हा हा भिंत

लंडन येथील हा हा भिंत

यूरोपमधील अठरावे शतक रेनेसाँचा [प्रबोधनकाळाचा] उत्तरार्ध काळ होय. यात विविध कला, वास्तुकला, भूदृष्य या क्षेत्रांमध्ये प्रयोग झाले. इंग्लंडमध्ये भूदृष्य कलेनी वेगळी वाट अवलंबली. सममितीवर आधारित वा  भौमितिक आराखड्याच्या बागांपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या बागा येथे आकारास आल्या. नैसर्गिक भासाव्या अशा भूमिती व सममितीला छेद देणाऱ्या बागा निर्माण झाल्या.

पशू वा गुरांना मज्जाव करणारी हा हा भिंत

विस्तीर्ण पसरलेल्या शेतजमिनी, सभोवतालचा निसर्ग यांचा अखंड देखावा दिसावा यासाठी त्यावेळच्या भूदृष्यकारांनी नाविन्यपूर्ण क्लुप्ती योजिली. दोन मिळकतींमधील भिंत दिसू नये व विस्तीर्ण अखंड परिसराचा आभास निर्माण व्हावा यासाठी चर खणून त्यात भिंत बांधली जायची. या भिंतीला

हा हा भिंत म्हटले जायचे. चर व भिंतीमुळे मिळकतीची सीमा रेखित व्हायची, तसेच इकडून तिकडे जायला पशू वा गुरांना मज्जाव व्हायचा.

 

 

समीक्षक : श्रीपाद भालेराव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.