सभात्याग : कोणत्याही कायदेमंडळाचे किंवा सभेचे कामकाज चालू असताना सभेस उपस्थित असलेल्या एखादया गटाने किंवा व्यक्तीने तेथे चाललेल्या कामकाजाच्या, पद्धतीच्या, चर्चेच्या किंवा सभापतीने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सभागृह सोडून जाण्याची कृती म्हणजे ‘सभात्याग’ होय. अशा सभात्यागामुळे प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला जात असतो. तसेच फार मोठ्या गटाने सभात्याग करून पुरेशा गणसंख्येएवढे सभासद सभागृहात न उरल्यास सत्तारूढ पक्षास अडचणीत आणता येते. अन्य कोणत्याही मार्गाने आपला निषेध व्यक्त करता आला नाही, तर हा शेवटचा मार्ग अनुसरला जातो.
संदर्भ :
- भारतीय संसदीय नियमावली