(प्रस्तावना) पालकसंस्था : मराठी विज्ञान परिषद, मुंबई | समन्वयक : अ. पां. देशपांडे | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

 ‘ला काँझ’(‘LaCONES’), हैदराबाद (Laboratory for the Conservation of Endangered Species, Hydarabad)

 ‘ला काँझ’(‘LaCONES’), हैदराबाद (Laboratory for the Conservation of Endangered Species, Hydarabad)

 ‘ला काँझ’(‘LaCONES’)ची हैदराबाद येथील वैशिष्ट्यपूर्ण इमारत  ला काँझ’(LaCONES), हैदराबाद : (स्थापना – २००७) हैदराबादमधील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी’ ...
 चित्रे, शशिकुमार मधुसूदन (Chitre, Shashikumar Madhusudan)

 चित्रे, शशिकुमार मधुसूदन (Chitre, Shashikumar Madhusudan)

चित्रे, शशिकुमार मधुसूदन : ( ७ मे १९३६ ) शशिकुमार मधुसूदन चित्रे हे भारतात जन्मलेले गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. चित्रे यांनी ...
 जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण ) (Joshi, R. N. – Ramachandra Narayan)

 जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण ) (Joshi, R. N. – Ramachandra Narayan)

 जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण) : (१३ एप्रिल, १९३७ –  ) रामचंद्र नारायण जोशी यांचा जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला ...
 थॉमसन, जॉर्ज पॅजेट (Thomson,  George Paget )

 थॉमसन, जॉर्ज पॅजेट (Thomson,  George Paget )

थॉमसन, जॉर्ज पॅजेट : ( ३ मे १८९२ – १० सप्टेंबर १९७५ ) ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पॅजेट टॉमसन ह्यांनी इलेक्ट्रॉनमध्ये ...
 निकोलस, आर्थस मॉरीस (Nicolas Maurice Arthus)

 निकोलस, आर्थस मॉरीस (Nicolas Maurice Arthus)

 निकोलस, आर्थस मॉरीस : ( ९ जानेवारी, १८६२  –  २४ फेब्रुवारी, १९४५ ) निकोलस मॉरीस आर्थस यांचा जन्म फ्रान्समधील अँजर्स (Angers) ...
 फारक्वार ग्रॅहॅम (Farquhar, Graham )

 फारक्वार ग्रॅहॅम (Farquhar, Graham )

 फारक्वार ग्रॅहॅम : (८ डिसेंबर १९४७ ) फारक्वार ग्रॅहॅम यांचा जन्म ऑस्ट्रेलियामधील टांझानिया प्रांतातील होबार्ट येथे झाला. हे वनस्पती व ...
 ब्रॅग, लॉरेन्स विल्यम (Bragg, Lawrence William)

 ब्रॅग, लॉरेन्स विल्यम (Bragg, Lawrence William)

  ब्रॅग, लॉरेन्स विल्यम :  (३१ मार्च १८९० ते १ जुलै १९७१) लॉरेन्स विल्यम ब्रॅग ह्यांचा जन्म दक्षिण ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड ...
अग्रवाल, मधुलिका शशिभूषण (Agrawal, Madhoolika Shashibhushan)

अग्रवाल, मधुलिका शशिभूषण (Agrawal, Madhoolika Shashibhushan)

अग्रवाल, मधुलिका शशिभूषण : ( १ मे १९५८ )  मधुलिका अग्रवाल यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले. पीएच्.डी. साठी त्यांनी ...
अँडर्स योनास अँगस्ट्रॉम (Andres Jonas Angstorm)

अँडर्स योनास अँगस्ट्रॉम (Andres Jonas Angstorm)

अँगस्ट्रॉम, अँडर्स योनास :  (१३ ऑगस्ट १८१४ – १८ जून १८७४) स्वीडन मधील मेडलपॅड येथे अँडर्स यांचा जन्म झाला. हार्नोसंड ...
अँड्र्यू गेलमन (Andrew Gelman)

अँड्र्यू गेलमन (Andrew Gelman)

गेलमन, अँड्र्यू : (११ फेब्रुवारी, १९६५ – ) अँड्र्यू गेलमन यांचा जन्म अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील फिलाडेल्फिया या शहरी झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे ...
अदिती मुखर्जी (Aditi Mukherji)

अदिती मुखर्जी (Aditi Mukherji)

मुखर्जी, अदिती : (१२ नोव्हेंबर १९७६). अदिती मुखर्जी यांचा जन्म कोलकता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली तर  उच्च ...
अनिल कुमार भट्टाचार्य (Anil Kumar Bhattacharya)

अनिल कुमार भट्टाचार्य (Anil Kumar Bhattacharya)

भट्टाचार्य, अनिल कुमार : ( १ एप्रिल १९१५ – १७ जुलै १९९६ ) अनिल कुमार भट्टाचार्य यांचा जन्म पश्चिम बंगालच्या, ...
अनुया निसळ (Anuya Nisal)

अनुया निसळ (Anuya Nisal)

निसळ, अनुया( १९ ऑक्टोबर १९७८) अनुया निसळ यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअर येथून मटेरिअल सायन्स अँड ...
अब्राहम चार्नेस (Abraham Charnes)

अब्राहम चार्नेस (Abraham Charnes)

चार्नेस,अब्राहम  (४ सप्टेंबर १९१७ — १९ डिसेंबर १९९२) अमेरिकन गणितज्ञ आणि संक्रियात्मक अन्वेषणतज्ञ. चार्नेस यांनी बहिर्वक्री बहुपृष्ठकाचे चरम बिंदू आणि एकघाती ...
अब्राहम वॉल्ड (Abraham Wald)

अब्राहम वॉल्ड (Abraham Wald)

वॉल्ड, अब्राहम : (३१ ऑक्टोबर १९०२ – १३ डिसेंबर १९५०). हंगेरियन गणितज्ज्ञ. त्यांनी गणित-संख्याशास्त्र या विषयातील निर्णायक सिद्धांत (Decision Theory), ...
अभय बंग (Abhay Bang)

अभय बंग (Abhay Bang)

बंग, अभय : ( २३ सप्टेंबर १९५० – ) अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात ...
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ( American Institute of Mathematics - AIM)

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ( American Institute of Mathematics – AIM)

संस्था स्थापना : १९९४    गणितातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी संस्था. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स (एआयएम) या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये झाली ...
अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (ए.पी.आय.) (American Petroleum Institute-API)

अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (ए.पी.आय.) (American Petroleum Institute-API)

अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट  (ए.पी.आय.) : ( स्थापना २० मार्च १९१९, न्यूयॉर्क ) ए.पी.आय. ही तेल आणि नैसर्गिक वायू व्यवसायाशी निगडीत ...
अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी ( American Mathematical Society - AMS)

अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी ( American Mathematical Society – AMS)

(स्थापना : १८८८ )  अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (एएमएस) ही अमेरिकेतील गणितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपैकी अव्वल दर्जाची आणि महत्त्वाची एक संस्था आहे ...
अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (American Society for Testing and Materials, International)

अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (American Society for Testing and Materials, International)

अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (स्थापना:  १८९८)   अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स, इंटरनॅशनल ...