिध्दांत (Periodic table : Basic theories)

आवर्त सारणी : पायाभूत सिध्दांत

सतराव्या शतकात निसर्गातील काही मोजकीच मूलद्रव्ये माहित होती. नवनव्या शोधांमुळे मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली व एकेका मूलद्रव्याचा स्वतंत्र अभ्यास करणे ...
आवर्त सारणी : मेंडलेव्हचे कार्य (Periodic table : Mendeleeve's work)

आवर्त सारणी : मेंडलेव्हचे कार्य

मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याचे मुख्य श्रेय रशियन रसायनशास्त्रज्ञ दमित्री इव्हानव्ह्यिच मेंडलेव्ह यांना जाते. रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्त सारणीच्या प्राथमिक विकासात त्यांचे ...