धवन, सतीश देवी दयाल : (२५ सप्टेंबर १९२० — ३ जानेवारी २००२). भारतीय अवकाश अभियंता आणि अवकाश शास्त्रज्ञ. त्यांना भारतातील प्रायोगिक द्रव गतिकी संशोधन शाखेचे जनक (‘एक्सपेरिमेंटल फ्लुईड डायनॅमिक्स रिसर्च’) म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतातील पहिले स्वनातील वात सुरंग (सुपरसॉनिक विंड टनेल) या उपकरणाची भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस्सी; IISc), बंगलोर येथे स्थापना केली. तसेच त्यांनी भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांमध्ये रूपांतरित केले

धवन यांचा जन्म श्रीनगर येथे झाला. त्यांचे वडील भारतीय नागरी सेवेत उच्च पदाधिकारी असताना फाळणी दरम्यान पुनर्वसन आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले. धवन यांनी श्रीनगर येथूनच शालेय शिक्षण पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (मॅथेमॅटिक्स अँड फिजिक्स; १९३८), एम.ए. (इंग्लिश लिटरेचर; १९४१) आणि बी.ई. (मेकॅनिकल इंजिनियरिंग; १९४५) पदवी प्राप्त केल्यात. त्यानंतर त्यांनी बंगळुरु येथे स्थित भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान उत्पादक कंपनीत वर्षभर अंतर्वासित म्हणून काम केले (१९४४-४५). युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथून त्यांनी वैमानिक अभियांत्रिकी या शाखेत एम.एस. केले (१९४७). त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथून वैमानिक अभियंता ही पदवी मिळवली (१९४९). तसेच त्यांनी वैमानिक अभियांत्रिकी आणि गणित हे विषय निवडून पीएच.डी. पदवी संपादन केली (१९५१). त्यानंतर ते भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झालेत. तेथेच ते प्राध्यापक व विभाग प्रमुखही झालेत (१९५५) आणि १९६२ मध्ये संचालक नियुक्त झाल्यावर साधारणत: दोन दशके कार्यरत राहिलेत. याच काळात ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन; इस्रो) येथे संचालक म्हणूनही कार्यरत होते. डॉ. विक्रम साराभाई नंतर त्यांची तेथेच अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली (१९७२). त्यांनी ‘इंडियन स्पेस प्रोग्राम’ ची धुरा अध्यक्ष म्हणून सांभाळली. भारत सरकारच्या अंतराळ विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी योगदान दिले.

धवन यांनी इस्रोमध्ये भारताचा पहिला उपग्रह (आर्यभट्ट; १९७५) आणि देशातील पहिले प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन [एसएलव्ही-३ (SLV-3); १९८०] विकसित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोने भारतीय राष्ट्रीय उपग्रह दूरस%


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.