अनुप्रयोग सॉफ्टवेअरचा एक प्रकार. या प्रकारांचे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना वापर करण्यासाठी किंवा वापरकर्त्यांना विक्रीसाठी विकसित केले जाते. व्यावसायिक सॉफ्टवेअर हे एक मालकी हक्क (License) सॉफ्टवेअर मानले जात होते, परंतु आता बरेच मोफत आणि मुक्त स्रोत सॉफ्टवेअरचे अनुप्रयोग उपभोक्त्यांना वापरायला मिळतात. ऑफ-द-शेल्फ सॉफ्टवेअर प्रोग्राम्स, उदा., कि-गेम किंवा कॉम्प्युटर स्पेशॅलिटी स्टोअरमध्ये विकल्या गेलेल्या किंवा अगदी संगीत दुकानात किंवा किराणा दुकानात व्यावसायिक सॉफ्टवेअर उपलब्ध असतात.
मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स, जसे की विंडोज परिचालन प्रणाली (विंडोज ऑपरेटिंग सिस्टम; Windows Operating System) आणि एमएस ऑफिस, वाणिज्य सॉफ्टवेअर –टॅली (Tally) – ही काही सुप्रसिद्ध व्यावसायिक सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत.
व्यावसायिक सॉफ्टवेअरचा परवाना देण्यात येतो, त्याची विक्री केली जात नाही. एकवेळ विशिष्ट कंपनीद्वारे विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी किंवा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर आवश्यक असलेल्या लोकांसाठी किंवा संघटनेला परवाना देण्यात येतो किंवा सॉफ्टवेअरचा मालकी हक्क विकला जातो. या प्रकारांच्या सॉफ्टवेअरमध्ये आर्थिक (Financial), विपणन (Marketing) आणि लेखा (Accounting) सॉफ्टवेअरचा समावेश आहे. गेल्या दशकात, तथापि काही मुक्त स्रोत अनुप्रयोग देखील व्यावसायिक सॉफ्टवेअर बनले आहेत, ग्राहकांसाठी किंवा एखाद्या सेवेचा भाग म्हणून काही परवानाकृत (Licensed) आहेत.
मुक्त स्रोत सॉफ्टवेअर अनिवार्यपणे मोफात सॉफ्टवेअर नव्हे. सॉफ्टवेअरचा वापर विना-व्यावसायिक वापरासाठी मुक्तपणे (Freely) केला जाऊ शकतो.
काही व्यावसायिक अनुप्रयोग सॉफ्टवेअरची विविध उदाहरणे खालीलप्रमाणे :
1. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर (Word processing software)
2. डेटाबेस प्रोग्राम (Database programme)
3. करमणूक सॉफ्टवेअर (Entertainment software)
4. व्यवसाय सॉफ्टवेअर (Commercial software)
5. शैक्षणिक सॉफ्टवेअर (Educational software)
6. संगणक-अनुदानित डिझाइन सॉफ्टवेअर (Computer granted design software; CAD)
7. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर (Spreadsheet software) इ.
पहा : अनुप्रयोग सॉफ्टवेअर.
संदर्भ :
- https://www.techopedia.com/definition/4245/commercial-software.
- https://www.defit.org/application-software/
समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर