वनस्पतीने पूर्णत: किंवा अंशत: आच्छादलेली भिंत. या भिंतींवरील वनस्पतींच्या वाढीकरिता माती, पाणी किंवा इतर आधार द्रव्यांचा वाढ-माध्यम म्हणून वापर करतात. हिरव्या भिंतीत एकीकृत जल वितरण प्रणाली असते, ज्याद्वारे वनस्पतींना सातत्याने पाण्याचा पुरवठा केला जातो. हिरव्या भिंतीला जिवंत भिंत (Living wall) किंवा उभी बाग (Vertical Garden) म्हणूनही ओळखले जाते. इमारतीच्या आतील भागातील तापमान एकसंध ठेवण्यासाठी या भिंतींचा वापर तापमान निरोधनासारखा (Insulation) करण्यात येतो.

हिरव्या भिंती आणि उभ्या पद्धतीने तयार करण्यात आलेली हिरवाई (Green facade) या वास्तुकलेतील दोन वेगवेगळ्या शैली आहेत. हिरव्या भिंतींत वनस्पतींची वाढ ही भिंतींवरच होते, तर दुसऱ्या प्रकारांत वनस्पती, झाडे या जमिनीत वाढवून त्यांना जाळीचा आधार देवून उभ्या दिशेने चढाई केली जाते. या प्रकारच्या वनस्पतींच्या वाढीस बराच वेळ लागू शकतो कारण ती पूर्णत: निसर्गावर अवलंबून असते, तर हिरव्या भिंती या वाढ-माध्यमांच्या आधाराने भिंतीच्या पृष्ठभागावर वाढतात.

हिरव्या भिंती घरात किंवा बाह्य भागात असू शकतात. त्या विद्यमान भिंतीशी निगडित किंवा जोडता येऊ शकतात आणि विविध  आकारात  येतात.इलिनॉय विद्यापीठातील भूदृष्य वास्तुकलेचे प्राध्यापक स्टॅनली हार्ट व्हाइट (१९२२-५९) यांनी व्हेजिटेशन-बिअरिंग आर्किटेक्टॉनिक स्ट्रक्चर ॲण्ड  सिस्टम (Vegetation-Bearing Architectonic Structure and System) यावर एकस्व मिळविले (१९३८). तरीही त्यांचे शोध इलिनॉयमधील अर्बानामधील त्यांच्या घरामध्ये आदीरूपाच्या (प्रोटोटाइप; Prototype) पलीकडे प्रगती करून शकले नव्हते.

परंतु १९८६ साली, पॅट्रिक ब्लॅंक यांनी वास्तुविशारद ॲड्रियन फेंसिलबर आणि अभियंता पीटर राइस यांच्याबरोबर पॅरिसमधील सिटी  ऑफ सायन्स ॲण्ड इंडस्ट्री येथे घरातील मोठ्या हिरव्या भिंतींची प्रथमत: यशस्वी रीत्या अंमलबजावणी केली. तर २००५ मध्ये त्यांनी वास्तुविशारद जीन नॉवेल यांच्यासमवेत क्यू ब्रान्ली म्यूझीयम यासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाह्य भिंतीवर वनस्पतीचे आच्छादन तयार केले.

हिरवी भिंत या संकल्पनेने काही काळा नंतर एकदम जलद गतीने लोकप्रियतेचे शिखर गाठले. greenroof.comद्वारा प्रदान करण्यात आलेल्या ऑनलाइन डेटाबेसमध्ये सूचीबद्ध केलेल्या एकूण ६१ मोठ्या-आकारातील हिरव्या भिंतींपैकी, ८०% २००९ मध्ये किंवा नंतर तयार केली गेली आणि २००७ मध्ये किंवा २००७ नंतर ९३% होती. जगभरातील अनेक खाजगी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे जसे विमानतळ येथे हिरव्या भिंती बांधण्यात आलेल्या आहेत.

हिरवी भिंत : चांग्यी विमानतळ टर्मिनल ४, सिंगापूर.

२०१५ साला पर्यंत, सर्वांत मोठी हिरवी भिंत २,७०० चौरस मीटर (२९,०६३ चौरस फूट किंवा अर्ध्या एकर-पेक्षा अधिक) एवढी जागा व्यापते. हि भिंत लॉस कॅबॉस इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्थित आहे. मेक्सिकन वास्तुविशारद फर्नांडो रोमेरो यांनी  २०१२ साली जी -२० लॉस कॅबॉस संमेलनासाठी सदर इमारतीचे आरेखन केले होते.

हिरव्या भिंतीचे कार्य (Function of Green wall)

हिरव्या भिंती बहुतेक शहरी वातावरणात आढळतात जिथे वनस्पती इमारतीचे तापमान कमी करण्यास मदत होते. शहरात उष्णता निर्माण होण्याचे प्राथमिक कारण म्हणजे सौरतापन (Insolation). शहरातील रस्ते व इमारतींमधील सौर विकिरणांचे (री-रेडिएशन; Re-radiation) शोषण आणि बांधकाम साहित्यामधे या उष्णतेची साठवण आणि त्यांचे परत विकिरण, तथापि वनस्पतींयुक्त पृष्ठभाग बाष्पोत्सर्जनामुळे (ट्रान्स्पिरेशन; Transpiration) वातावरणाच्या ४-५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढत नसतो परिणामस्वरूप तापमान थंड ठेवण्यास मदत करतो

हिरव्या भिंती पाण्याचा पुनर्वापर करण्याचे साधन असू शकतात. विरघळलेल्या पोषक घटकांचे शोषण करून काही प्रमाणात प्रदुषित पाणी (greywater) शुद्ध करू शकतात. सेंद्रीय घटकांचे खनिज विघटन (mineralise) करून त्यास वनस्पतींना उपलब्ध करण्यासाठी जीवाणूं (Bacteria) मदत करतात .

हिरव्या भिंत विशेषत: शहरांसाठी उपयुक्त आहेत, कारण तेथे मुबलक अनुलंब पृष्ठभाग (vertical surfaces) उपलब्ध असतात आणि कमी जागेचा वापर करूनही अमलात आणता येतात. त्या शुष्क भागात योग्य आहेत, कारण उभ्या भिंतीवरील अभिसरण होणाऱ्या पाण्याचे  बाष्पीभवन जमिनीवरील आडव्या बागेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

हिरव्या भिंती शहरी शेती (urban-agriculture), शहरी बागकाम (urban gardening) करण्यासाठी कार्य करू शकतात. काहीवेळा इमारतीला सौंदर्य-दृष्टी पुन: प्राप्त करून देण्यासाठी हिरव्या भिंती बांधल्या जातात. हिरव्या  भिंती अशुद्ध हवेला शुद्ध करण्याच्या गुणवत्ते/उपायासाठी (आतील किंवा बाहेरील भागामध्ये), बांधण्यात येतात.

वाढ-माध्यमाचे प्रकार (Types of Growth Media)

हिरव्या भिंतींच्या वनस्पतींमध्ये वाढ-माध्यम योग्य आकाराचा असणे आवश्यक आहे. वाढ-माध्यमांची वाढ करून नंतर एखाद्या संरचनेवर त्याला ठेवण्यात येते. (उदा., पिशव्या, भांडी किंवा पेटी), ज्यात एक प्रणाली (सिस्टम; System) तयार होते. हे संयोग विविध प्रकारात येतात आणि त्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते.

सैल माध्यम (Loose media), चटई माध्यम (Mat media), पत्रक आणि (Sheet media), संरचनात्मक माध्यम प्रणाली (स्ट्रक्चरल मीडिया सिस्टम; Structural media system).

सैल माध्यमात वाढ-माध्यमांना कप्पांच्या मांडणीमध्ये (शेल्फ; Shelf) किंवा बॅगमध्ये मातीत ठेवून तयार करण्यात येते आणि त्यानंतर त्यांची भिंतींवर मांडणी करण्यात येते.

चटई माध्यम (mat media), सामान्यतः पातळ काथ्याच्या तंतूंनी बनलेली असते. वनस्पती थेट चटईवर मूळ धरतात.

पत्रक माध्यम हे चटई आकाराचे असतात, परंतु काथ्याच्या- धाग्यापेक्षा अधिक सशक्त अशा  सेमी-ओपन सेल पॉलियुरेथिन (Semi-open cell polyurethane) पत्रकाने बनविलेले असतात.

संरचनात्मक माध्यम प्रणालीमध्ये एक ढाचा तयार करून सैल आणि चटई प्रणाली एकत्र करते जे विविध मापात आणि आकारात बनवता येतात. उदा., हरित-प्रावरण हे सैल माध्यमात लावले जाऊ शकते, जसे की कुंडीत लावून आणि भिंतीवरील जाळींवर कुंडी ठेवून अंगभूत सिंचनासोबत (इर्रीगेशन; Irrigation) लावले जाऊ शकते. अशा पद्धतीची एकात्मिक तावदाने (इंटिग्रेटेड-पॅन्ल्स; Integrated Pannels) बाजारात उपलब्ध आहेत.

हिरव्या भिंती मध्ये कोणत्या वनस्पती वापरू शकतो?

हिरव्या भिंतीच्या प्रमाणावरील आणि उद्देशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वापरता येतात.

हिरव्या भिंती

वृक्ष निवड वेली पासून लहान ते मोठ्या झुडूपापासून अगदी छोट्या झाडांपर्यंत पर्यंत असू शकतात. वनस्पती निवडण्यासाठी प्रथम हिरव्या भिंतीच्या इच्छित परिणामाचा विचार केला पाहिजे. काही वनस्पती सौंदर्याचा आणि भूदृश्य-आराखडा- मूल्ये (लँडस्केप डिझाइन व्हॅल्यूज) विचारात /लक्षात घेऊन, दुष्काळ सहिष्णुता, पाणी शुद्ध करणे, हवा शुद्धीकरण किंवा अधिवास तरतूद (habitat provision) अधिक चांगली असतील इ., बाबी लक्षात घेऊन निवडायची असतात. वनस्पती वाढीचे स्वरूप, सूर्यप्रकाश तसेच हवामान स्थिती /वायू (exposure to wind) हे जमिनीच्या तुलनेत उभ्या पृष्ठभागावर विशेषतः भिन्न आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

प्रजाती निवड देखील परिस्थ‍िती आणि जागेवर अवलंबून असतात. उपलब्ध नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाशाचा स्तर विचारात घेणे आवश्यक आहे.उदा., छाया (शेड; Shade) सहिष्णु प्रजाती सर्वांत कमी प्रकाशाची परिस्थिती दर्शवितात. अत्यंत उघड ठिकाणी, मजबूत प्रजाती सूर्य आणि वारा सहन करू शकतात.

उथळ जातीची, तंतुमय मुळ असलेल्या प्रजाती, वाढीव माध्यमात चांगल्या रीतीने वाढू शकतात.

हिरव्या भिंत प्रणालीच्या ओलावा/आर्द्रता वरून खाली हळूहळू वाढते, म्हणजे पायाजवळ अधिक पाणी असते, त्यामुळे प्रजाती निवडताना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. तसेच जर प्रणालीने पुन्हा पाणी पुनर्चक्रित (recycle) करावयाचे असल्यास प्रजातींच्या निवडीसाठी वाढीव-मीठांचे स्तर आणि पीएचची पातळी यांची काळजी घेणे उपयुक्त ठरते.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Green_wall – Pugh, Thomas A. M.; MacKenzie, A. Robert; Whyatt, J. Duncan; Hewitt, C. Nicholas The effectiveness of green infrastructure for improvement of air quality in urban street canyons. Environmental Science & Technology. 46 (14): 7692–7699. doi:10.1021/es300826w. (2012).
  • https://www.naava.io

समीक्षक‍ – श्रीपाद भालेराव

प्रतिक्रिया व्यक्त करा