दुसेजा, अजयकुमार : (०२ डिसेंबर १९६५). भारतीय जठरांत्रमार्ग विशेषतज्ज्ञ वैद्यक.

दुसेजा यांनी वैद्यकशास्त्रात पदवी संपादन (१९८८) करून एमडी. (मेडिसीन; १९९२) आणि पीजीआयएमईआर तर चंदीगड येथून डीएमच्या (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) पदव्या प्राप्त केल्या (१९९६).

दुसेजा हे सध्या चंदीगडमधील ख्यातनाम जठरांत्र आणि यकृत तज्ज्ञ आहेत. तसेच ते सध्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था पीजीआयएमईआर व चंदीगडच्या यकृत विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

दुसेजा हे इंडियन नॅशनल ॲसोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर व नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज कार्यदलाचे सदस्य आहेत. तसेच ते क्रॉनिक लिव्हर डिसीज फाउंडेशन नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस व अमेरिकेच्या एनएएसएच कमिटीचे सदस्य आहेत. ते नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजवर एशिया-पॅसिफिक वर्किंग पार्टी आणि गट अँड ओबीसिटी इन एशिया वर्किंग ग्रुपचेही सदस्य आहेत. ते हिपॅटायटीस-सी विषाणू, यकृताचे कर्करोग, यकृत विफलता आणि औषधांमुळे यकृताला होणारी इजा यावरील कार्य दलाचे सक्रिय सदस्यदेखील आहेत.

आता पर्यंत दुसेजा यांनी जठरांत्र आणि यकृत संबंधी पाठ्यपुस्तकांत २२ प्रकरणे लिहिली आहेत. त्यांचे २२० हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस, तीव्र-व-क्रॉनिक यकृत विफलता या त्यांच्या आवडीच्या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांची या विषयांवरील एकूण ५५ प्रकाशने आहेत.

जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपॅटोलॉजीचे दुसेजा सहयोगी संपादक आहेत आणि विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळावर आहेत. ते इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर या संस्थेचे खजिनदार होते आणि इतर विविध वैज्ञानिक संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य आहेत. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांचे प्राप्त झाले आहेत. पुरस्कारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

इंडियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये ‘इन्शुलीन रेझिस्टन्स अँड इफेक्ट ऑफ मेटफॉर्मिन इन नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपॅटायटीस-एक प्राथमिक अहवाल’ या लेखासाठी पारितोषिक, इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या वार्षिक अधिवेशनात  ‘क्रोनिक हिपॅटायटीस-सी ग्रस्त रुग्णांमध्ये इन्शुलीन रेझिस्टन्स’या पेपरसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार. एशिया-पॅसिफिक इंटरनॅशनल मॉलेक्युलर बायोलॉजी नेटवर्क आणि एशियन मॉलिक्युलर बायोलॉजी ऑर्गनायझेशन ‘पोस्ट जिनोमिक रिसर्च-इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी फॉर डिसीज संबंधित शुगर चेन आणि प्रथिनांचे एकात्मिक कार्यात्मक विश्लेषण’ या इंटरनॅशनल कोर्ससाठी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसीन, ओसाका युनिव्हर्सिटी, जपान येथे एशियन-पॅसिफिक इंटरनॅशनल अधिछात्र शिष्यवृत्ती, भारतातील ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ या विषयावरील संशोधनासाठी धरमवीर दत्ता मेमोरियल ओरेशन अवॉर्ड, इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या वार्षिक परिषदेत ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये माइटोकॉन्ड्रियाचे अल्ट्रास्ट्रक्चर’ या पोस्टरसाठी सह-लेखकाचे सर्वोत्कृष्ट पोस्टर पुरस्कार. इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीतर्फे आयएसजी-अल्केम ‘ओमप्रकाश मेमोरियल’ पुरस्कार, फिलिपीन्सच्या सेबू सिटीत एशिया पॅसिफिक डायजेस्टिव्ह सप्ताहाची  अधिछात्र शिष्यवृत्ती, चॅपल हिल, यूएसए येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील यूएनसी सेंटर फॉर लिव्हर डिसीजेस अँड ट्रान्सप्लांटेशन येथे यकृत प्रत्यारोपणाच्या प्रशिक्षणासाठी भेट देणारे विद्याव्यासंगी म्हणून, कोरियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी-सोल, कोरिया येथील सोल इंटरनॅशनल डायजेस्टिव्ह डिसीज सिम्पोजियमध्ये ‘सिरम लेप्टिन हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजग्रस्त रुग्णांमध्ये यकृत फायब्रोसिसशी संबंधित नाही’ या पेपरसाठी ट्रॅव्हल पुरस्कार, इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी द्वारे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज वरील सर्वोत्कृष्ट लेख प्रकाशित करण्यासाठी आयएसजी –एसआर ‘नाईक स्मृती पुरस्कार’, सिंगापूर हेल्थ सर्व्हिसेसद्वारे जून २००९ मध्ये सिंगापूर येथे आयोजित केलेल्या ‘एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन’ मधील प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी, इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीतर्फे क्वालालंपूर, मलेशिया येथे एशियन पॅसिफिक डायजेस्टिव्ह सप्ताहमध्ये अधिछात्र शिष्यवृत्ती, भुवनेश्वरच्या इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हरच्या परिषदेत ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो’, या पेपरला पारितोषिक, पीजीआयएमईआर चंदीगड येथे इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हरच्या परिषदेत ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ असलेल्या रुग्णांमध्ये हिस्टोलॉजिकल तीव्रता त्वचेखालील वसा ऊतीच्या प्रमाणाशी संबंधित आहे, या पेपरला पारितोषिक, सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीने त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज संशोधनासाठी ISG ‘झायडस वक्तृत्व’ पुरस्कार, होनोलुलु, हवाई, यूएसए येथील अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या परिषदेत ‘लहान आतड्यांतील बॅक्टेरियाची अतिवृद्धी आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज रुग्णांमध्ये टोल सारखे रिसेप्टर सिग्नलिंग’ या पोस्टरसाठी राष्ट्रपती पुरस्कार, सिरोसिसच्या ‘एक्यूट-ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअर असलेल्या व नसलेल्या रुग्णांमध्ये ‘मोनोसाइट एचएलए-डीआर अभिव्यक्ती, न्यूट्रोफिल ऑक्सिडेटिव्ह बर्स्ट क्षमता आणि साइटोकाइन चे विश्लेषण’ या पेपरसाठी पारितोषिक,

दुसेजा हे नॅशनल ॲकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, अमेरिकन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लिव्हर डिसीज, अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि सोसायटी ऑफ जीआय-एंडोस्कोपी ऑफ इंडियाचे फेलो आहेत.

कळीचे शब्द : #यकृततज्ज्ञ.

संदर्भ :

समीक्षक : अनिल गांधी