द्वारका यात्रा : लोकजीवनातील द्वारका यात्रेचे महत्व व स्वरूप भिन्न आहे. महाराष्ट्रातील साजऱ्या केल्या जाणाऱ्या  द्वारकायात्रा यांच्या पेक्षा ही यात्रा वेगळ्या पद्धतीने होते. यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या  बैलांना नंदीबैल असे म्हटले जाते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या वाकाजी महाराज संस्थांचा नंदीबैल यास मखराने सजवून नंतर त्याला सजविलेल्या बंडीत उभे केले जाते. त्याच्या डोक्यावर सजविलेल्या मखर असतो त्याच्यावर ‘शंकर-पार्वती’ यांची प्रतिमा असते.त्याचामागे गावाच्या परिसरातील सजविलेले इतर नंदीबैल असतात.मिरवणुकीचे मुख्यवैशिट्ये म्हणजे यावेळी बंडीला  बैल न जुंपता ती बंडी माणसाकडून ओढली जाते. ही मिरवणूक संपूर्णगावातून वाजत गाजत फिरवली जाते. यावेळी बंडीतील मनाचा नंदीबैल कोणताही त्रास देत नाही. नंदीबैल बंडीत व त्याला माणसांनी ओढण्याची परंपरा इतर कोठेही पहावयास मिळत नाही. हेच या द्वारका यात्रेचे वैशिष्टय आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण लोकजीवनातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे  शेतकरी लोक बैलांच्या आधारे शेती करतात. बैलांच्या उपकरांची  परतफेड म्हणून ‘पोळा’ हा सण महाराष्ट्रात शेतकरी लोक साजरा करतात. तो जवळ-जवळ सारखाच असतो. परंतु अकोट तालुक्क्यातील उमरा या गावत पोळ्याच्या दुसऱ्या  दिवसी ‘द्वारका यात्रा’ साजरी केली जाते. ती  महाराष्ट्रातील इतर गावापेक्षा आगळीवेगळी आहे.यामध्ये गावाच्या परिसरातील शेतकरी व त्यांचे  बैल  सहभागी होतात. नंदीबैलाची द्वारका यात्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे.वाकाजी महाराज संस्थानचा ‘नंदीबैल’ मनाचा आहे. त्याची पूजा व गावातून बंडीमध्ये  सजवून  उभा करून मिरवणूक काढली जाते. ही बंडी बैला ऐवजी शेतकरी लोक ओढतात.

परंपरागत दृष्ट्रया लोकमनसामध्ये अशी धारणा आहे की, बैल हा शेतकऱ्यांचे दैवत आहे. वर्षभर शेती पिकवत असतांना शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून  बैल मेहनत करतात.तेंव्हा त्याचा श्रमाची पूजा झाली पाहिजे. बैलाशिवाय शेती पिकू शकत नाही. बैलांच्या श्रमाचे मूल्ये पैशाच्या स्वरुपात होऊ शकत नाही. बैलाच्या  ऋणातून थोडी मुक्ती मिळावी किंवा त्याच्या श्रमाची उतराई करावी यासाठी ‘पोळा’ सण साजरा केला गेला आहे. तर द्वारका यात्रा ही त्याच्या ‘सन्मानाची पूजा’ मानली आहे. वर्षातून एकदा त्याला नवरदेवाप्रमाणे दाग दागीण्याने सजविले जाते. अंगावर झुली चढविल्या जातात. शिंगाना रंग दिला जातो. गल्यात फुलांचा हार, नवीन कासंड्या घातल्या जातात. अशा सजविलेल्या नंदीबैलास सजविलेल्या बंडीच्या रथामध्ये उभे करून शेतकरी स्वतः ओढतात. हा सोहळा जणू बैलाच्या लग्नासारखा असतो. प्रभाकर मांडे यांनी याला लग्नाचे नाट्ये म्हटले आहे. उमरा गावातील ‘द्वारकायात्रा’या पद्धतीने खरोखरच लग्नविधी आहे.पहिल्या दिवशी आमंत्रण दुसऱ्या  दिवशी पोळा सण व नंतर तिसऱ्या  दिवशी बंडीच्या रथातून  काढली जाणारी बसुराजाची मिरवणूक हे तिन्ही विधी लग्नातील विधी आहेत.  याप्रसंगी बसुराजाची आरती  म्हटली जाते.  बसुराजाची आरती महाराष्ट्रात कुठेही  गात नाहीत त्यामुळे ती आरती एकमेव आहे .

द्वारका यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या  शेतकरी लोकांचा असा विश्वास आहे की, प्राण्यांचे आजार देवाच्या कृपादृष्टीने बरे होतात. परिसरातील अनेक लोकांची गुरे,ढोरे,याच पद्धतीने आजारातून बरी  झाली आहेत असा समज दृढ आहे.  याचं दैवी समजातून ही यात्रा मूर्त स्वरुपात आली आहे. मात्र बैलाविषयी त्याच्या कष्टाविषयी आदरभाव या यात्रेत

संदर्भ :

• मांडे, प्रभाकर, लोकरंगभूमी , गोदावरी प्रकाशन, औरंगाबाद , १९९४.

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.