आहाँ, युहानी : (११ सप्टेंबर १८६१ – ८ ऑगस्ट १९२१). एक फिनीश लेखक आणि पत्रकार. मूळ नाव युहानी ब्रुफेल्ड. कादंबरीकार आणि लघुकथा लेखक म्हणून ते ओळखले जात. त्यांनी वास्तववादी विचारधारा आपल्या लेखनातून मांडली. काळानुसार वेगवेगळ्या शैलींचा पाठपुरावा केला. तब्बल बारा वेळा साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे नामांकन झाले होते. त्यांचे पालक थेओडोर आणि एम्मा (नि स्नेलमॅन) ब्रॉफेल्ट होते. थियोडोर सुप्रसिद्ध पुनरुज्जीवनवादी उपदेशक होते. ज्यांचे उपदेशात्मक लेखन १९१७ मध्ये रोवस्ती एच.जी.थीम म्हणून प्रकाशित झाले होते. ब्रोफेल्टिन सारनोजा त्यांचे वडील एक धर्मगुरू होते.
१८८० च्या दशकात त्यांनी हेलसिंकी विद्यापीठात शिक्षण घेतले. राजकीय विचारधारेशी ते संबंधित होते. त्यांच्या साहित्यिक प्रयत्नांना एलिझाबेथ जर्नेफेल्ट आणि तिचे मंडळ जर्नेल्फेल स्कूल याची खूप मदत झाली. जे फिनीश यथार्थवादाचे प्रणेते होते. त्यांनी वास्तववादी लेखनाला सुरवात केली. फ्रेंच भाषा व साहित्याच्या अभ्यासातून त्यांनी आपली लेखनशैली घडवली. दोदे व आणि मोपासां हे त्यांचे वाड्मयीन आदर्श होते. त्यांची पहिली कादंबरी Rautatie (१८८४) मध्ये प्रसिद्ध झाली. Papin tytar (१८८५) ही त्यांची महत्त्वाची कादंबरी होय. १८९० मध्ये प्रसिद्ध झालेली Yksin ही कादंबरी विवादास्पद ठरली. अयोनो जर्नेफेल्टच्या उत्कट प्रेमाची ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. जिने त्यावेळी जीन सिबेलियसशी गुप्तपणे लग्न केले होते. Juha (१९९१), Kevat ja takatalvi (१९०६) ह्या त्यांच्या आणखी काही कादंबऱ्या होत.
आहाँ यांनी कादंबर्याबरोबरच विशिष्ट शैलीतील बर्याच लघुकथा लिहिल्या. ज्याला ‘स्प्लिंटर्स’ (फिनिशमधील लास्टूजा) म्हणतात. त्यांचा Lastuja (१८९१ ते १९२१) हा अष्टखंडात्मक लघुकथासंग्रह विशेष उल्लेखनीय ठरला. त्यांच्या काही कथांचे स्वीडीश व फ्रेंच भाषेत अनुवाद झाले. त्यांचे विषय राजकीय कल्पनेपासून ते रोजच्या जीवनातील चित्रणांपर्यंत भिन्न भिन्न प्रकारचे होते. लघुकथांपैकी पहिली आणि सर्वात प्रसिद्ध कथा ‘सीहेन एकान कुन ईएस लॅम्पून ऑस्टी’ ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांवर नवनिर्मितीचा परिणाम दर्शविते. आजकाल हे शीर्षक एक फिनीश म्हण म्हणून प्रसिद्ध आहे.
१८९० च्या दशकात आहॅा रोमँटिक राष्ट्रवादाकडे आकर्षित झाले. १८९७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या Panu या कादंबरीने १७ व्या शतकातील फिनलँड मधील मूर्तिपूजक आणि ख्रिश्चन धर्मातील संघर्ष मांडला आहे. १९११ मध्ये प्रसिद्ध झालेली Juha ही कादंबरी म्हणजे करेलियन जंगलात एका अपंग मुलीच्या दुःखी विवाहाची कहाणी आहे. आहाँच्या लघुकथा Lastuja (१८९१ -१९२१) या काळात प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यात शेतकरी जीवन, मासेमारी आणि फिनलंडमधील वन्यजीवनांशी संबंधित जीवनानुभव आलेला आहे. फिनीश गद्यलेखनाच्या विकासात आहाँ यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
संदर्भ :
- www.Britannica.com
- www.Britannica.com/ caritra/ Juhani Aho