अथर्वन ऋषी : एक वैदिक ऋषी. त्यांच्या वंशात उत्पन्न झालेला ऋषिसमुदायही अथर्वन याच नावाने ओळखला जातो. अथर्वन ऋषी यांना अथर्वा या नावानेही ओळखले जाते. अथर्वन या शब्दाचा अर्थ ‘अग्नी आणि सोम यांना पूजणारा’ असा होतो. असे म्हटले जाते की, अथर्वन ऋषी यांना बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांच्या नावावरून चार वेदांपैकी ‘अथर्ववेद’ या एका वेदास त्यांचे नाव देण्यात आले. काही अभ्यासकांच्या मते, अथर्वन व अंगिरस या ऋषींनी ‘अथर्ववेद’ रचला असून, उपचार, आरोग्य, समृद्धी आणि इतर व्यावहारिक विषयांशी संबंधित मंत्रांचा संग्रह त्यात आहे.

पारंपरिक चित्र

त्यांचा विवाह प्रजापती कर्दम यांची कन्या शांती हिच्याशी झाला. त्यांचे दधीची ऋषी हे पुत्र होत. अथर्वन हे भृगू कुळातील सदस्य असल्याचे म्हटले जाते. त्यांनी प्रथम अग्नि-यज्ञ किंवा यज्ञ स्थापित केला, असे म्हटले जाते. त्यांनी यज्ञाची प्रथा सुरू केली. त्यामुळे त्यांना यज्ञ (अग्निबलि) सुरू करणारे म्हणून पहिले श्रेय दिले जाते. कधीकधी त्यांची गणना सप्तर्षींमध्येही केली जाते. ‘मुंडकोपनिषद’ आणि इतर काही ग्रंथांनुसार ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते, तर काही ग्रंथांनुसार ते ब्रह्मदेवाच्या मनातून जन्मलेले सर्वांत ज्येष्ठ पुत्र होते.

संदर्भ :

  • Boyce, Mary, Atharvan : Encyclopædia Iranica, New York, 2002.
  • Lubotsky, A. The Indo-Iranian Substratum, Helsinki, 2001.
  • Witzel, Michael, Linguistic Evidence for Cultural Exchange in Prehistoric Western Central Asia, Philadelphia, 2003.

समीक्षक : आनंद गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply