ऑरगॉन, लुईस : (३ आक्टोबर १८९७ – २४ डिसेंबर १९८२). फ्रेंच कवी, कादंबरीकार, लघुकथाकार आणि निबंधकार. त्यांंचे मूळ नाव लुईस ऍंड्रीक्स असे होते. ते राजकीय कार्यकर्ते व साम्यवादाचे प्रवक्ते होते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची भेट अतिरेकीवादी चळवळीतील आंद्रे ब्रेटन आणि फिलीप सूपॉल्ट या अतियथार्थवादी व्यक्तींशी झाली. त्यांच्याकडे ते आकर्षित झाले आणि त्यांच्या कला-साहित्य संप्रदायाचे संस्थापक सदस्य झाले. साहित्यक्षेत्रातील वेगळेपण त्यांना अपुरे वाटले व ते फ्रांसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनले. सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होऊन काम केले.
१९३३-३९ या काळात कम्युन या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. यात अनेक फ्रेंच विद्वानांचा सहभाग होता. १९५३ ते १९७२ या काळात Ce Soir या दैनिकाच्या साहित्यिक पुरवणीत Les Letters Francaises हे स्तंभलेखन केले. ते खूप लोकप्रिय झाले. १९३७ ते १९५३ या काळात Ce Soir या सायन्स दैनिकाचे ते संचालक होते.
लुईस ऑरगॉन यांची साहित्य संपदा : कवितासंग्रह – La Rose et le réséda, Feu de joie (१९१९), Le Mouvement perpétuel (१९२६), La Grande Gaîté (१९२९), Persécuté persécuteur (१९३०-३१), Hourra l’Oural (१९३४), Le Crève-Cœur (१९४१), Cantique à Elsa(१९४२), Les Yeux d’Elsa(१९४२), Brocéliande (१९४२), कांदबरी- लघुकांदबरी – Anicet ou le Panorama, roman (१९२१), Les Aventures de Télémaque (१९२२), Le Libertinage (१९२४), Le Paysan de Paris (१९२६), Les Cloches de Bâle (१९३४), Les Beaux Quartiers (१९३६), Les Voyageurs de l’Impériale (१९४२), Aurélien (१९४४), La Semaine Sainte (१९५८), Le Fou d’Elsa (१९६३), La Mise à mort (१९६५), Blanche ou l’oubli (१९६७), Henri Matisse, roman (१९७१), Théâtre/Roman (१९७४), Le Mentir-vrai (१९८०), La Défense de l’infini (१९८६) इत्यादी.
लुईस ऑरगॉ फ्रान्समधील एक लोकप्रिय कवी आहेत. त्यांच्या Feu de joie (१९२० ) व Le Mouvement perpétuel (१९२५) या दोन काव्यसंग्रहात अतिवास्तववादाच्या कलातत्वे दिसतात. Les Yeuxa Elsa (१९४२ ) या संग्रहातील कवितांच्या मागे देशभक्ती व प्रीती यांची प्रेरणा आहे. त्यांनी जुन्या कवनांच्या धर्तीवर नव्या काव्यरचना केल्या. शिवाय रॅबोच्या शब्द किमयेचे त्याला विशेष आकर्षण होते. त्यांंच्या बऱ्याच कविता संगीतावर आधारित आहेत आणि विविध गायकांनी गायल्या आहेत. त्यांंच्या अनेक कवितांचे, गाण्याचे जर्मन भाषेत भाषांतर झाले आहे.
paysen de Paris ( 1926 ) या कादंबरीत अतिवास्तववादी कला तत्वांचा प्रभाव दिसून येतो. यात पॅरिस शहराच्या परिचित रूपापलीकडील अनोख्या रम्य व अद्भूत रूपाचे दर्शन घडविले आहे. ले मॉन्डेरॉयल या चार खंडाच्या कादंबरीत सामाजिक क्रांतीच्या दिशेने सर्व वर्गाच्या संघर्षाचे ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांनी वर्णन केले आहे. Les Cloches de Bale (१९३४ ) व Les Beaux Quartiers (१९३६) या कादंबऱ्यांतून आरॉगॉने नीतिभ्रष्ट ,कोत्या मनोवृत्तीच्या समाजाचे दर्शन घडवले आहे. या कादंबऱ्यावर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही त्यांचे साहित्य कार्य चालू होते. काही काळ ते भूमिगतही होते. Les voyageurs del imperiale (१९४३ ) व Aurelien (१९४४ ) या आत्मनिवेदन पर कादंबऱ्या आहेत. Les Communistes या ग्रंथाचे सहा खंड प्रसिद्ध झाले. या खंडातून आरॉगॉने समाजवादी वास्तव वादाचे महत्त्व सांगितले. कादंबरी लेखनात त्यांनी त्या काळातले नवीन तंत्र वापरलेे.
संदर्भ :
- Encyclopedia Britannica