(प्रस्तावना) पालकसंस्था : रचना संसद, मुंबई | विषयपालक : बाळ फोंडके | समन्वयक : श्रीपाद एकनाथ भालेराव | विद्याव्यासंगी : स्नेहा दि. खोब्रागडे
वास्तूकला/वास्तूविज्ञान हे इमारत बांधणीमध्ये असणा-या कलात्मक संरचना आणि तंत्र व त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे शास्त्र आहे.
वास्तुकलेच्या व्यावसायिकांना व्यावहारिक आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून, उपयोगिता व सौंदर्य या दोनही बाजूंचा विचार करून संरचना करण्या साठी नेमले जाते. जरी ह्या दोन्ही बाजू भिन्न असल्या तरी त्याना वेगळे करता येत नाही आणि यांचे प्रमाण हे अनेकदा भिन्न भिन्न असू शकते. कारण प्रत्येक समाजाचे (अति प्रगत प्रगत वा कमी प्रगत , स्थिर वा भटका ) त्याच्या सभोवताली निसर्गाशी आणि इतर समाजाघटकांशी एक विशिष्ट नाते असते. त्यामुळे तो समाज ज्या इमारत रचना करतो त्यात त्यांचे पर्यावरण (हवामान आणि वातावरण) इतिहास , कलात्मक संवेदनशीलता आणि इतर अनेक दैनंदिन घटक यांचा प्रभाव जाणवतो.
वास्तूकलेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या इमारतींमध्ये इतर मानवनिर्मित इमारातींपेक्षा खाली वेगळे पण आढळते.
१. मानवाच्या सामान्य कामासाठी वापराची उपयोगिता तसेच मानवाच्या एखाद्या विशिष्टकामासाठी
समावेषक शक्यता. 
२. रचनेच्या बांधकामाची सुस्थीराता आणि टीकाऊपणा
३. संकल्पना आणि अनुभूती च्या माध्यमातून साकारणारी अभिव्यक्ती
वरील तीनही मुद्यांची वास्तूकलेमध्ये पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यांतील दुसरा मुद्दा पूर्णपणे असावा लागतो पहिला आणि तिसरा मुद्दा हे त्या इमारतीच्या सामाजिक गरजेनुसार तैलानिकरीत्या बदलू शकतात. जर वापर उपयोगाप्रधान असेल जसे कारखाना, तर अभिव्यक्ती दुय्यम स्थानी जाऊ शकते. जर कार्य प्रामुख्याने दार्शनिक असेल, उदा. महत्वाचे मोठे स्मारक, तर उपयोगिता कमी महत्वाची होते. मंदीर , चर्च, मध्यवर्ती सभागृह अशा काही इमारातेंमध्ये उपयोगिता आणि अभिव्यक्ती सारखेच महत्वाचे असू शकतात. या विषयाअंतर्गत वास्तूकला, वास्तूविज्ञान त्यांचे विविध प्रकारचे वर्गीकरण, इतिहास आणि त्यासंदर्भात माहिती अशी या विषयाची व्याप्ती आहे.
अक्रॉपलिस, अथेन्सचे (Acropolis of Athens)

अक्रॉपलिस, अथेन्सचे (Acropolis of Athens)

अभिजात ग्रीक वास्तुशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना. इ.स.पू. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्सच्या खडकाळ टेकडीवर वास्तुतज्ञ आणि शिल्पकारांनी बनवलेले स्मारक म्हणजेच आजचे ‘अक्रॉपलिस’ ...
अंतर्गत सजावट (Interior Decoration)

अंतर्गत सजावट (Interior Decoration)

अंतर्गत सजावटीमध्ये मानव निर्मित किंवा निसर्गतः आढळणाऱ्या सभोवतालच्या जागेचे नियोजन व सजावट यांचा समावेश होतो. याचा अधिक संबंध वास्तूकला व ...
इस्लामी वास्तुकलेतील भौमितिक रचना (Geometric Patterns Of Islamic Architecture)

इस्लामी वास्तुकलेतील भौमितिक रचना (Geometric Patterns Of Islamic Architecture)

इस्लामी वास्तुकलेतील फरसबंदी, भित्तिपटले, जाळ्या ह्यांमध्ये मुख्यत: भौमितिक आकारांचा वापर असतो. इस्लामी वास्तुकलेमध्ये मनुष्याकृती, पशुपक्षी यांच्या प्रतिमा, किंवा प्रतिकात्मक चिन्हे ...
कोकणातील घर (House of Kokan region)

कोकणातील घर (House of Kokan region)

कोकण म्हणजे महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी. पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला सह्याद्री पर्वत रांगा ह्यांच्यामध्ये असलेला चिंचोळा भूभाग. ह्या भूप्रदेशाची सरासरी ...
चादर (Bedspread)

चादर (Bedspread)

मुगल शैलीच्या बागांमध्ये पाण्याला खूप महत्त्व असायचे. चारबाग या संकल्पनेवर आधारित या बागांमध्ये पाण्याच्या वापरामध्ये वैविध्य दिसून येते. उदा., कारंजी, ...
नगर नियोजन आणि नगर रचना ( Urban Planning )

नगर नियोजन आणि नगर रचना ( Urban Planning )

शहरातील जागेच्या वापराचे नियमन आणि सुयोग्य आरेखन हे नगर नियोजन आणि नगर रचना (Town Planning) यांमध्ये समाविष्ट होते. एखाद्या शहराला ...
पद्मनाभपूरम राजवाडा  (Padmanabhapuram Palace)

पद्मनाभपूरम राजवाडा (Padmanabhapuram Palace)

पद्मनाभ पूरम राजवाडा : समोरील बाजू १६ व्या शतकात  ‘पद्मनाभपूरम’ म्हणजे त्रावणकोर संस्थानाची राजधानी होती. तेथील राजांचे निवासस्थान म्हणून केरळी ...
पद्मनाभस्वामी मंदिर (Padmanabhaswamy Temple)

पद्मनाभस्वामी मंदिर (Padmanabhaswamy Temple)

भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम् शहरातील पुरातन वास्तुकलेचा वारसा असणाऱ्या ‘ईस्ट फोर्ट’ भागात असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर’ म्हणजे या शहराची ओळख! ...
फरसबंदी (Tiling)

फरसबंदी (Tiling)

फरश्या किंवा लाद्या यांचे एक प्रतलीय एकसंध आच्छादन. यामध्ये कुठेही मोकळी जागा नसते किंवा कुठेही एक लादी दुसऱ्या लादीवर बसलेली ...
बंगले (Bungalows)

बंगले (Bungalows)

बंगला हा वास्तुप्रकार भारताच्या निवासस्थानातला महत्त्वाचा वास्तुप्रकार. सध्याच्या काळात बंगला म्हणजे जमिनीवर बांधलेले स्वतंत्र घर या रूढार्थाने घेतला जातो. इंग्रजी ...
भारतातील ब्रिटिशकालीन बंगले (British Bungalows in India)

भारतातील ब्रिटिशकालीन बंगले (British Bungalows in India)

मैदानी भागात ब्रिटिश शैलीचा प्रभाव प्रथम नागरी भागात जिथे पारंपरिक शैलीची घरे होती तिथे दिसून आला. भारतीय लोक यूरोपियन जीवनशैलीच ...
भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले (Indian Art Deco and Modern Bungalows)

भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले (Indian Art Deco and Modern Bungalows)

जगभरात इतर वसाहतींच्या राज्यात ज्याप्रमाणे पाश्चात्य वास्तुकलेचा तसंच प्रादेशिक आणि देशीय वास्तुकलेचा परिणाम झाला तसाच तो भारतीय बंगल्याच्या वास्तुकलेवरही झाला ...
रायऑन-जी (Ryōan-Ji)

रायऑन-जी (Ryōan-Ji)

अभिजात वास्तुशैलीतील जपानमधील झेन मंदिर. रायऑन-जी हे जपानमधील क्योटो शहराच्या वायव्येस आहे. इ.स. १५००च्या सुमारास मुरोमाची कालखंडात (१३३६-१५७३) होसोकावा कात्सुमोटो ...
रुग्णालयाचा वास्तू आराखडा (Architecture of Hospital)

रुग्णालयाचा वास्तू आराखडा (Architecture of Hospital)

रुग्णालयाचा वास्तू आराखडा करणाऱ्या वास्तू शास्त्रज्ञास आधुनिक वैद्यक शास्त्राची अद्ययावत माहिती असावी लागते. रुग्णालय स्थापनेचा हेतू व आवाका सर्वात आधी ...
व्हर्सायचा बगिचा (Versailles of Garden)

व्हर्सायचा बगिचा (Versailles of Garden)

व्हर्सायचा बगिचा हा उत्तर-मध्य फ्रान्स देशाच्या व्हसार्य या शहरात असून पॅरिस शहराच्या १६ किमी. अंतरावर पश्चिम-दक्षिणपश्चिम येथे आहे. व्हर्सायच्या राजमहालाच्या ...
शालिमार बाग (Shalimar Bagh)

शालिमार बाग (Shalimar Bagh)

भारतातील जम्मू काश्मीर राज्यात दल सरोवराच्या ईशान्य दिशेला स्थित असलेली ही बाग मुघल शैलीतील भूदृश्य कलेचा नमुना आहे. सहाव्या शतकाच्या ...
हिरवी भिंत (Green Wall)

हिरवी भिंत (Green Wall)

वनस्पतीने पूर्णत: किंवा अंशत: आच्छादलेली भिंत. या भिंतींवरील वनस्पतींच्या वाढीकरिता माती, पाणी किंवा इतर आधार द्रव्यांचा वाढ-माध्यम म्हणून वापर करतात ...
Close Menu
Skip to content